माणसे वाचताना

Submitted by सिम्बा on 22 May, 2017 - 23:53

माणसे वाचताना.

काही दिवसांपूर्वी फेसबुक वर फिरता एक पोस्ट दिसली
“Meet people who aren’t your age. Hang out with people whose first language isn’t the same as yours, get to know someone who doesn’t come from your social class, This is the only way to see the world. This is how you grow."

आणि पुढे कुठल्यातरी travel डेस्टीनेशन चे फोटो. पण त्या मिनिटाला ती वाक्ये मला फार अपील झाली.

आपल्या “केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार”च्या खूपच जवळ जाणारा तो विचार होता. फक्त इकडे तुमचा संवाद “पंडितां” पुरता सीमित ठेऊ नका, तुमच्या पेक्षा “वेगळे” जगणारे जे कोणी आहे त्यांच्याशी संवाद साधा असे म्हणणे होते

“वेगळ्या” लोकांशी संवाद साधताना, पहिला आणि मोठा अडथळा ठरतो तो पूर्वग्रह (Prejudice). काही शब्द ऐकले कि आपले अनुभव, आपले सोशिअल कंडीशनिंग आणी आपली वैयक्तिक मुल्ये यांच्या एकत्रित प्रभावाने त्या शब्दाची एक प्रतिमा आपल्या मनात नकळत उमटते, आणी प्रत्यक्ष भेटलेली व्यक्ती,घटना आपण त्या प्रतिमेशी मनातल्या मनात ताडून पाहू लागतो, साम्य शोधू लागतो आणी आपले पूर्वग्रह अजून अजून पक्के करत जातो.

पूर्वग्रह टाळण्याचा सगळ्यात सोपा आणी हमखास उपाय म्हणजे आपले अनुभवसंचीत वाढवणे, प्रथमपुरुषी अनुभव घेता आले तर फारच छान, पण तसे घेता नाही आले तर किमान दुसर्यांचे अनुभव वाचून आपले संचित वाढू शकतो.
देशाटन न करता, आपले अनुभव विश्व समृध्द करायचा सोपा उपाय म्हणजे पुस्तके,
आपला वैचारिक परीघ वाढवण्यासाठी, बौद्धिक क्षितिजे विस्तारण्यासाठी आपण कायम पुस्तकांची मदत घेत आलो आहोत, पुढे technology च्या प्रगतीमुळे फक्त छापील पुस्तकांच्या ऐवजी दृकश्राव्य अनुभव देणारी इतर माध्यमे सुद्धा आपण वापरू लागलो,
मात्र या सगळ्यात आपल्याला जी गोष्ट “सांगण्यात “ येते तीच आपण पाहतो/ वाचतो. लेखक, दिग्दर्शक यांच्या सामाजिक/ राजकीय जाणीव/मते या प्रमाणे त्या गोष्टीची छटा बदलते. पर्यायाने आपले त्या घटने बद्दलचे दृष्टीकोन/ पूर्वग्रह जास्त घट्ट होत जातात

जसे, समलैगिक म्हंटले कि आपल्या डोळ्यासमोर भडक कपडे घातलेला स्त्रैण हालचाली करणारा पुरुष येतो, कामवाली गंगुबाई म्हंटली कि नऊवारी नेसेलेली पण नथीसकट सगळे दागिने घातलेली, मोडके तोडके हिंदी बोलणारी स्त्री हवी; मिसेस डीकॉस्टा नाव असणारी म्हातारी प्रेमळच असणार ;मोनिका किंवा शनाया नाव दिलेले कॅरक्टर आधुनिक विचारांचे आणी विधिनिषेधाची चाड नसलेलेच असणार अशी आपली पक्की धारणा असते. माध्यमांनी घट्ट केलेले हे काही पूर्वग्रह.

