देशात असताना घरी कायम रेडिओ चालू असायचा. अगदी लहान असल्यापासून तो आयुष्याचा अविभाज्य भागच झाला होता. त्यातही मराठी गाण्यांचे कार्यक्रम अगदी लक्षात ठेवून ऐकले जायचे. पुणे एफ.एम. वर संध्याकाळी ५.३० वाजता लागणारा सांजधारा हा विशेष आवडता.
अमेरिकेत आल्यावर बर्याच गोष्टी मिस करायला लागले त्यात देशातला आणि त्याहीपेक्षा मराठी रेडिओ ही एक गोष्ट होती. यूट्यूब किंवा गाना वगैरे सारख्या ठिकाणी गाणी ऐकून दुधाची तहान ताकावर भागवायचा प्रयत्न केला गेला. पण त्यात ती रँडम गाणी ऐकण्याची मजा येईना. आपल्याला कधीही माहिती नसलेल्या चित्रपटांची गाणी अचानक कानावर पडण्यात जी धमाल आहे ती त्यात नव्हती.
अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानच्या शेजारी राहणाऱ्या प्रीतम शाह यांनी आत्महत्या केली असून त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही पोलिसांना सापडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या या चिठ्ठीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची नावं आहे.
तुम्ही सचिन सुप्रिया या जोडगोळीचा "तिरुमला ऑईल" ही जाहिरात पाहिली असेल. ही जाहिरात पाहिल्यानंतर मला पडलेले प्रश्न.
(१) "मला आवडणारे पदार्थ मी नेहमीच खातो" असे म्हणताना सचिन त्याची तुंदीलतनु आतमध्ये खेचतो असे वाटते का?
(२) सचिनचे सुटलेले पोट दिसू नये म्हणून ढगळ असा टी शर्ट घातला असावा का? (कारण तो खरोखर फिट्ट असेल तर शर्ट आतमध्ये खोचलेला दाखवला असता असे वाटते.)
(३) सुप्रिया ज्या पद्धतीने "तिरुमला ऑईल" असे कॅन दाखवत ठासून म्हणते तेंव्हा ती एखादी इंजिन ऑईलची जाहिरात करते असे वाटते का?
१९९९-२००० हे वर्ष माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या त्यावेळी टीनएजर असणाऱ्या मुलामुलींच्या आयुष्यात फार मोठ्या बदलाचं होतं. घरातल्या फोनमधून चिर्रर्र चिर्रर्र असा आवाज करत आमच्या कम्प्युटरमध्ये इंटरनेट यायचं. आणि मग आम्हाला एक मोठं पटांगण बागडायला मिळायचं. सुरुवातीचे दिवस हे हॉटमेल आणि याहूचे होते. शाळा कॉलेजमधली गोड गोड प्रेमपत्र आता पासवर्ड प्रोटेक्टेड इमेलमध्ये येत असल्यामुळे अनेक जणांची सोय झाली होती. बरेच कवी मनाचे लोक आता तासंतास फोनवर गप्पा मारण्यापेक्षा जे वाटतंय ते पात्रात किंवा कवितेत लिहून पाठवू लागले.
अगदी आजचीच बी. बी. सी. मराठी (वेबसाइट) बघत होतो....तशी अधून मधून बघतो....पण मला ती बव्हंशी एकांगी (मुद्दाम काड्या करणारी) अशी वाटते.
आपल्या शेजारच्याचा नेहमीच उल्लेख असतो. बरेच वेळा गडे मुर्दे उखाडून काढ्ण्यासाठी एक केविलवाणा प्रयत्न वाटतो. आज बैरूत ब्लास्ट बद्दल बातमी वाचावी म्हणून उघडले तर 'त्या' देशाची व्यक्तव्ये, जम्मु कश्मीर, बाबरी मस्जिद, ओवेसी आणी मुस्लिम लॉ बोर्ड ह्यासंर्भात ठळकपणे बातम्या आहेत. बैरूत ब्लास्ट बद्दलअवाक्षरही नाही!!
आपला काय अनुभव आहे?
ह्यांचा विचार काय आहे?
वी लिव इन इंटरेस्टिंग टाइम्स...
३ जूनला ’निसर्ग’ या चक्रीवादळाचा तडाखा उत्तर कोकण किनारपट्टीला आणि पालघर, ठाणे, मुंबईला बसणार ही बातमी मी वादळाच्या एक दिवस आधी वाचली. मी जरी सध्या बंगळूरला रहात असले, तरी माझं मूळ गाव श्रीवर्धन तालुक्यातलं. अर्थातच त्यामुळे काळजी वाटली. आदल्या दिवशी रायगडच्या जिल्हाधिकार्यांचा एक व्हिडिओ बघितला, ज्यात त्यांनी नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, प्रशासनाने काय खबरदारी घेतलेली आहे, याची चांगली माहिती दिली होती.
नमस्कार,
आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी आधीच ही सीरिज पहिली असेल, किंवा काहीजण आत्ता पाहत आहेत. सर्व कलाकारांचे दमदार अभिनय आणि वेगवान कथा ह्या बलस्थानांमुळे मलाही ही सीरिज प्रचंड आवडली. या धाग्यावर स्पोईलर सकट चर्चा करायला नक्की आवडेल मला, म्हणून हा वेगळा धागाप्रपंच...