अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा-फेसबुकसाठी रेडीमेड स्टेटस-पवनपरी11

Submitted by आरू on 2 September, 2017 - 02:44

खास तुमच्यासाठी फेसबुक रेडीमेड स्टेटस गणेशोत्सव धमाका ऑफर! स्टेटस प्रत्येकी २९९ रूपये

तुम्हाला स्टेटस करण्याचा कंटाळा आहे पण खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्याची ईच्छा तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत रेडीमेड स्टेटस जे तुम्हाला मिळवून देईल हजारो लाईक्स, कमेंट्स सोबत फेसबुकवर अफाट प्रसिद्धी. तुम्हाला फक्त एवढच करायच आहे की तुमचं यूजर नाव व पासवर्ड आम्हाला द्यायचा आहे त्याच्या दहा मिनीटांतच तुमचं स्टेटस पोस्ट झालेलं असेल.

"शेवटी तुमचा विश्वास हीच आमची कमाई."

त्वरा करा ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध.

संपर्क-http/rambharosefbstatus.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थॅंक्स विनीता झक्कास, इथे लेखन करण्याची पहिलीच वेळ त्यामुळे थोडी धाकधूक होती म्हणून अ‍ॅड जास्त रंगवता नाही आली.

युजरनाव न् पासवर्ड Lol
रामभरोसे! __/\__
आवडली जाहीरात.
बादवे,
धाकधूक न वाटू देता माबोवर बिनधास्तपणे लिहावे. येथे समजून घेणारी खुप चांगली माणसं आहेत.
शुभेच्छा!