लोकांचे मनात वर्गीकरण करताना आपण वेगवेगळ्या शब्द्खुणा वापरतो. दुर्दैवाने त्यातली सगळ्यात taboo असलेली शब्दखुण पुढे त्या व्यक्तीची ओळख बनते. लोकांना आपण एकदा एका विशेषणाने tag केले कि बाकीचे सारे गुणदोष त्या tagच्या सावलीतच राहतात. मग मध्यम वर्गातून येऊन बनलेला प्रतिथयश डॉक्टर, गे activist, उच्च अभिरुची असणारा प्रेक्षक, वेल रेड मनुष्य या tags मधला गे activist हा tag आपल्या सगळ्या भावनिक व्यापाराचा मध्य बिंदू होतो किंवा प्लस साईझ मॉंडेल. मुस्लिम, स्त्री अशा tags मधून जाडी किंवा मुसलमान म्हणून स्टीरीओटाईप केले जाते.
याच्या पुढचा भाग म्हणजे हा टॅग पॉझिटिव्ह की निगेटिव्ह या प्रमाणे आपण त्या व्यक्तीशी extra चांगले व वाईट वागू लागतो/शकतो, हे त्या व्यक्तीसाठी प्रचंड इरिटेटिंग ठरू शकते ,कारण आपण व्यक्ती ला रीऍक्ट न होता त्या टॅग ला रिऍक्ट होत असतो. यात तिचा व्यक्ती म्हणून स्वीकार दिसत नाही.

दुसरा अडथळा म्हणजे या “वेगळे अनुभव असणाऱ्या” लोकांबरोबर संवादाची संधी न मिळणे.
बहुतेक वेळा “वेगळे अनुभव” हे नकारार्थी असल्याने लोकांचा हे अनुभव लपवण्याकडे कल असतो, अगदी आपल्या नेहमीच्या वर्तुळातील कोणाला असा अनुभव आलाय हे माहित असले तरी शक्यतोवर त्या विषयावर बोलणे टाळले जाते. मग uncomfortable प्रश्न विचारून त्या व्यक्तीला बोलते करणे तिचा प्रवास उलगडणे हि गोष्ट दूरच राहिली.
या बाबतीत पाश्चात्य लोक नशीबवान म्हंटले पाहिजेत,त्यांच्या सामाजिक रचनेमुळे त्यांना जास्त वेगवेगळ्या लोकांचे एक्सपोजर मिळते. बरोबर शिकणारा मुलगा संध्याकाळी बार टेंडर म्हणून काम करणारा असू शकतो, किंवा घरगुती मदत करणारी बाई, पुर्वायुष्यातील सरकारी ऑफिसर असू शकते, भारतातून बाहेर जाणाऱ्या लोकांना जो पहिला सांस्कृतिक धक्का बसतो तो या ओपन कल्चर मुळे. आणि परदेशात खूप काळ राहणाऱ्या लोकांचे दृष्टिकोन विस्तारलेले दिसतात ते ही याच वाढलेल्या अनुभाव संचितांमुळे (परदेशात देश उभा करणाऱ्या अपवादांची मला जाणीव आहे, आणि त्याबद्दल मी बोलत नाहीये)
एखादि ओळखीतली व्यक्ती तिच्या आपबिती बद्दल मोकळेपणे बोलत असेल तरी आपण साधारण ते प्रॉब्लेम आपल्या पर्यंत येऊ नयेत म्हणून बेतानेच त्या संभाषणात सहभागी होतो.

हि सगळी विचार साखळी मनात येण्याचे कारण म्हणजे फेसबुक वर पाहिलेली दुसरी जाहिरात
“ the Human library”
पहिल्या वाचनातच हा प्रकार फार इंटरेस्टिंग वाटला.
हा उपक्रम २००० साली डेन्मार्क मध्य एसुरू झाला, आणी आतापर्यंत ७० देशात हा उपक्रम राबवला गेला आहे, भारतात इंदूर आणी हैद्राबाद नंतर मुंबईत हा कार्यक्रम होणार आहे.

सोशिअल प्रीजुडीस च्या शिकार झालेल्या माणसांपैकी ज्यांना आपले अनुभव सांगण्यासारखे वाटतात, ते “मानवी पुस्तक” म्हणून आधी स्वत:ची नोंदणी करतात. (मुंबईत ल्या कार्यक्रमासाठी आत्ता पर्यंत ४७ पुस्तके नोंदवली आहेत). त्यांचे अनुभव/स्ट्रगल अधोरेखित करेल असे त्या पुस्तकाला नाव दिले जाते कार्यक्रमाच्या दिवशी पुस्तक वाचायला येणारे लोक, आपल्याला इंटरेस्टिंग वाटणारे “पुस्तक” घेऊन hall च्या कोपर्यात बसतात आणी पुढची ३० मिनिटे त्या “पुस्तकांशी” संवाद साधायचा प्रयत्न करतात. इथे नोंद घ्यायची गोष्ट म्हणजे uncomfortable प्रश्न विचारायला ना नसते आणी पुस्तक होताहोईतो मनमोकळे उत्तर देण्याचा प्रयत्न करते.
अनुभवांच्या प्रवाहात कोणी फक्त पाय सोडून बसेल, कोणी गुडघ्यापर्यंत उतरेल तर कोणी डुबकी मारेल ज्याचा त्याचा प्रश्न. आपल्या स्ट्रगल ची प्रस्तावना सांगितल्यानंतर पुस्तक वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देईल (पुस्तक स्वत: सेट भाषण देणार नाही) त्यामुळे एकाच पुस्तक वेग वेगळ्या वाचकांना वेगवेगळ्या प्रकारे उलगडेल.
३० मिनिटाची वेळ संपल्यावर हे पुस्तक परत देऊन इच्छा असेल तर दुसरे घेऊ शकता.

