ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम ने मागची २ दशक जागतिक क्रिकेट वर वर्चस्व गाजवल. प्रचंड गुणवत्ता, Never say die attitude, आणि मिळालेले कुशल कर्णधार यामुळे ऑस्ट्रेलिया ने इतर टीम्स ना तोंड वर काढण्याची संधी कधी दिलीच नाही. त्यामुळे मागच्या काही वर्षात ऑस्ट्रेलिया चे अनेक दिग्गज खेळाडू निवृत्त झाले आणि त्यांची जागा घेणारे नवीन खेळाडू तितके चांगले नसल्याने त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळायाला लागला. परवा त्यांचा वेगवान गोलंदाज शॉन टेट म्हणाला की गिलेस्पी, हेडन, वॉर्न ह्यानी इतक्या लवकर निवृत्ती घ्यायला नको होती. ऑस्ट्रेलिया संघाच्या गळतीची अनेक विश्लेषण वाचली.
एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत
श्रोतेहो, आज होळीनिमीत्त आपल्या स्टुडीओमध्ये प्रसिद्ध शिळपादक श्री. शिळबाबा आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलून त्यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदाबाबत माहीती करून घेवूया.
निवेदकः नमस्कार शिळबाबा. होळीनिमीत्ताने आपणाला शुभेच्छा.
शिळबाबा: नमस्कार, नमस्कार. आपणालाही होळीच्या शुभेच्छा!
निवेदकः शिळबाबा, संपूर्ण राज्यात आपल्या शिळपादनाची किर्ती पसरलेली आहे. गावोगावी आपल्या शिळपादनाचे कार्यक्रम होतात. या सर्व कार्याबद्दल आपल्याला काय वाटते?
‘आपल्या देशाच्या वाटचालीची दिशा योग्य आहे?.. तुम्हाला काय वाटतं?’.. असा प्रश्न अचानक कुणी तुम्हाला केला तर? तुम्ही लगेचच, क्षणाचाही विलंब न लावता, विश्वासानं उत्तर देऊ शकाल? की हा प्रश्न तुमचं डोकं पोखरून उत्तर शोधू लागेल?.. बराच प्रयत्न करून एखादं उत्तर सापडलंच, तर ते बरोबर असेल की चूक, या संभ्रमाचा भुंगा तुमच्या डोक्यात गुणगुणू लागेल.. आणि अखेर, तुम्ही उत्तर राखून ठेवाल. मग ज्याच्याशी तुम्ही विश्वासानं विचार शेअर करता, त्याला हा प्रश्न विचाराल. कदाचित, त्याचीही तुमच्यासारखीच अवस्था होईल, आणि या प्रश्नाची परिक्रमा सुरू होईल..
पैसा आणि पोट...
रात्र चढलेली. मुंबई परतीच्या प्रवासाला लागलेली. सकाळी रेल्वेतून उतरणाऱ्या गर्दीचे लोंढे आता रेल्वेत चढण्यासाठी जीवघेण्या स्पर्धेच्या तयारीत. मीही याच गर्दीतला एक. रांगेतून चालणाऱ्या, पुढच्याच्या पावलावर पाऊल टाकत चालणाऱ्या मुंगीसारखा. पुढचा थबकला तर थबकायचं. नाही तर चालत राहायचं. आसपास काही वेगळं जाणवलं, तरी तिकडे बघायचं नाही..
कारण, वेळ नसतो. गाडी चुकली, तर पुढे बस चुकते. मग स्टॉपवर रखडावं लागतं. सगळंच वेळापत्रक कोलमडतं.
त्यापेक्षा, आसपास न बघितलेलंच बरं.
ही बातमी आहे, विनोदी लेख नाही.
विनोदी लेख म्हणुन घेतला तरीही तुमच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे होईल, पण त्याला माझा नाईलाज आहे.
म टा मधली बातमी वाचुन हुSSSश्श झाले,....
आज हेडलीला शिक्षेसाठी शिफारस केली गेली,
हेडलीला तपास कार्यात केलेल्या सहकार्याची बक्षिसी म्हणून आजन्म कारावासाऐवजी ३० ते ३५ वर्षांच्या कारवासाची शिक्षा ठोठावण्याची शिफारस अमेरिकन सरकारने न्यायालयात केली आहे.
माझ्या चेपू वरच्या एका मित्राने टाकलेले स्टेटस अपडेट " समाजातल्या सर्व थरांमधून एक मागणी होत आहे की सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी दररोज त्यांच्या पेपर सोबत अँटी-डिप्रेसंट गोळयांचा पुरवठा करावा"
खरोखरच आजकाल चांगल्या बातम्या ऐका-वाचायला मिळतात कुठे? टीव्हीवर जाऊद्यात पण वर्तमानपत्रात देखिल चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात.