खूप दिवस रोहिंग्या मुसलमान यांच्या बद्दल टीव्हीवर बघत होतो, पण नेमकी बातमी कळत नव्हती, म्हणून या बातमी बद्दल वाचायला, बघायला सुरुवात केली, माझ्या सारखे अजून कोणीही असतील, तर कदाचित त्यांच्यासाठी खालील माहिती उपयोगी असू शकते.
इथे माझे वैयक्तिक मत द्यायचे नसून, बातमी सोप्या शब्दात मांडायची आहे
रोहिंग्या मुसलमान कोण आहेत?
म्यानमार देशातून निर्वासित झालेले मुस्लिम बांधव, त्यांना भारतात आश्रय हवा आहे.
म्यानमार मधून निर्वासित का झाले?
कारण रखाइन बुद्ध लोकांनी रोहिंग्या मुसलमान लोकांवर वारंवार प्राणघातक हल्ले केले.
हा तंटा कसा सुरु झाला?
१) दुसऱ्या महायुद्धायच्या वेळी जपान व बुद्ध लोक, हे इंग्रज व रोहिंग्या मुसलमान यांच्या विरोधात लढले.
२) इंग्रज व रोहिंग्या मुसलमान हरले, १९४८ ला म्यानमार स्वतंत्र झाला.
३) १९४८ ला आलेल्या नवीन म्यानमार सरकारने रोहिंग्या मुसलमान यांना नागरिकत्व नाकारले.
भारतातली आत्ताची परिस्थिती
१) भारतीय सुप्रीम कोर्टमध्ये, प्रशांत भूषण, कपिल सिब्बल आणि अजून काही वकील रोहिंग्या मुसलमान यांच्या बाजूने लढत आहेत, भारतात सुमारे ४०, ००० रोहिंग्या मुसलमान यांना सामावून घ्यावे अशी त्यांची भूमिका आहे.
२) भारतीय सरकार याच्या विरोधात आहे
मला अजून वेगळ्या विविध विषयांवर, सोप्या शब्दात बातमी सांगायची आहे, या फक्त बातम्या असतील (ओन्ली फॅक्टस) त्यात वैयक्तिक मत अजिबात नसेल, तुम्हाला जर अशा बातम्या वाचायला आवडणार असतील, तर प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा
धन्यवाद
खूप कंनफुझन होते, तुमचा लेख
खूप कंनफुझन होते, तुमचा लेख वाचून नक्की काय प्रकार आहे ते कळलं.. धन्यवाद...
प्लिज गो ऑन,
प्लिज गो ऑन,
मला हा विषय माहित करून घ्यायला आवडेल
हो जरूर सांगा
हो जरूर सांगा
माहिती मॅन,
माहिती मॅन,
>>>>या फक्त बातम्या असतील (ओन्ली फॅक्टस) त्यात वैयक्तिक मत अजिबात नसेल, >>>
हे तुम्ही कसे साध्य करणार या बद्दल उत्सुकता आहे,
सामान्य माणसाची (तुम्ही सामान्य आहात असे गृहीत धरून) माहिती मिळवायचे सोर्स म्हणजे वृत्तपत्र आणि tv,
जर तुम्ही सातत्याने एकाच विचारसरणी च्या वृत्तपत्रातून माहिती गोळा करत असाल तर काही काळाने किंवा काही इसयुज बद्दल ती फक्त फॅक्ट उरणार नाही, त्याला कुठलातरी रंग येईलच
अहो माहिती मॅन, तुम्ही माबो
अहो माहिती मॅन, तुम्ही माबो वर नवीन आहत का?मी ही नवीन आहे त्यामुळे मला माहिती नाही. आधीच्या धाग्यांचे जे प्रतिसाद बघितले त्यात हा id दिसला नाही म्हणून वाटले. तसे असेल तर तुमचे स्वागत☺
बाकी लेखात तुम्ही नुस्ती माहिती देत आहत हे उत्तम पण सगळेच लेख अश्या प्रकारचे असावेत असे नाही,ते तुमचे वैयक्तिक मत असेल तर त्याचे स्वागत आहे, लेखात तुम्ही तर्क अणि मत किंवां तुमचे म्हणणे मांडू शकतात फक्त ते बिन बुडाचे किंवां नॉन फॅक्ट, नॉन ऑब्जरवेशन बेस्ड असता कामा नयेत, असे मला वाटते.
