आज डॉ. सी. एन. आर. राव यांना भारतरत्न हा सन्मान जाहीर झालाय. डॉ. सि.व्ही. रामन आणि डॉ. कलाम यांच्यानंतर हा सन्मान मिळवणारे ते तिसरे शास्त्रज्ञ. ७९ वर्षाचे डॉ. राव यांनी १५०० हुन अधिक शोधनिबंध, ४५ पुस्तके लिहिलि असुन त्यांचा h-index १०० हुन अधिक आहे, जो जगात फारच थोड्या लोकांचा असतो. {बहुतेक नोबेल लॉरेटचा}.
याबद्दल त्यांचे अभिनंदन.
''आमचे उत्पादन पर्यावरणपूरक आहे.''
''आम्ही बनविलेले उत्पादन संपूर्णतः नैसर्गिक आणि पर्यावरणास कोणताही धोका न पोहोचविणारे आहे.''
अशा कित्येक जाहिराती आपल्याला टीव्ही, वर्तमानपत्रे, सोशल मीडियावर दिसत असतात. एखादे उत्पादन पर्यावरणपूरक आहे हे 'दिसल्या'वर आजच्या सुशिक्षित, सधन ग्राहकाचा त्या उत्पादनामधील रस वाढतो ही बाब उत्पादन करणार्या कंपन्या व जाहिरातदार नेमकी जाणून आहेत. जागतिक तापमानवाढ, पर्यावरणाची हानी, प्रदूषण इत्यादींबद्दल वाढती सतर्कता जशी ह्याला कारण आहे तशीच 'ग्रीन' किंवा 'पर्यावरणपूरक' उत्पादने खरेदी करणे हे सामाजिक प्रतिष्ठेचे समजले जाण्याची मानसिकताही त्यामागे आहे.
२०१३ च्या दिवाळी अंकांची चर्चा करण्यासाठी हा धागा. कुठल्या अंकामधे वाचण्यासाठी काय काय आहे याबद्दल इथे सांगता येईल.
आजकाल बोलघेवड्यांची कमतरता नाही. अश्या काही मुद्यांवर आपले काही गुद्दे येऊ द्या.
एक माझाच :-
पंतप्रधान :- भारत १९९१ च्या परिस्थितीकडे वाटचाल करत असल्याचे खंडन.
- अगदी बरोबर. परिस्थीती त्याहीपेक्षा वाईट आहे. १९९१ कडे वाटचाल, म्हणजे परिस्थितीत सुधारणा म्हणावी लागेल.
अजुन एक बातमी, अन सगळ्यांची चीडचीड. तारस्वरात ओरडणारे चॅनेल्सवाले आणि मग सरकारची कासवाच्या, किंबहुना अधिकच संथपणे काही प्रतिक्रिया. मागील काही दिवसात ह्या घटना पुन्हा-पुन्हा होत आहेत. या घटनांनी "बलात्कार्याला फाशीच" दिली पाहिजे असे म्हणणारेसुद्धा वाढत आहेत. पण खरच फक्त ज्यांनी प्रत्यक्ष गुन्हा केला तेच दोषी आहेत का? त्यांना त्वरीत पकडणे, खट्ला चालवणे, शिक्षा करणे, इतकं पुरसं आहे का?
त्यांची हत्या ही महाराष्ट्राचा वैचारिक र्हास दाखवणारी ठरते.>>>>
त्यांची हत्या ही खुन्यांचा वैचारिक र्हास दाखवणारी ठरते. महाराष्ट्राची वैचारिक बैठक ठाम आहे. ती अशा हत्यांनी डळमळणारी नाही.
दाभोळकरांवर असा पूर्वनियोजित हल्ला होणं ही सोकॉल्ड पुरोगामी महाराष्ट्राकरता अत्यंत शरमेची बाब आहे.>>>>>
मुळीच नाही. शरम तर खुन्यांना वाटायला पाहिजे. महाराष्ट्रानी कुठलेही निंदनीय कृत्य केलेले नाही. तो तर दाभोळकरांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!
भ्याड हल्ल्यात हत्या झाली.>>>>
तुम्ही वापरत असलेल्या ऑनलाईन शब्दकोशांबाबत लिहीणार का कृपया
लिहीताना
भाषा- संकेतस्थळ-URL-अनुभव/अधिक माहिती असे लिहा म्हणजे वर्गीकरण करण्यास सोपे जाईल.
वेळ मिळाला की मी नंतर इथे चिकटवेन.
उदाहरण १
मराठी-इंग्रजी शब्दकोश - मोल्सर्वर्थ
http://dsal.uchicago.edu/dictionaries/molesworth/
नुकतीच ए बी पी न्यूज चॅनेल वर प्रधानमंत्री "> ही मालिका सुरु झाली आहे. विख्यात दिग्दर्शक शेखर कपूर हे या मालिकेचे अँकर आहेत. या मालिकेच्या बद्दल पत्रकारपरिषदेत"> व ए बी पी माझा वर साक्षात "> या कार्यक्रमात त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तर दिलीत व अनेक प्रश्न ही मांडले आहेत.
मागील काही दिवसांच्या न्यायालयांच्या निवाड्याचा आढावा घेतला तर वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सरकारने (विशेषतः केंद्रसरकार) केलेल्या चौकशीतील लुडबुडी किंवा नियम धाब्यावर बसवुन दिलेले लायसन्स, इ. यामध्ये न्यायायलाने सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. सिबिआयला स्वायत्तता देण्याबद्दल जवळजवळ आदेश दिला आहे, तर काही बाबतीत चौकशी स्वत:च्या अखत्यारीत चालु केली.
आजच लोकप्रतिनिधी जर गुन्हेगार साबीत झाला आणि किमान २ वर्षांची सजा झाली, तर त्याला त्याचे पद सोडावे लागेल आणि शिक्षा भोगावीच लागेल असा निकाल आज न्यायालयाने दिला. तसेच तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांना आता निवडणुक लढवताच येणार नाही. 
विजया मेहता लिखित, "झिम्मा" या पुस्तकाबाबत इथे चर्चा झालीच आहे. गेल्या सहा महिन्यात किमान चार वेळा मी ते वाचले. शिवाय हाताशीच असल्याने कधीही कुठलेही पान वाचायला सुरवात करावी आणि त्यात रमून जावे असे अनेकदा झाले.
काल सहज मनात एक विचार आला.
बाईंनी सुरवातीलाच लिहिलेय कि लेखन हा त्यांचा प्रांत नाही. त्यांना बोलणे जमते. झिम्माच्या मुखपृष्ठावर त्यांचे जे फोटो आहेत ते अत्यंत बोलके आहेतच. मग या पुस्तकाच्या आधाराने एखादी भव्य दूरचित्रवाणी मालिका का बनू नये ? या पुस्तकाचा आवाका, माहितीपटाच्या कक्षेतला नाही.