मायबोली गणेशोत्सव २०२४
आमचा बाप्पा
प्रसन्न वातावरणात गणेशाचे आगमन झालेले आहे. घरोघरी सगळ्यांचे बाप्पा स्थानापन्न झालेले असतीलच. मागील बरेच दिवस अपार मेहनत घेऊन तुम्ही गणेश मूर्ती निवड, एखादा देखावा, उत्तम सजावट केली असेल. आकर्षक मूर्ती, सजावट, देखावा यांचे दर्शन सर्व मायबोलीकर घरबसल्या घेऊ शकतील.
सर्वसिद्धिकर प्रभो!
तुम्हाला एखादी सवय सोडायची असेल, किंवा एखादी सवय अंगी बाणवायची असेल तर या धाग्याला प्रतिसाद देऊन तुमचा संकल्प आणि थोडक्यात मनोगत लिहा आणि पुढचे २१ दिवस रोज त्या संकल्पाची पूर्ती झाली की नाही याची खबरबात आम्हाला देत रहा.
नैवैद्यम समर्पयामि
तुम्ही बनवलेल्या वा चाखलेल्या नैवेद्याबद्दल लिहा. पाककृती, फोटो किंवा नैवेद्याबरोबर जोडला गेलेला एखादा किस्सा वा आठवणीही आम्हा सर्वाना आवर्जून सांगा.