भिकारी

म्हातारी

Submitted by संतोष वाटपाडे on 1 August, 2014 - 03:01

कुंकूमरेषा जुनाट कळकट
रुंद कपाळी विस्कटलेली
ठिपके ठिपक्यांनी बनलेली
त्वचा वयाने सुरकुतलेली
वस्त्र जरीचे पांघरलेली
आत जराशी पोखरलेली
काटक थोडी भेदक थोडी
पोकळ काठी घेउन हाती
बजरंगाच्या ओट्यावरती
एक म्हतारी झोपायाची.....

जुनाट गोणी अंथरलेली
त्यावर नाणी मंतरलेली
जखमांवरती चिंध्या बांधून
पाय पसरुनी तेथे लांबट
रस्त्यावरती कधी मंदिरी
किलकिल डोळे करुन अलगद
बघताना अन हसतानाही
भजन जुनेसे गात मजेने
देरे बाबा एक रुपैया
असेच काही बोलायाची....

शाळेमध्ये जातायेता
मित्रमंडळी माझ्यासोबत
बजरंगाचे दर्शन घेऊन
भाळावरती शेंदूर लावून
ओट्यावरच्या म्हातारीची
कधी घोंगडी ओढायाचो

भीक देतो पण ढोंग आवर..

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 July, 2014 - 05:34

गेल्या आठवड्याची गोष्ट. तो ट्रेनमध्ये सरपटत भीक मागत होता. फर्स्टक्लासचा डब्बा. खरे तर या डब्यात जास्त भीक मिळत नाही. आपल्या डब्यात भिकार्‍यांचा त्रास नको म्हणून फर्स्टक्लासची हुशार पब्लिक त्यांना भीक मिळायची सवय लावत नाही. अर्थात मी देखील दिली नाहीच. पुढचेच स्टेशन माझे होते. मी दारावर उभा राहिलो. तो सुद्धा सरपटत सरपटत दारावर आला. उतरणारे आणखी कोणीच नव्हते, तरीही मी बाजूला सरून त्याला जागा करून दिली. "तू उतर बाबा पहिला, उगाच उशीर झाला आणि गाडी चालू झाली तर माझे काय, मी आहे धडधाकट, मारेन आरामात उडी." आता हि दर्यादिली दाखवायचे आणखी एक कारण म्हणजे सतत सरपटल्याने त्याचे मळलेले कपडे.

लंडनचे भिकारी आणि स्लमडॉग मिलेनिअर

Submitted by अंड्या on 2 June, 2013 - 04:41

आता जब तक है जान बघतोय.. लंडनचे चकचकीत पॉश रस्ते आणि त्यावर गिटार वाजवत गाणे म्हणत पैसे गोळा करणारा शाहरुख.. येणारी जाणारी पब्लिक निव्वळ त्याला पैसेच देत नव्हती तर टाळ्या वगैरे ही देत होती.. मागेही शाहरुखच्या एका चित्रपटात असाच सीन होता, फरक इतकाच की त्यावेळी तो गाणार्‍या भिकार्‍याला टाळी देऊन पुढे गेला.. या उलट आपल्या कडे ट्रेनमधील गाणारे भिकारी निव्वळ इरिटेट करतात, अन पैसे मागायला पायाला येऊन हात लावतात तेव्हा कसली किळस वाटते म्हणून सांगू..

भिकार्‍यांना भिक देणे योग्य आहे का?

Submitted by छावा on 7 December, 2009 - 08:00

आजकाल शहरात रस्त्यांवर, मंदिरांच्या बाहेर भिकार्‍यांची मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुर्वी पाच्-दहा पैशाची भिक मागणारे आज एक रुपया ते पाच रुपये मागतात. चार-आठ आणे दिलेत तर ही मंडळी आपली इज्जत काढते.
काही जण पुण्य मिळवण्यासाठी तर कधी देवाच्या भितीने भिकार्‍यांना काहीना काही भिक्/दान देतात, तर काही लोक भिकार्‍याची कटकट आपल्या मागुन लवकर जावी म्हणुन का होईना पण भिक देतात.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - भिकारी