संगीत

पंचम (२): 'पंचमयुग'- कारकीर्द (२.१-२.३)

Submitted by योग on 4 February, 2013 - 02:55

पंचम (२): पंचमयुग (१९५०- १९९४)

२.१ पंचमोदय

(१९५०-५१) "काय रे तुला गाणे शिकायचे आहे? कधीपासून वाजवतोस.."?
होय! गेले सहा आठ महिने वाजवतोय... आणि मला तुमच्यापेक्षा चांगला संगीतकार व्हायचे आहे!".

विषय: 
शब्दखुणा: 

पंचम (१): शोध

Submitted by योग on 31 January, 2013 - 05:52

'पंचम' बस नाम ही काफी है!

खरे तर असे असून देखिल पंचम ऊर्फ, राहुल देव बर्मन यांच्याबद्दल कितीही लिहिलं बोललं तरी ते कमीच आहे. संगीत, विशेषतः चित्रपट संगीत अवकाशात पंचम हा असा सूर्य आहे की जे काही आहे ते पंचम च्या ऊदय व अस्ता च्या अलिकडले वा पलिकडले आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये, का ते या लेखमालेत नंतर येईलच. पंचम चे स्थान माझ्या आयुष्यात तरी एखाद्या कुटूंबीयापेक्षा कमी नाहीच त्यामूळे पंचम चा एकेरी ऊल्लेख केवळ त्याच्यावरील माया, आदर व भक्तीपोटी.

विषय: 
शब्दखुणा: 

पद्म पुरस्कार अन अन्याय..

Submitted by श्रीकांत on 26 January, 2013 - 06:17

इथला मजकूर आणि प्रतिसाद विषय एकत्रीत रहावा म्हणून खालील धाग्यावर हलवला आहे.
http://www.maayboli.com/node/40522

शब्दखुणा: 

माझ्या मातीचे गायन- ऑडिओ फाईल हवी आहे

Submitted by मुग्धानंद on 6 December, 2012 - 01:14

माझ्या मातीचे गायन- ऑडिओ फाईल हवी आहे
गीतकार : कुसुमाग्रज, गायक : अनुराधा पौडवाल, संगीतकार : श्रीधर फडके, चित्रपट : लक्ष्मीबाई भ्रतार वासुदेव - / Lyricist : Kusumagraj, Singer : Anuradha Paudwal, Music Director : Shridhar Phadke, Movie : Laxmibai Bhratar Vasudev -

ऑडिओ फाईल कुठे शोधु? तुनळी वर नाही. मोबाईल वर घेता आले तर उत्तम.

"आनंद मना ... "

Submitted by अवल on 6 December, 2012 - 00:46

आज कोण कुठले आप्त मला भेटायला सकाळी सकाळी आले.
उठलेच ते काहीशी वेगळ्या मूड मध्ये. आज पर्यंतच्या अनेक त्रासदायक आठवणी उगाचच आठवू लागल्या.

आयुष्यात न आकारलेले आकार, डोळ्यासमोर फेर धरू लागले.उगाचच एक अस्वस्थता तार छेडू लागली. जे जे हाती आले नव्हते, कधी निसटले होते, कधी सोडावे लागले होते, कधी मनापासूनही सोडले होते; ते सगळे भोवती फेर धरून वाकुल्या दाखवत होते.

तशीच सारी कामे करत होते, अन उगाचच खंतावर होते, चिडचिडत होते...

अगदी नवरा, मुलगा दोघांशीही त्रासिक सूर छेडत होते,... अन असंच काही काही....

विषय: 

'महफिल-ए-गझल' - पंकज उधास

Submitted by माध्यम_प्रायोजक on 23 October, 2012 - 03:55

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गझलगायक म्हणून मान्यता पावलेले पद्मश्री श्री. पंकज उधास यांच्या मैफलीचा लाभ पुणेकरांना बर्‍याच वर्षांनी मिळणार आहे. २७ ऑक्टोबर २०१२ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता राजाराम पुलाजवळील 'महालक्ष्मी लॉन्स' (कर्वेनगर) येथे ही 'महफिल-ए-गझल' संपन्न होईल.

pankaj.jpg

दर्शन - लतादीदींचे

Submitted by skamble on 24 September, 2012 - 02:22

२८ सप्टेंबरला लतादीदी ८४ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या एका कट्टर चाहतीने सांगितलेली ही एक आठवण. - (ज्योती कांबळे, Manchester, UK)
-------

विषय: 

गोष्ट आनंदाच्या गोष्टीची.

Submitted by सुधाकर .. on 16 September, 2012 - 12:44

जीवनात सर्वाधीक आनंदाची अशी कोणती गोष्ट आहे? .. या प्रश्नाला तसं एकच एक उत्तर असेल असं कधी होणार नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती या नियमाप्रमणे अनेकांची अनेक वेगवेगळी उत्तरे असतील. पण मला तरी वाटतं कि, ज्यावेळी एखाद्यास त्याच्या आयुष्यात प्रथमत:च अत्यानंद होतो. आणि त्याला झालेला तो आनंद हा केवळ आपल्यामुळे झालेला आहे. हे जेंव्हा कळते तेंव्हा आपल्याला होणारा आनंद हीच आपल्या आयुष्यातील सर्वाधीक आनंदाची गोष्ट आसते. एका आनंदातून निर्माण झालेला दुसरा अवर्णनिय आनंद. म्हणजेच एका सुखातून उत्पत्ती पावलेलं दुसरं अमर्याद सुख.

जयवी -जयश्री अंबासकर... यांचे अभिनंदन

Submitted by -शाम on 12 September, 2012 - 00:29

नमस्कार मित्रांनो,

परवा आकाशवाणी अहमदनगरवर ...( फ्रिक्वेन्सी १००.१ मेगाहर्टस् )
"साहित्य सौरभ" कार्यक्रमात....मायबोलीकर "जयवी -जयश्री अंबासकर"
यांची, देवकीपंडीत , वैशाली सामंत आणि स्वप्निल बांदोंडकर यांनी गायलेली आणि अभिजीत राणे यांनी संगीतबद्ध केलेली गाणी
ऐकविण्यात आली ...... या निमित्ताने जयश्री यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!!!!!!

...............................................शाम

आर् डी बर्मन फॅनक्लब

Submitted by सशल on 18 August, 2012 - 01:55

आर् डी बर्मन अर्थात पंचम ह्यांच्या उमद्या संगीताबद्दल, त्यातल्या चांगल्या-वाईट गोष्टींबद्दल चर्चा .. Happy

विशेषतः जुनं संगीत ऐकलंच नाही, आवडतच नाही असं म्हणणं असणार्‍यांसाठी .. Wink

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - संगीत