शास्त्रीय संगीतातील काही मूलभूत बाबी (Basics).

Submitted by षड्जपंचम on 12 September, 2013 - 06:52

मी शास्त्रीय संगीतातील मूलभूत बाबी (Basics) नवीन ऐकणार्या माणसाला कळाव्यात म्हणून एक लेख लिहिला होता . लेख इंग्रजी मध्ये आहे. परंतु कुणाला उपयोगी पडेल म्हणून लिंक शेअर करतोय. मी शक्यतो audio/video चा वापर करून काही गोष्टी समजावयाचा प्रयत्न केला आहे. उद्देश हा आहे की थोड्या उदाहरणांचा आधार घेऊन काही छोट्या छोट्या गोष्टी लोकांना समजावाव्यात.

inamdarnilesh.blogspot.in

आधी मी मायबोली वर लेखन केले आहे. मायबोली वर मी आमिर खान साहेबांच्या गायकी विषयी एक लेख लिहिला होता. त्यानंतर पहिल्यांदाच काहीतरी लिहितोय.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही गाण शिकला आहात का षपं? मी सध्या शास्त्रीय संगीत शिकत आहे. तुमच्याकडे असलेली माहिती ईथे नक्कि टाका.

इथे कोणीच नाही. मी पण सध्या सतार शिकतोय.
मला एक प्रश्न आहे. कुमार गन्धर्व आणि किशोरीताई आमोणकर यांची रागाची interpretations वेगळी आहेत कि मलाच वाटतात. उदाहरणच द्यायच झाल तर या दोघानी गायिलेला नंद (राजन अब तो आ आणि आ जा रे बालमवा) इतर लोकानी गायिलेल्या नंद पेक्षा मला वेगळे वाटतात, तसच भीमपलासी, बागेश्री आणि जयजयवंती बद्दल.
म्हणजे हे खरच वेगळे आहेत कि माझ्य कानाला भास होतोय?

कुलु
राग हा एक साचा झाला... एक गाईड लाईन. त्याचं इंटर्प्रिटेशन, वेगवेगळ्या चीजांमधून, वाद्यांमधून (गळा, सतार, सरोद, बासरी), वेगवेगळं होऊ शकतं.
तसच रागाचा विस्तार करायची घराण्यांची म्हणून एक खासियत असते.. बलस्थानं असतात. त्यानुसार गायलेला राग वेगळा(च) वाटू शकतो. विशेष्त: कुमारजी... ते रागाचा विचार इतक्या वेगळ्या अंगाने करतात की राग पूर्णत: वेगळाच वाटायला लागतो.

वाजवण्यासाठी, गाण्यासाठी कान तयार होणं, करणं खूप आवश्यक आहे...
तुम्ही हे "असं" ऐकू शकताय... छानय. माझ्या खूप खूप शुभेच्छा.

कुलू.. माझ्यामते हाच उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा युएसपी आहे... कर्नाटक जर ऐकलेत तर त्यात जसे ठरवून दिले आहे तसेच गायल्यास त्याला जास्त पसंती मिळते.. त्यात जरा जरी बदल केला तरी नाराजी व्यक्त केली जाते.. काय हे इतकं सुद्धा घोकून नीट म्हणता येत नाही... अर्थात ह्याला अपवाद असतीलच पण अजून तरी ऐकायला मिळालेले नाही..
उत्तर हिंदुस्थानी मध्ये तुम्ही दुसर्‍यासरखे गायलात की त्याची अगदी कॉपी करतोय. असे म्हणतात.. स्वतःच्या आकलना नुसार त्या चीजेत भर घालणे हे अवघड असते पण तसे केल्याने जर त्याची रंगत वाढत असेल तर ते आवडतेच...

दोन गायकांनी गायलेल्या एकाच बंदीशींमधे फरक पडण्या मागे मूळ कारण त्यांची घराणी आहेत.. अर्थात एकाच घराण्यात सुद्धा एकच बंदिश वेगवेगळी वाटू शकते कारण त्यात गायकाची स्वतःची कल्पना शक्ती अ‍ॅड झालेली असते...