पण तुमचा असा निव्वळ माहिती युक्त लेख ही आवडला.अर्थात मला स्वतःला माहिती होती आणि सध्याचा हा ज्वलंत असल्यामुळे मला वाटले लोकांना हया बद्दल ठाऊक असेल की रोहिंगे म्यानमार हुन बाहेर का पडत आहेत. माझ्या साठी महत्वाचा मुद्दा हा आहे की ते ज्या काही कारणा मुळे बाहेर पडत आहेत आणि इथे भारतात येत आहेत तर त्यांना म्यानमार नी परत घेतले नाही तर भारताची आणि भारत वासियांची भूमिका काय असेल.
अर्थात, मला त्यावरील लोकांची भूमिका जाणून घेण्यात जास्ती रस होता, आणि ती मला समजली ह्याचा आनंद आहे.
तुम्ही माहिती दिल्या नंतर हा लेख किंवां त्यांच्या प्रतिक्रिया त्या दिशेने वळल्यात तर छानच आहे नाहीतर माहिती असणे हे उपयोगिच आहे. जितकी जास्त माहिती facts तितके चांगले☺
रुन्मेष, हा आयडी काढायची गरज
रुन्मेष, हा आयडी काढायची गरज नव्हती, ऋ आयडी ने लिहीलं असते तरी चाललं असतं, पण मला गुगल माहित नाही हे विधान खोटं पडू नये म्हणून नवीन आय डी घेणे इज नॉट फाईन!
माहिती मॅन फ्रॉम नागपूर!
माहिती मॅन फ्रॉम नागपूर! इंटरेस्टिंग
तोच असेल कशावरून?
नाना, ऋ चा संबंध?
घ्या! अहो मुळात ऋ हाच नानांचा
घ्या! अहो मुळात ऋ हाच नानांचा आयडी आहे, हे तुम्हाला ठाऊक नव्हतं?
अरे काय रु रु... जिथे संबंध
अरे काय रु रु... जिथे संबंध नाही तिथे त्याला घुसवता राव, नंतर तिचा नावाने ओरडत बसता..
बा द वे- रूनमेश हा आयडी माबो चे ट्रॅफिक वाढावे म्हणून अडमिं/ वेमा ने बनवलेला आयडी आहे असा माझा गेस आहे..☺️
प्लिज हा धागा भरकटवू नका.
प्लिज हा धागा भरकटवू नका.
आणि अशा पोस्टी इग्नोर करून पुढे चला, विषयाला धरून बोला..
ह्या रोहिंग्या मुसलमानांना
ह्या रोहिंग्या मुसलमानांना भारतातच का आश्रय हवा आहे? पाकिस्तानात का नको?
दुसर्या दुहेरी ह्यांच्या बीबीवरुन, मला वाटतं आश्रय देऊ नये. आपलीच लोकसंख्या इतकी प्रचंड आहे, त्यात बाहेरुन भर कशाला? आपल्याकडे आहेत त्या लोकांना पुरतील इतके रिसोर्सेस आहेत का मुळात?
१० लाख लोकं आपल्याला काही जड
१० लाख लोकं आपल्याला काही जड नाहीत. ५ लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली १०० शहरं आहेत, प्रत्येकी पाच ते २० हजार लोक सामावून घेणे मोठे नाही. तेव्हा रिसोर्सेस चा मुद्दा मजबूत नाही. ठिसूळ आहे.
पण त्यांना सामावून घ्यायचं
पण त्यांना सामावून घ्यायचं फक्त भारतावरच आहे का? आणि असल्यास का?
वाटून डिस्पर्स केली तर जास्त
वाटून डिस्पर्स केली तर जास्त वाटणार नाहीत. हे अत्ता साठी जहाले. उदया परत कुठल्या देशातून अश्या प्रकारचे निर्वासित आलेत तर?आणि ते परत महणतील ह्यांना घेतले मग आम्हाला का नाही म्हणता.एकदा घेतलेली भूमिका वारंवार बदलता येणार नाही.
त्यामुळे प्रशासनाने नीट बसून आत घेण्याची नीट प्रोसेस / पॉलिसी/फ़िल्टर criteria ठरवावा. त्यांना डिस्पर्स आणि ट्रेक करावे ते ठरवावे.मगच ह्यात पडावे.
