बर्याचदा आपण व्यक्त होतान उस्फूर्तपणे होत असतो. सोशल मिडियाही त्याला अपवाद नाही. त्या त्या वेळी उठणारे मानसिक, वैचारिक तरंग हा तात्कालिक घटक प्रभावी ठरत असतो.कधी तो स्कोअर सेटलिंगचा भाग असतो. वैचारिक उन्माद व्यक्त करणार्यात बुद्धीदांडग्यांना प्रतिक्रिया देताना संयत असणे आपण विवेकी मानतो.परंतु उन्मादाचा प्रभाव असणार्या् व्यक्तिच्या मेंदुपर्यंत ती पोहोचते का?
करोनाविरोधातील लढ्यात जिवाची बाजी लावणारे आरोग्य सेवक, आणि या आघाडीतील प्रत्येकाच्या धैर्यास सलाम करण्यासाठी आम्ही थाळ्या वाजविल्या, टाळ्या वाजविल्या आणि दिवे-पणत्या लावून त्यांच्या कामाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. असे काही केल्याने करोनाची महामारी नष्ट होणार नाही हे माहीत असूनही देशातील तमाम जनता यामध्ये सहभागी झाली, तर अनेकांनी विरोध व्यक्त करीत पंतप्रधानांची खिल्ली उडविली.
आता करोना वायरसचा विळखा जगातल्या प्रत्येकालाच धरू पाहात आहे. लोक वाटसप ग्रुप किंवा फेसबुक माध्यमांत चर्चा करत आहेत. अशावेळी मायबोलीवर आपलं मत मांडणं, शंका विचारणं यासाठी तरी संपादकांनी/मालकांनी खरडफळा चालू करावा असं मला वाटतं.
इतर काही कारणामुळेही मोठा लेख पाडता येत नाही अशा गोष्टींसाठी खरडफळा आवश्यक आहे.
तुम्हाला काय वाटतं?
मागील आठवड्यात विकेंडला गावी जाऊन यावे म्हणुन शुक्रवारी भल्या पहाटे उठुन आवरुन बॅग भरुन ८ वाजताच ऑफिसमधे आलो. येताना ऑफीसच्या बसमधे ड्रायव्हरने मोठ्याने रेडिओ लावलेला होता. अगदी नव्या सळसळत-फेसाळत-उसळणार्या गाण्यांनी आणि निवेदकाच्या आरडा-ओरडा करीत कानावर आदळणार्या गोंगाटाने जीव मेटाकुटीस आला होता. अधेमधे जाहिरातींचा भडिमार सुरू होताच. कमीतकमी वेळात जास्तीतजास्त शब्द कानावर आदळत एकामागोमाग एक जाहिराती येऊन फेर धरत होत्या. त्यातली एक कसलीशी इंशुरन्स गाठ पॉलिसीची जाहिरात एका ब्रेकमधे ३-४ दा येत होती आणि ती सतत ऐकुन पोटात गोळा उठत होता.
प्रथम मायबोली च्या व्यवस्थापकांचे आभार मला तुम्ही तुमच्या संकेतस्थळावर माझे लेखन प्रकाशित करण्याची संधी दिली . त्या मुळेच माझे नाव व लेखन अनेक रसिक वाचकां पर्यंत पोहोचले
मायबोली वासीयांना नमस्कार ,
मी सौ स्वामिनी चौगुले ,
मी मायबोली कुटुंबात नवीन आहे .मला इथे फक्त आठ दिवस झाले असतील तरी मला या ठिकाणी या लेखाच्या माध्यमातून इथे आलेले तिखट व गोड अनुभव तुमच्या सर्वांन बरोबर शेअर करायचे आहेत .
गोड अनुभवा पासून सुरवात करते .मी लिहलेल्या कविता , कथा व लेखांना भरभरून प्रतिसाद दिल्या बद्दल धन्यवाद.
आमच्याकाळी काय एक एक सिरीयल असायच्या!
तेव्हा असं ढ्याण ढ्याण ढ्याण करून तीन वेळा बटबटीत मेकअपचा क्लोजअप नसायचा. सिरीयलमधले लोक अभिनय करतायत आणि त्यांना कुणीतरी त्याचे पैसे देऊ करतंय असंच मुळी वाटायचं नाही. अहाहा! काय ती अमुक सिरीयल! अहाहा!काय ती तमुक सिरीयल!
ह्या असल्या चर्चा आताशा फार होऊ लागल्या आहेत. आणि चर्चा करणारे माझ्या आई वडिलांच्या वयाचेही नाहीत! ते माझ्याच वयाचे आहेत!
आई-वडील आनंदाने ढ्याण ढ्याण बघतात.
तो: हॅलो.
ती: हं बोला.
तो: काय गं, झोप झाली का?
ती: हो आताच उठले. आज जरा जास्तच गाढ झोप लागली होती. पोस्टमनची आरोळीदेखील नाही ऐकू आली.
तो: हं.
ती: तुमची बहीण सकाळी येईल का दुपारी? तुम्ही पाठवलेले व्हाटसअॅप बघितले. उद्या त्यांचे जेवण बनवावे लागेल का त्यासाठी विचारते आहे.
तो: सकाळी येणार आहे. पण ती दुसरीकडे उतरली आहे. आपल्याकडे आली तर येईल. मी त्या व्यतिरिक्त एक वेगळा अन महत्वाचा एसएमएस पाठवलेला होता तो वाचला का?
निसर्ग, ऐतिहासिक, खाद्य संस्कृति, पारंपारिक, प्राणी--वर्णन आणि व्यक्ति-वर्णन तसेच अनेक विषयांवरती लिहणारी सर्वांची आवडती, अभ्यासु व अष्टपैलू लेखिका जागू (प्राजक्ता म्हात्रे) यांचा लेख शनिवार दि. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी लोकसत्ता पेपर मधे वास्तुरंग या सदरात आला होता. काही गोष्टी माहित नव्हत्या त्याची सुद्धा माहिती मिळाली. छान लेख जागू. लेख आल्या बद्दल अभिनंदन...
बातमी लिंक साठी येथे क्लिक करा https://epaper.loksatta.com/2308060/loksatta-mumbai/31-08-2019#page/12/2