दाद आणि हिम्सकूल , धन्यवाद!
मला अस म्ह्न्नयच होत कि किशोरीताई आणि कुमार गन्धर्व हे दोघे इतर गायकांपेक्षा राग वेगळे इंटरप्रीट करुन गातात अस वाटत. म्हणजे वाद्यांबद्दल बोलायच तर निखिल बॅनर्जींच इंटरप्रीटेशन वेगळ वाटत . याचा आर्थ बाकीचे गायक जे किवा वादक जे गातात वा वाजवतात ते मला आवडत नाही अस नाही पण किशोरीताई, कुमार गन्धर्व आणि निखिल बॅनर्जीं हे माझ्यासाठी दैवतासमान आहेत.
उदाहरणादाखल बोलायच तर जयजयवंती मधे "सा नीं धं नी रे" ही फ्रेज सगळेच वापरतात. वरील तिघांच्या जयजयवंती मधे पण ही फ्रेज येते. पण सारखी सारखी "मी राग जयजयवंती, मी राग जयजयवंती" अशी ओरडत येत नाही. हलकेच येउन वाहवा घेउन जाते. तीच गोष्ट नंद च्या "ग, म ध प, रे सा" या फ्रेज बाबत!
हे मला वाटतं. प्रत्येकाचा द्रुष्टिकोन वेगळा शेवटी.
(ईटॅलिक = कोमल, अनुस्वार = खर्ज)

पण सारखी सारखी "मी राग जयजयवंती, मी राग जयजयवंती" अशी ओरडत येत नाही. हलकेच येउन वाहवा घेउन जाते. तीच गोष्ट नंद च्या "ग, म ध प, रे सा" या फ्रेज बाबत!>>>
वा क्या बात है! अगदी पटलं.

तुम्ही कुमार गंधर्वांचे 'मुक्काम वाशी' हे पुस्तक वाचले नसेल तर आवर्जून वाचा. त्यांचा रागसंगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन किती व्यापक होता आणि किती सूक्ष्मविचार आहेत हे कळतं.
किशोरीताईंचं स्वरार्थरमणी हेही पुस्तक प्रसिद्ध आहे. (मी अजून वाचलं नाहिये, पण त्यातूनही त्यांची रागसंगीताबद्दलची विचारसरणी समजू शकेल).

http://www.youtube.com/watch?v=ppQlc3NjuMw
इथे किशोरीताईंवरची एक डॉक्युमेंटरी आहे. 'भिन्न षड्ज' नावाची.
नक्की पाहा.

"मी राग जयजयवंती, मी राग जयजयवंती" अशी ओरडत येत नाही>>
ये हुई न बात! व्वा... सही बोललात अगदी.

मुक्काम वाशी... अगदी अगदी, चैतन्य. जरूर वाचा, कुलु. स्वरार्थरमणी... जरा जपून. ठरवून अभ्यास करायचाच... करायलाच हवा... अशा (सु)दृढ विचारानंतरच वाचता येऊ शकेल इतकं जड आहे पुस्तक.

एकदा "मी राग जयजयवंती"... असं चीजेच्या किंवा बंदीशीच्या माध्यमाने सांगून झालं की, बाकी भरणा आणि खयाल हा सर्वस्वी गायकाच्या "नजरियाचा" भाग असतो...

ती नजर सुरुवातीला घराण्यानं, गुरुनं समृद्धं केलेली असते. मग कलाकार त्यात स्वतःची सौदर्यदृष्टी घालतो. जिथे नजर
जातेय तिथे गळा जात असेल तर...
अजून काय हवं Happy

ती नजर सुरुवातीला घराण्यानं, गुरुनं समृद्धं केलेली असते. मग कलाकार त्यात स्वतःची सौदर्यदृष्टी घालतो. जिथे नजर
जातेय तिथे गळा जात असेल तर...>>>
वाह दाद वाह !
जर गळा जात असेल तर.... हे अगदी कुमारांचंच वाक्य !! Happy

चैतन्य आणि दाद तुमचे मनापसुन धन्यवाद.
"भिन्न षड्ज" ची पारायणे झाली. खूप सुंदर. त्यात किशोरीताईनी बिभसाची श्रुती काय मस्त एक्स्प्लेन केलीय. दुसर कुठला बिभास हल्लि ऐकवतच नाही त्यामुळे!
मुक्काम पोस्ट वाशी आणि स्वरर्थ रमणी हे दोन्ही वाचायचे आहेत, पण कुठे मिळाले नाहीत मला Sad
आता भारतात आल्यावर परत चौकशी करेन नक्की.

स्वरार्थरमणी... जरा जपून. ठरवून अभ्यास करायचाच... करायलाच हवा... अशा (सु)दृढ विचारानंतरच वाचता येऊ शकेल इतकं जड आहे पुस्तक>>>>>> वाचायची इच्छा अजुन प्रबळ झाली. Happy

ती नजर सुरुवातीला घराण्यानं, गुरुनं समृद्धं केलेली असते. मग कलाकार त्यात स्वतःची सौदर्यदृष्टी घालतो. जिथे नजर
जातेय तिथे गळा जात असेल तर...>>>> अगदी सुंदर.