आपल्या दाराशी आलेल्या
आपल्या दाराशी आलेल्या निर्वासितांना त्यांचे वंश, धर्म, देश न बघता आसरा देणे हे कोणत्याही देशाचे कर्तव्य आहे. तिथे 'इतर देश काय करतात, आम्हीच का' हे प्रश्न गैरलागू आहेत. जर हे निर्वासित नको असतील तर त्यांचा योग्य तो बंदोबस्त करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी मुत्सद्दीपणे काही विषय हाताळावे लागतील.
आता चालू असलेल्या घडामोडीप्रमाणे बांगलादेशात ह्यांची व्यवस्था करण्यात यावी व त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यास भारतसरकार तयार आहे असे ऐकिवात आहे. अधिकृत बातमी मिळाल्यास कळवतो.
आपलीच लोकसंख्या इतकी प्रचंड
आपलीच लोकसंख्या इतकी प्रचंड आहे, त्यात बाहेरुन भर कशाला? आपल्याकडे आहेत त्या लोकांना पुरतील इतके रिसोर्सेस आहेत का मुळात? >> अनुमोदन.
>>आपल्या दाराशी आलेल्या
>>आपल्या दाराशी आलेल्या निर्वासितांना त्यांचे वंश, धर्म, देश न बघता आसरा देणे हे कोणत्याही देशाचे कर्तव्य आहे. तिथे 'इतर देश काय करतात, आम्हीच का' हे प्रश्न गैरलागू आहेत. >>
मान्य पण जाणून घ्यायचा प्रयत्न करतेय की त्यांनी भारताकडेच आश्रय मागितला आहे की इतर काही देशही आहेत. फक्त आपणच असल्यास, का? हे एक कुतूहल म्हणून विचारते आहे.
पुन्हा आपल्या देशात रिसोर्सेस आहेत का इतक्या जास्तीच्या लोकांना सामावून घ्यायला ही शंका अजूनही फिटलेली नाही.
त्यांनी कुठे आश्रय मागितला
त्यांनी कुठे आश्रय मागितला वगैरे असे नाहीये. वाट मिळेल तिकडे ते जात आहेत. त्यांचे कोणी नेते वगैरे नाही. सगळे लोक 'ऑन दिअर ओन' असे आहेत.
रिसोर्सेस चा प्रश्न नाही असे वरच नमूद केले आहे
"मोदींच्या नेतृत्वाखाली
"मोदींच्या नेतृत्वाखाली असणार्या भारतात सुरक्षा मिळेल" जर हा आशावाद रोहिंग्यांना वाटून भारतात यावेसे वाटत असेल तर सरकारने आशावादी रोहिंग्यांना स्वीकारायला हवे. ही केंद्रसरकारच्या प्रयत्नांना पोचपावती आहे. हिंदु कट्टरवादी सरकारने मानवतावादी दृष्टीकोण ठेवून मुस्लिमांना मदत्/आश्रय दिला ही गोष्ट आंतरराष्ट्रीय पटलावर दखल घेण्यासारखी ठरणार आहे. मोदींचा दबदबा कित्येकपट्टींनी वाढण्याची शक्यता आहे.
सविस्तर विचार करून केंद्रसरकारने निर्णय घेतला पाहिजे.
मोदींचा काय संबंध? कधी असायलम
मोदींचा काय संबंध? कधी असायलम मिळालेल्या, रेफ्युजी म्हणून आलेल्या व्यक्तीशी बोलून बघा. माणूस आपलं घरदार/ देशसोडून जीव वाचवत का फिरत असेल बरं?
१. त्या प्रांतात राहणारे अनेक
१. त्या प्रांतात राहणारे अनेक मुसलमान आणि हिंदू हे एकदोन शतकांपूर्वी भारतातूनही म्यानमारला गेले आहेत.
२. रोहिंग्या केवळ मुसलमानच नव्हेत, तर साधारण २% हे हिंदू आहेत. तेही भारतात येण्याच्या प्रयत्नात आहेत.
३. नव्या सरकारच्या नव्या धोरणानुसार हिंदू, बौद्ध, ख्रिस्ती आणि बांगलादेश व पाकिस्तान या देशांतल्या अन्य अल्पसंख्याकांना भारतात आश्रय मिळणं सोपं आहे. मुसलमानांना या धोरणात जागा नाही.
४. भारतानं १९५१ सालच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या करारावर सही केलेली नाही. त्यामुळे भारत निर्वासितांना आश्रय देण्यास बांधील नाही, असं सरकारचं म्हणणं आहे.
५. पाकिस्ताननं भारतापेक्षा अधिक निर्वासितांना सामावून घेतलं आहे. निर्वासितांना आश्रय देण्याच्या बाबतीत पाकिस्तान जगात तिसर्या क्रमांकावर आहे. पहिल्या दहांत एकही श्रीमंत राष्ट्र नाही. भारतही नाही. भारतापेक्षा अधिक निर्वासित इराण, केनया, इथियोपिया, युगाण्डा या देशांनी स्वीकारले आहेत.
पाकिस्ताननं भारतापेक्षा अधिक
पाकिस्ताननं भारतापेक्षा अधिक निर्वासितांना सामावून घेतलं आहे. निर्वासितांना आश्रय देण्याच्या बाबतीत पाकिस्तान जगात तिसर्या क्रमांकावर आहे. पहिल्या दहांत एकही श्रीमंत राष्ट्र नाही. >> हे रोहिनग्या निर्वासितांना आहे ना? आता साऊथ एशियात दहाही श्रीमंत राष्ट्र नाहीत त्याला काय करणार? ☺ पाकिस्तानला हे कुठल्या मार्गाने जातात? पहिल्या land होणाऱ्या देशात निर्वासित दर्जा घेणे नियमाने अपेक्षित असते ना?
क्र. ५ हे 'पाकिस्तानात का नको
क्र. ५ हे 'पाकिस्तानात का नको?' आणि 'भारतानंच कायम का आश्रय द्यायचा?' या प्रश्नांचं उत्तर आहे. म्यानमारहून ते पाकिस्तानला जाणार कसे? आणि तिथे अगोदरच (भारतापेक्षा कितीतरी अधिक) निर्वासित आहेत.
50000+ आधीच गेलेत पाकिस्तानला
50000+ आधीच गेलेत पाकिस्तानला. जम्मू मधेही आहे त्यांची कॉलनी. वाट मिळेल तिथे, सुरक्षित वाटेल तिथे, मग कितीही दूर असुदे, जाताहेत हे लोक.
https://www.dawn.com/news/1357828
This is Burmi Colony, home to about 55,000 Rohingya Muslims in Karachi. There are other colonies in the area that are also housing the Rohingya but this is arguably the largest.
सोनू.,
सोनू.,
माझ्या समजुतीनुसार हा आकडा जुना आहे. अनेक रोहिंग्या निर्वासित बांगलादेशाच्या निर्मितीपासून पाकिस्तानात आहेत. सध्या पाकिस्तानानं मदत नाकारली आहे.
तुम्ही दिलेली लिंक मी जे लिहिलंय तेच सांगते. ही कॉलनी नवीन नाही.
.
.
५. पाकिस्ताननं भारतापेक्षा अधिक निर्वासितांना सामावून घेतलं आहे. निर्वासितांना आश्रय देण्याच्या बाबतीत पाकिस्तान जगात तिसर्या क्रमांकावर आहे.>>>>
चिनुक्स या बद्दल काही आधार मिळेल का?
https://www.bloomberg.com
https://www.bloomberg.com/graphics/2017-countries-of-asylum-for-migrants/
आता पाकिस्तान दुसर्या क्रमांकावर आहे.
तिसरा क्रमांक त्या आधीच्या वर्षी होता असं दिसतं.
यावर्षी जर्मनीचाही समावेश झालेला आहे.
>>>पहिल्या दहांत एकही श्रीमंत
>>>पहिल्या दहांत एकही श्रीमंत राष्ट्र नाही. भारतही नाही. भारतापेक्षा अधिक निर्वासित इराण, केनया, इथियोपिया, युगाण्डा या देशांनी स्वीकारले आहेत.>>>> ह्याचे कारण काय असेल बरे.
आहे आता. जर्मनी.
आहे आता. जर्मनी.
Mi 500,000 wachala pakistan
Mi 500,000 wachala pakistan refugees number.
Pages