रहमॅनिया

Submitted by नताशा on 16 August, 2012 - 15:12

ए आर रेहमान च्या सगळ्या भाषांतल्या संगीतावर चर्चा करण्यासाठी हा धागा. इथे दुवे शेअर करुया, एखाद्या गाण्यातली आपल्याला जाणवलेली गंमत इतरांना दाखवूया.
रहमॅनिया शब्द रैनाकडून साभार. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यो रॉक्स, धन्यवाद. आजचा कार्यक्रम पाहिला. मस्त मजा होती. सुरुवातीची १५ मिनिटं मिस झालीच तरी Sad "ये जो देस है तेरा" वाजवलं का? नेटवर पाहिलं मी.

रेहमानची हल्लीची गाणी (म्हणजे स्लमडॉग नंतरची साधारण) का कुणास ठाऊक तितकी अपील होईनाशी झालियेत. हे फक्त मलाच होतंय का?

त्याची बरीच गाणी आवडतात खरं तर... पण आत्ता डोक्यात दोन गाणी आहेत.
लगान मधलं 'ओरी छोरी' हिंदीतून इंग्लिश आणि इंग्लिश मधून हिंदीत किती सफाईदारपणे येतं गाणं ते. त्यातला पियानो त्याने स्वतः वाजवलाय. किती 'सूदिंग' आहे तो.
लगान मधली सगळीच गाणि छान आहेत खरं तर.

आणि दिल से मधलं 'जिया जले'. लता चा आवाज रेकॉर्ड करताना काही ट्रिक वापरली होती म्हणे त्याने ह्या गाण्यासाठी. (म्हणजे आहे तसाच वापरला नाहिये)
ह्यातली बासरी तर सुरेख आहेच. पण इंटरल्यूड्स मधलं व्हायोलीन आणि मृदुंगही फारच श्रवणीय आहेत.

रेहमानची हल्लीची गाणी (म्हणजे स्लमडॉग नंतरची साधारण) का कुणास ठाऊक तितकी अपील होईनाशी झालियेत. हे फक्त मलाच होतंय का? << चैतन्य अगदी.

एक दिवाना था मधली काही गाणी छानेत पण.

मला रहेमानची "झुठा ही सही" (मैय्या यशोदा वगळता) सिनेमाची गाणी आवडली नाहीत. आता लक्षातही राहत नाही.

जब तक है जान.. २०१२ मधला सगळ्यात मोठा अपेक्षाभंग Sad "चल्ला" आवडलं पण..
त्यावर उतारा म्हणून मी सध्या बॉम्बे आणि कन्डुकोन्डेन ऐकतेय रोज. (मागचे २ महिने Wink )

कन्डुकोन्डेन टायटल साँग>>हरिहरन अन महालक्ष्मी अय्यर चं बेस्ट गाणं असेल हे.
कोंजुम मैनक्कळे>> एकदम वेगळंच पण गोड्..साधना सरगमचं पहिलं तमिळ सुपरहिट असावं.

बाकी इथं वाचून पुन्हा "चिन्नम्मा चिळकम्मा" ऐकलं अन अतिशय आवडलं. आधी ऐकलं होतं तेव्हा इतकं आवडलं नव्हतं. कदाचित तेव्हा साथिया फीवर होता म्हणून असेल..

रां़झणाच्या गाण्यांना सलामी नाही मिळाली अजुन फॅन क्लब कडून ? :).
सध्या मला तुमतकॅनिया झालाय :).

'तुम तक' मधे जावेद अलीचा सुर अप्रतिम लगलाय , इर्शाद कामिल चे शब्द आणि रहमान ने वापर्लेला उत्कृष्ट वादवृंदाचा वापर!!
गाण्यातल्या 'उखडा उखडा मुखडा मुखडा' फास्ट बिट्स नंतर एकदम चाल बदलून जी ट्विस्ट दिलिये , जावेद अलीने गायलेला तो अंतरा भन्नाट जमलाय !!

नैनोकी घाट लेजा
नैनोकी नैय्या
पतवार तू है मेरी
तू है खेवैय्या
़जाना है पार तेरे
तू ही भंवर है
पहुंचेगी पार कैसे
नाजुकसी नैय्या ..

काय मस्तं वाटतं ऐकताना !!
(Btw, खेवैय्या म्हणजे काय ?)

थँक्स स्वाती!
ऐकून ऐकून चढतात रांझणा ची गाणी , रहमान च्या इतर बर्याच गाण्यां प्रमाणे :).
पण 'तुम तक ' डेंजर कॉकटेल आहे.. 'एकदा आवडल् कि त्याचा हॅंगओव्हर उतरता उतरणार नाही!
बनारसीया पण मस्तं !