कुमार गंधर्वांचा हा भूप काय मस्तय. "जबसे" काय मस्त म्हटलय.

https://www.youtube.com/watch?v=uh0JG0JhiPk

परत तोच मुद्दा Proud किशोरीबाइंचा पण भूप वेगळा. काहीतरी अजब देणगी घेउन आलेली माणसे ही!

<ती नजर सुरुवातीला घराण्यानं, गुरुनं समृद्धं केलेली असते. मग कलाकार त्यात स्वतःची सौदर्यदृष्टी घालतो. जिथे नजर
जातेय तिथे गळा जात असेल तर..<>
वा वा. दादचे दाद घेणारे वाक्य

कुमार श्रोत्याना स्वरान्च्या त्रिमितीतुन बाहेर काढतात . बन्दीशीचा एक पूर्ण आक्रुतीबन्ध एक्दम -अचानक समोर ठेवतात. स्वर ; लय ; तान ; आलाप हे एककमेकात मिसळून गेलेले असतात. ऐकताना राग , स्वर , कोमल - शुध्ध - , चलन या सगळ्या परिमाणान्चा पूर्ण विसर पडतो. एक सुन्दर स्वराक्तुतीचा अनुभव होत राहतो.
मी "राजन अब तो आ" जेव्हा ऐकले तेव्हा याची प्रचिती आली होती. नन्तर गुणगुणताना अचानक लक्शात आले कि हा तर नन्द आहे !
आपण आपली पारम्पारिक बुद्धी विसरून त्यान्च्या द्रुश्टीतूनच या रागाकडे पहात राहतो.
कदाचित मला नीट मान्डता येत नाहिये शब्दात.

पशुपतजी तुम्ही काय म्हणताय ते लक्श्यात येतय. तेच मी म्हणतोय कि या लोकानी संगीताला खर्‍या अर्थाने समजुन गायल. किशोरीताई म्हणतात तो नंद "आ जा रे बालमवा" हे गुणगुणताना पण अशीच प्रातिक्रिया येते की अरे हा तर नंद, पण किती वेगळा आणि भावनेच्या वेगळ्या छटा असणारा.
किशोरीताईन्च्या नंद मधे विरहाच दु:ख आहे. आणि आ जा रे अस जरी ओळ असली तरी बालम आता परत कधीही भेटणार नाही हे मनात कुठे तरी महिती असल्याने विरह अजुन गहिरा होतो.
याउलट कुमारांच्या नंद मधे श्रुंगार आहे, लडिवाळपणा अस मला वाटत. म्हणजे "राजन" ची यायची वेळ झाली आहे म्हणुन त्याच्या भेटीसाठी प्रेयसी आतुर आहे. तो आत्ता येईल आणि मग मी त्याच्यावर खोटं खोटं रुसेन वगैरे पुढचे लाडात येण्याचे भाव पण त्याच्यात आहेत.
हे माझ वैयक्तिक मत आहे म्हणजे. मला हे असे भाव वाटले. प्रत्येकाला ह्या नंद मधे असेच भाव दिसतील असे नाही पण.

अरे कुणाला उ. अब्दूल हलीम जाफर खॉं साहेबांचा 'कीरवाणी' मिळाला तर शेअर कराल का?
३० मि. ची LP आहे. त्यात सुरवातीच्या आलापात शुध्द मध्यमाची एक जीवघेणी जागा घेतलीये त्यांनी..
आणि नंतर गत पण लाजवाब आहे..
चै.: तु बघणार होतास ना रे?

कुलु ;
तुमचा विचारच मी विषद करत होतो.
मला आणखि एक जाणवलेली गोष्ट म्हणजे कुमार कोमल आणी तीव्र स्वर लावताना खुप वेगळ्या श्रुतीन्चे वापरतात. उदाहरण द्यायचे तर भीमपलास मधला त्यान्चा कोमल निषाद अतिशय उन्च असतो. त्यामुळे भीमपलास चे व्यक्तिमत्वच बदलून जाते. हा त्यान्चा आभ्यास आणी विचार ठिकठिकाणी जाणवत राहतो. त्यान्च्या बन्दिशिन्ची लयही वेगळी असते.आपल्याला दिसणारा त्यान्चा भीमपलास अनोळखी ; नवा ; वेगळा भासतो तो त्यामुळे.
(वेगळ्या श्रुतीन्च्या वापरामुळे ; कुमारान्ना हार्मोनियम साथ करणार्याला षड्ज धरून बसावे लागते. हेही तुमच्या लक्षात आले असेल )