अर्थात हा प्रकार वर लिहिलंय तितका सोपा नसणार आहे, आणी एक्चुअल कार्यक्रमात अजून बरेच चालेन्जेस असतील याची कल्पना आहे,
कोणाला हे पुस्तक झालेल्यांनी आपले दुख: मिरवणे वाटेल, कोणाला हे आपल्या वेगळेपणाचे भांडवल करणे वाटेल, तर कोणाला वाचकांचा दुसर्याच्या आयुश्यात ला फालतू इंटरेस्ट वाटेल.कोणा वाचकाला आपल्या सारख्याच स्ट्रगल मधून गेल्या दुसऱ्या व्यक्तीला पाहून प्रेरणा मिळेल, तर कोणी वाचकासाठी ही इन्ट्रॅक्शन त्याच्या मनात असलेले prejudice चॅलेंज करायची सुरवात ठरू शकेल.
पण एक मात्र नक्की, नेहमीच्या आयुष्यात मी ज्यांना भेटणार नाही अशा माणसांशी बोलायची संधी मला मिळेल
मनात खूप उत्कंठा घेऊन मी रविवारची वाट पाहतोय.

पुस्तकांबरोबर झालेल्या गप्पा इकडे शेअर करीनच पण कोणा मायबोलीकराला अशी पुस्तके वाचायची असतील तर हा कार्यक्रम २८ मे रोजी “Title wave” बुक स्टोर बांद्रा इकडे ३ ते ७ या वेळात होणार आहे. आणि कोणाला पुस्तक होण्याची इच्छा असेल तर फेसबुक वर र्यांचे डीटेल्स मिळतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इन्टरेस्टिंग कन्सेप्ट आहे. तुम्ही वरती लिहीलेली माहितीही आवडली.

सध्याच्या काळात तर हे अत्यंत आवश्यक आहे. गूगल, फेबु, व्हॉअ‍ॅ वर लोक समविचारी व एकसारख्या मतांच्या मित्रमंडळात preaching to the choir टाइपचे एकाच बाजूची मते असलेले मेसेजेस वाचतात, त्याबाहेर काहीही वाचत नाहीत. त्या पेक्षा वेगळी मते असलेल्या लोकांशी त्यांचा संवाद जवळजवळ बंद झाला आहे. माबो वर सुद्धा अनेक उदाहरणे आहेत. अशांमधे अशा चर्चा सोशल नेटवर्कवर सुद्धा झाल्या पाहिजेत.

इथे नोंद घ्यायची गोष्ट म्हणजे uncomfortable प्रश्न विचारायला नसते आणी पुस्तक होताहोईतो मनमोकळे उत्तर देण्याचा प्रयत्न करते. >> हे नीट समजले नाही. इथे "uncomfortable प्रश्न विचारायला हरकत नसते" अशा अर्थाने आहे, की परवानगी नसते अशा?

सॉरी, तो टायपो होता सुधारला आहे " विचारायला ना नसते" असे आहे ते.
Uncomfortable queations are expected and encouraged. And the book is expected to give candid answers.

फेसबुकवर एका मैत्रिणीने शेअर केलंय याबद्दल. तीही जाणार किंवा नाही काही कल्पना नाही. तुम्ही खूप छान आणि नेमकं लिहिलंय , आता तुमचा अनुभव नक्की लिहा!

