ही बातमी आहे, विनोदी लेख नाही.
विनोदी लेख म्हणुन घेतला तरीही तुमच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे होईल, पण त्याला माझा नाईलाज आहे.
म टा मधली बातमी वाचुन हुSSSश्श झाले,....
आज हेडलीला शिक्षेसाठी शिफारस केली गेली,
हेडलीला तपास कार्यात केलेल्या सहकार्याची बक्षिसी म्हणून आजन्म कारावासाऐवजी ३० ते ३५ वर्षांच्या कारवासाची शिक्षा ठोठावण्याची शिफारस अमेरिकन सरकारने न्यायालयात केली आहे.
माझ्या चेपू वरच्या एका मित्राने टाकलेले स्टेटस अपडेट " समाजातल्या सर्व थरांमधून एक मागणी होत आहे की सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी दररोज त्यांच्या पेपर सोबत अँटी-डिप्रेसंट गोळयांचा पुरवठा करावा"
खरोखरच आजकाल चांगल्या बातम्या ऐका-वाचायला मिळतात कुठे? टीव्हीवर जाऊद्यात पण वर्तमानपत्रात देखिल चांगल्या बातम्या शोधाव्या लागतात.
काल लॅपटॉप वर एड वुड हा रिचर्ड बरटन- जॉनी डेप यांचा चित्रपट बहुदा २८ व्या वेळी पाहत होतो. एड्वर्ड डेविस 'एड' वुड जूनियर हा हॉलीवुड मधला निर्माता आणि दिग्दर्शक. ६० आणि ७० च्या दशकात याने एलीयेन्स, भूत-प्रेत आणि इतर तत्सम विषयावर चित्रपट काढले. पण याची खरी ओळख ही नाही. अमेरिका मध्ये Golden Turky Award नावाचा भन्नाट प्रकार आहे. ज्याप्रमाणे ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा गौरव करतात, त्याप्रमाणे गोल्डन टर्की अवॉर्ड्स सर्वात वाईट चित्रपटाना पुरस्कार देतात. त्यांच्या मते वाईट चित्रपट बनवणे पण एक कला आहे.
मटा ऑनलाइन वृत्त । रांची
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहिद झालेल्या एका जवानाच्या पोटात दीड किलोचा बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली असताना या हल्ल्यासाठी नक्षलवाद्यांनी वापरलेली स्फोटके व शस्त्रसाठा ' मेड इन पाकिस्तान ' होता , अशी धक्कादायक बाब समोर आली आहे .
भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर बंदी
निवडणूक प्रक्रियेत केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्याचा आक्षेप घेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ( आयओसी ) भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर ( आयओए ) निलंबनाची कारवाई केली असून आता संघटनेच्या आंतरराष्ट्रीय सहभागावरच बंदी आली आहे ! या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी ' आयओसी ' च्या दोन पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी एका वृत्तसंस्थेला कारवाईची माहिती दिली . ' आयओसी ' ने दिलेल्या दणक्यामुळे भारतीय क्रीडाजगताला जबरदस्त धक्का बसला असून ऑलिम्पिक किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील भारतीय खेळाडूंच्या सहभागावरच आता प्रश्नचिन्ह लागले आहे .
इंटरनेटच्या माध्यमातील पहिला दिवाळी अंक म्हणून मायबोली - हितगुज दिवाळी अंकाला प्रसिद्धीमाध्यमात मानाचं आणि कौतुकाचं स्थान आहे. आपल्या या ई दिवाळी अंकाविषयी दरवर्षी नियतकालिकांमधून, वर्तमानपत्रांमधून आणि इतर अनेक माध्यमांतून छापून, लिहून येत असतं.
तर, अश्या माहितीसाठी, लेखांसाठी, ऑनलाईन लिंक (असल्यास) देण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी हा धागा.