जाहिराती आणि जबाबदारी

Submitted by शिवाजी उमाजी on 12 September, 2017 - 05:50

जाहिराती आणि जबाबदारी

पुर्वी म्हणत चार वेद, सहा शास्त्रे, चौदा विद्या, अठरा पुराणे आणि चौसष्ट कला प्रत्येकाला माहित असायला पाहिजेत. बाकी वेद, विद्या, पुराणे यात काही बदल झाला नाही पण नंतरच्या काळात चौसष्ट कलांमधे पासष्टाव्या एका कलेचा भर पडली, ती म्हणजे जाहिरात.

हल्ली टीव्ही वर कोणत्याही चँनलवर सफर करा, तुम्हाला बातम्या, कार्यक्रम कमी व जाहिरातीच जास्त दिसतील. दाखवा बापडे, त्यामुळेच तर चँनल वाल्यांची दुकाने सुरू आहेत. परंतु कधी कधी या जाहिराती पाहताना त्या जाहिराती तयार करणाऱ्या कंपन्यांच्या कल्पकतेची किव येते.

एका साबणाच्या जाहिरातीत "तुझा रंग एवढा उजळ कसा" हा बिनडोक प्रश्न तो नवरा आपल्या बायकोला विचारतो (अरे, ए सी मधे रंग उजळच रहातो, तुझा साबणाने जर शेतात राबणाऱ्यांना कष्टकऱ्यांना उजळ करून दाखवलं तर आयुष्यभर तुझाच साबण वापरेल मी) पुढे अरे वा, मस्तच" काय अर्थ समजतो या वाक्यातून?

अशीच आणखी एक जाहिरात, तज्ञ डॉक्टर सांगतात "लहान मुलांजवळ कोणत्याही प्रकारची मच्छर मँट, रिपेलन्ट लावु नये, त्यातील केमिकल मुळे मुलांना श्वास घ्यायला त्रास होतो", तरीसुद्धा त्या उत्पादनांची जाहिरात होते, बरं त्यात जी इतर लहान मुलं आहेत त्यांच्या तोंडचे संवाद सुद्धा उद्धटपणाचे आहेत, काय संदेश जातो यातून?
हि केवळ काही उदाहरणे आहेत, अशा भरपूर अर्थहिन जाहिराती अशा भरपूर अर्थहिन जाहिराती दाखवल्या जातात..

हे झालं जाहिरात कंपनीच्या कल्पते बद्ल, पुढील काही उदाहरणं जाहिरातीत काम करणाऱ्या कलाकारां संबधी एका फेस क्रिमच्या जाहिरातीत शाहरूख खान दुसऱ्या एका क्रिमचा खोका, पँकिंग समोरच्या कलाकारा कडून घेऊन इतस्ततः फेकून देतो,
अन्य एका तेलाच्या जाहिराती साक्षी तन्वर मुलीच्या केसात अडकलेली काडी काढून पाठीमागे फेकते, तसेच एका सँनेटरी नँपकीनच्या जाहिरातीत असाच प्रकार. जाहिरातीच्या दिग्दर्शकाला स्वच्छतेचं भान नाही का? यातुन त्यांची बेफिकीर वृत्ती मात्र दिसते.

सतत मारा होणाऱ्या या जाहिरातीतुन समाजाला सकारात्मक संदेश मिळावा अशी अपेक्षा आहे, परंतु तसं होत नाही, उलट यांचा बालिशपणा समोर येतो, यातील मान्यवर कलाकार सुद्धा केवळ स्वतःला मिळणाऱ्या पैशाचाच विचार करताना हे विसरून जातात कि अनेक लोक त्यांच अनुकरण करतात, त्यांनी अशा वेळी स्वतःच्या प्रसिद्धीचे भान ठेवून योग्य बदल सुचवून काम करायला हवं, पण दुर्दैवाने तसं होत नाही, एवढं मात्र खरं.

©शिवाजी सांगळे ११-०७-२०१७

Group content visibility: 
Use group defaults

खरं आहे... आजकालच्या जाहिराती अतिशय वाह्यात आणि दिशाभूल करणार्‍या असतात.
पण शाहरूख सारख्या कलाकारांना दोष देणे पटत नाही... त्यांचे काम चांगली अ‍ॅक्टिंग करणे आहे... ऊत्पादनाशी त्यांचा तसा काही फार सबंध नसतो.

आपण म्हणता त्याप्रमाणे शाहरुख खान कलाकार आहे, जरी खरं असलं तरी समाजात त्याच अनुकरण होतं हे एक माणूस म्हणून कुणीही विसरायला नको. नाही का?

<<जाहिरातीतुन समाजाला सकारात्मक संदेश मिळावा अशी अपेक्षा आहे, >>
जाहिरातीचा उद्देश फक्त मालाचा खप वाढवणे हा आहे. पैसा कमावणे, काय वाट्टेल त्या मार्गाने, हे धंद्यातले तत्व आहे.
चालू आहे त्याहूनहि काहीतरी वाईट, ओंगळ केले तर लोकांना आवडतेच! मग कसले सकारात्मक संदेश?
नटनट्या पैशासाठी जाहिराती करतात. नटनट्यांकडून एकच संदेश, मला पहा नि पैसे द्या. ते लोक जे करतात त्यात जितके, भीषण, बिभित्स, अतिरेकी ते जास्त खपते, त्याला जास्त पैसे मिळतात.
सकारात्मक संदेश द्यायला पैसे मिळत असतील तर तो वेगळा धंदा! त्यातहि पैसे हवे असतील तर जाहिरातबाजी!

ज्या जाहिरातींबद्दल आक्षेप आहे त्या जाहिरातदारांना लिहून बघा. काही बेकायदेशीर असेल खटला भरा.
पण भारतातले कायदे नि त्याची अंमलबजावणी म्हणजे विनोदच!