कन्सेप्ट इन्टरेस्टिंग आहे, पण या 'पुस्तकांना' काही खास ट्रेनिंग दिले जाते का? काय शेअर करायचं कसं करायचं, समोरच्याच्या रिएक्शन्स किंवा स्वत:च्या इमोशन्स मुळे विचलित न होता मांडायचं कसं याबद्दल सराव/ प्रशिक्षण आवश्यक असेल असे वाटते.
इव्हन वाचकही काही ठराविक लेव्हल चे असावे लागतील नाहीतर वाचक - पुस्तक यांना समोरासमोर भेटायला मिळाल्यामुळे काहीतरी भलतेच प्रकरण होऊन बसू शकेल. ( स्टॉकर ?)

मला या इव्हेंट चा फर्स्ट हॅन्ड अनुभव नाही,
मी जे काही वाचले आहे त्या वरून उत्तर द्यायचा प्रयत्न करतो,

जी माणसे पुस्तक व्हायला तयार झाली आहेत, ती त्यांच्या अनुभवांनी चांगलीच सिझन्ड झाली आहेत, त्यामुळे त्यांना स्वतः:बद्दल बोलायला काही रिझर्वेशन असेल असे वाटत नाही,
या इव्हेंटची प्रसिद्धी करायला TOI मध्ये जे आर्टिकल आले होते , त्यात काही पुस्तकांचे अगदी फोटो आणि त्यांचे taboo एरिया असलेली एक चित्र चौकट होती (पण त्यात नावे नव्हती) त्यामुळे या लोकांना मोठया प्रेक्षकवर्गापुढे यायची भीती वाटत नाही असे वाटतेय,

कदाचित, इव्हेंट च्या दिवशी खरी नावे प्रसिद्ध केली हि जाणार नाहीत,
त्यांना दिलेल्या पुस्तकांच्या नावाने ओळखले जाईल,

रविवारी जास्त माहिती मिळेल

सहीये!
ईथे पुस्तक होण्यासाठी काय क्वालिफिकेशन क्रायटेरीया अपेक्षित आहे. कशी लोकं पुस्तक होऊ शकतात उदाहरणे द्या ना. असं पुस्तक होणे, असणे हे जास्त ईटरेस्टींग वाटत आहे.. अर्थात वाचनाचा अनुभवही तसाच असेल.. आपला नक्की एका स्वतंत्र लेखात मांडाल..

आणि हो, हा ही लेख छान जमलाय

एकाच बाजूची मते असलेले मेसेजेस वाचतात, त्याबाहेर काहीही वाचत नाहीत. त्या पेक्षा वेगळी मते असलेल्या लोकांशी त्यांचा संवाद जवळजवळ बंद झाला आहे. >> खूपच महत्त्वाचा मुद्दा. थोडं रच्याकने, याच्याही पुढे जाऊन सर्च इंजिनना तुमच्या बद्दल खूप जास्त माहिती असल्याने, काही सर्च केल्यावर तुम्हाला काय हवं असेल ते सर्च इंजिन स्वतःच ठरवून तेच रिझल्ट फिल्टर करून रांगेत सगळ्यात पुढे दाखवते. ह्या प्रकाराची कधीकधी फार भीती वाटते. वेगळ्या दृष्टीने सर्च कसा करावा ही शिकण्यासारखी कला आहे.

@ ऋन्मेष >>>>क्वालिफिकेशन क्रायटेरीया अपेक्षित आहे. >>>
ज्या गोष्टींबद्दल सामाजिक पूर्वग्रह, असहिष्णुता आहे ,ज्या गोष्टी कलंक (स्टीग्मा???) म्हणून गणल्या जातात, अशा गोष्टी आयुष्याचा भाग असणारी माणसे पुस्तक म्हणून qualify होतात.
अमेरिकेतल्या एका विद्यार्थ्यांसाठी केलेल्या इव्हेंट साठी त्यांनी प्रसिद्ध केलेली यादी खाली देतोय, त्यावरून साधारण कल्पना यावी.

Adopted
Alcoholic
Bullying (victim or bully)
Cancer survivor
Child Abuse
College dropout
Depression/anxiety
Disabled
Domestic violence
Drug addiction
Elderly
English as a Second Language
Feminist
First Generation Student
Former gang member
From a large family
Gun rights activist
Homeless (past or present)
Immigrant
International student
LGBTQ
Mental Illness
Obesity
Political (Democrat, Republican, etc.)
PTSD
Rape Survivor
Religious (Jewish, Muslim, Atheist, etc.)
Sexual Assault victim
Single Parent
Stay at home mom/dad
Student athlete
Students of color
Transfer student
Undocumented citizen
Vegan
Veteran

ऋन्मेऽऽष, कृपया हे आहेत तर ते का नाही? आपण- आपल्या समाजातील त्रुटी असलं लंबाण आणि टर्न घेऊन धागा भरकटवू नका. विनंती आहे.