वेगळ्या श्रुतीन्च्या वापरामुळे ; कुमारान्ना हार्मोनियम साथ करणार्याला षड्ज धरून बसावे लागते. हेही तुमच्या लक्षात आले असेल>>>
मध्यंतरी पं कैवल्यकुमार गुरव यांच्या एका कार्यक्रमाचे निवेदन करण्याची संधी मिळाली होती.
कार्यक्रमाआधी ग्रीनरूममध्ये त्यांना भेटायला आप्पा दांडेकर नावाचे एक बुजुर्ग तबलावादक आले होते.
ते कैवल्यकुमारांच्या वडिलांना (पं संगमेश्वर गुरव यांना) तबला संगत करायचे. त्यांच्या बोलण्याचा काही अंश ह्यानिमित्ताने आठवला म्हणून लिहितो.

"पाश्चात्य स्वरपट्टया आल्याने आजकाल गायक त्यांच्या नैसर्गिक आवाजात गातच नाहीत असे वाटते.
काळी २ म्हणा पांढरी ४ म्हणा ... हार्मोनियमवर वाजणारा स्वर आणि माझा नैसर्गिक स्वर ह्यात फरक पडणारच.
आज माझा आवाज नैसर्गिकपणे काळी २ (हार्मोनियमच्या) च्या थोडा कमी लागतोय, हे मला कळत असूनही मी का म्हणून हार्मोनियमच्या पट्टीत गायचे? आधी सारंगी वापरत तेव्हा हा प्रश्न येत नसे. ऐकणार्‍यालाही उत्तम साथसंगत ऐकल्याचे समाधान मिळत असे.
तुमचे वडील तर त्या त्या दिवशी त्यांचा जो स्वर असेल त्यात गायचे. एकदा आम्ही समुद्रकिनारी गेलो होतो. खाण्याचे डबे वगैरे घेऊन. समुद्राची गाज ऐकून ते म्हणाले... "आहा, काय मस्त लागलाय पांढरी ४ चा तानपुरा" असं म्हणून गायला सुरुवात केली.मला चक्क खाण्याच्या डब्यावर ताल धरायला सांगितला होता. आठवलं की अजून अंगावर काटा येतो."

कुलु, विभास रागाची ती लिंक दे ना तिथे तू ऐकलास? मी विभास म्हणतो. विभास म्हणजे प्रकाश. सा रे ग प ध सा.. सा ध प ग रे सा! खूप सुंदर राग आहे आणि मला गाता येतो Happy

कुमार गंधर्वांचे गाणे वेगळ्याच ढंगाचे आहे. त्यांच्या गायकीतून एकदा राग वेगळा वाटू शकतो. कारण त्यांना गळ्याचा त्रास होतो. त्यामुळे त्यांनी त्यांचा गळा त्यांच्या तब्येतीनूसार वाकवला. भीमसेन जोशींची गाणी ऐकताना देखील हा अमुक राग किती वेगळा आहे असे वाटते. ही लोक आपल्या ढंगाने पुढे गेली आहेत. माझे गुरुजी खूप सुंदर गातात आणि शिकवतात. त्यांचे ज्ञान इतके छान आहे ना त्यांनी शिकवलेले राग कधीच चुकत नाहीत.

बी, बिभास ची हि लंक पहा

https://www.youtube.com/watch?v=mXVYW_iVqS4

किशोरीताईंचा बिभास म्हणजे मौज आहे. दुसरा काही कानावर पडु नये अस वाटत त्यानंतर!

स्वरर्थरमणी आणि मुक्काम पोस्ट वाशी दोन्ही फ्लिप्कार्ट वरुन मागवले आहेत. बघु आता भारतात आल्यावरच वाचायला मिळणार.

ढीगभर आभार चिनुक्स आणि चैतन्य! Happy

http://www.cse.iitk.ac.in/users/hvs/Veena/lecdems.html

http://www.it.iitb.ac.in/~hvs/Veena/semester_series.html

वीणाताईंची काही लेक्चर्स, शास्त्रीय संगीताबद्दल! मला फार आवडलीत सगळी. सगळं बेसिक! वीणाताईंनी राग डेमॉन्स्ट्रेट केलेत.

(हे याच धाग्यावर डकवायचं कि दुसरीकडे कुठे? Uhoh कन्फ्युजन मुळे मी शास्त्रीय संगीत प्रश्नोत्तरे या धाग्यावर पण डकवलं)