मुंबईतल्या इव्हेंट साठी त्यांनी जी सिनोप्सीस प्रसिद्ध करायला सुरुवात केली आहेत, ती थोडी गोलमाल आणि मुद्द्याला थेट स्पर्श न करणारी वाटतात,
वर उल्लेखलेल्या US मधील इव्हेंट साठी दिलेली नमुना सिनोप्सीस.

College Dropout: Defying the Odds
I'm the non-assuming type. I like to blend in to the scenery. But I also carry quite a story about with me.
There are not many people who can claim to be an 'Erin Brockovich' and mean it. I was the lead trial
paralegal who lead a team of 12 to claim the largest singular verdict against tobacco at $12.8 million
(compensatory) and $23.6 Billion in punitive damages in July 2014. How does one defy the odds with no
formal education to validate their skill set? As a single mother of three and a cancer survivor, I've done
it and although there is nothing I would like more than to have my formal education completed, there is
a way for us all to open doors that are otherwise closed to us.

Obesity: My Skin Is In!
Big Man, Biggie, Big Dawg, and More, these are just a few of the titles forced on me over time. Having
been born as a big baby, growing up as a big kid, and now living life as a bigger individual, I have had my
share of jokes made about me, but the best part is that I have grown to love who I am. As someone who
went from being big and told I wouldn't be a success to being an internationally ranked athlete,
professional public speaker, and now a college educated professional, the skin I am in has supported be
and made me stronger. Being someone in society seen as obese is a label, but is not my life.

Domestic Violence: An Injury a Smile Cannot Hide
After witnessing two women in my family endure years of domestic violence, I always told myself "don't
you ever tolerate that type of behavior. Never allow anyone to hit you." However, little did I know,
intimate partner violence (domestic violence) does not always begin and end with physical abuse. As a
first generation college student, I made the mistake of getting involved in a relationship that was way
too serious during my junior year. The man I adored emotionally abused me, and made the ultimate
betrayal of thinking physical abuse was permissible. I suffered a serious injury that I still carry around to
this day. An injury that my smile cannot takeaway. However, 10 years later I am proud to say "I am a
survivor." Intimate Partner Violence (Domestic Violence) is never okay.

Raised Christian & Queer: Un-Washing My Queer Brain
In my childhood, I learned there was something wrong with me. I was different, impure, in need of a
cure. I did everything they said I should do. I prayed, asked God to cleanse me, to change me. But every
morning, I still woke up with a very real, super huge crush on a girl in my class. This book is about my
journey to self-acceptance.

@ फारेंड ,>>> अशांमधे अशा चर्चा सोशल नेटवर्कवर सुद्धा झाल्या पाहिजेत!>>
लोकांना दुसरी बाजू दिसली पाहिजे हा मुद्दा पटला, पण अशा चर्चा सोशल मीडिया वर किती यशस्वी होतील या बद्दल मला शंका आहे.
2 व्यक्ती समोर समोर भेटतात तेव्हा अगदी मुद्दामहून ठरवल्याशिवाय दुसऱ्याच्या मतावरून टिंगल टवाळी सहसा होत नाही,
सोशल मीडियावर, जेव्हा फेस तू फेस कनेक्ट नसतो, आणि 1 टू मेनी असा फॉरमॅट असतो (एक अनुभव सांगणारा आणि खूप जण ऐकणारे) तेव्हा गोष्टी चटकन ट्रॉलिंग च्या वळणाने जातील अशी भीती वाटते.

फेसबूक वरच्या Humans of New York, Bombay ह्या सिरिज सारखंच दिसतंय, पण थेट मॅन टु मॅन संवाद ईंट्रेस्टिंग आहे. अ‍ॅनोनिमस का असेना आणि केवळ श्रोता म्हणुन का असेना पण मला स्वत:ला असा संवाद कितपत कंफर्टेबल राहून साधता येईल ह्याची शंका वाटते.

तुम्हाला शुभेच्छा!

सिम्बा, वरच्या माहितीबद्दल धन्यवाद.
आपल्या लाईफमध्ये पुस्तक बनावे अशी काही ट्रेजेडी नाही याचे वाईट वाटले Happy
तुमचा या कार्यक्रमाचा अनुभव वाचण्यास उत्सुक..

Pages