मला रांझणा हुआ मै तेरा.. हे गाण जास्त आवडल.. आनि त्यात खुल्या मनाने नाचणार धनुष पण Happy
तुम तक पण मस्तच आहे Happy

रांझणा.. आवडलं होतं, तेच टिव्ही वर जास्त लागायचं.. डीजेने सांगितलं म्हणून तुम तक ऐकलं. सही वाटलं!
"तुम तक" हे शब्द किती वेळा किती प्रकारे गायलेत! रहमान खासियत! यातल्या काही ट्युन्स, एखादी तान मधेच "फिरसे उड चला" ची आठवण करून देते. ते पण स्वातीने सांगितलं म्हणून मुद्दाम ऐकलं आणि जामच आवडलं होतं.
इन जनरल, रांझनाच्या गाण्यांमधे शह्नाई, सतार, (आणि काहीतरी घंट्या किंवा लहान झांजांसारखे पण वाटले मला) इ. वाद्यांनी बनारस ची वातावरणनिर्मिती मस्त जमलीये.

हो , शहनाई-सतार-घंगरु अस्सल भारतीय वाद्यं , बनारस ची वातावरण निर्मिती फार सुरेख केलीये रहमान नी !
झांजांचा वापर आहेच बहुतेक , कारण मेकिंग ऑफ 'तुम तक 'मधे सांगत होते कि हे गाणं भजनाचा फिल देणं आपेक्षित आहे !
प्रेमगीत असलं तरी ते मुळात एक भजन आहे , ते ऐकताना तुमचा प्रियकर-प्रेयसी आठवतील किंवा ज्याच्यावर्/जिच्यावर भक्ति आहे ते आठवतील :).

तुम तक सुरु होतं झांजांच्या तालस्त तेंव्हा थोडी ' इष्क बिना क्या मरना यारा ( फिमेल व्हर्जन)' आठवलं , नंतर शहनाईची सुरावट आणि ' नैनोंके घाट लेजा' वेळी थोडी ' ये जो देस है तेरा' ची आठवण आली !
अभय देओल च्या पॉलिटिकल रॅलीच्या वेळी येणारं ' तू मूनशुदी' ऐकताना युवाच्या अदनान सामीने गायलेल्या 'उसकी मर्झी' ची प्रचंड आठवण आली.

>>>अभय देओल च्या पॉलिटिकल रॅलीच्या वेळी येणारं ' तू मूनशुदी' ऐकताना युवाच्या अदनान सामीने गायलेल्या 'उसकी मर्झी' ची प्रचंड आठवण आली

डिज्जे, मला तर युवा मधलंच धक्का लगा बुका आठवलं कारण चाली बरोबर तिथे पण पोलिटीकल बॅग्राउंड आहे Happy

मला तर युवा मधलंच धक्का लगा बुका आठवलं >> +१
रांझणाची गाणी अजून आवडायचीत. >> +१ Wink
अजून तरी माझ्यावर कायपोछे/अमित त्रिवेदी सवार आहेत.

प्रत्येक गाणं कुठे मॅक्स? रेहमानकडे जसे अनेक नवे आवाज असतात तसे त्याच्याकडे पण आहेत की. तोची रैना, श्रुती पाठक, जोए बरुआ हे एकाहून जास्तवेळा वापरलेले. त्याशिवाय कायपोछे मध्ये दिव्यकुमार, इशकजादे मध्ये जावेद अली वगैरे पण आहेत. पण हां, किमान अर्धी तरी गाणी तो स्वत: म्हणतो हे खरंय Happy पण मला आवडतो त्याचा आवाज. "नयन तरसे" मधला आवाज अन "मांजा" मधला किती वेगळा वाटतो. व्हेरी इनोव्हेटिव्ह.

"नयन तरसे" मधला आवाज अन "मांजा" मधला किती वेगळा वाटतो. व्हेरी इनोव्हेटिव्ह. >>+१. वेगवेगळे लोक गातात कि त्रिवेदिकडे. आणी गाण्यांची range कसली अफलातून आहे.

डिजे, तो अजून veteran नाही झालाय. त्याच्या फॅक्लमध्ये बोलणार तरी कशाविषयी? मोजून फक्त १७० गाणी केलियेत त्याने अजुन. पण त्याच्या डोक्यावर रेहमान नी हात ठेवल्यासारखा वाटतो मला Happy

चर्चा करण्यासारखी आहेत बरीच ' हटके' गाणी त्याच्या छोट्याशा करिअर मधेही :).
रेहमान चा प्रभाव वाटतो खरा, कायपोछे मधे तर खूपच !
असो, बाकी फॅ क्ल काढा , तिथे करु चर्चा :).

मला रेहमानची जवळपास सगळीच गाणी आवडतात्.(जब तक है जान चे सोडून).
झुठा ही सही चं (call me dil call me baby)टायटल साँग मस्त आहे. रॉकस्टारचे तर सगळेच गाणे अफलातून आहेत.
सध्या तरी रांझणाच तुम तक अक्षरशः चढलं आहे!

'रांझणा' मधलं 'तु मन शुदी' पहिल्यांदा ऐकलं आणि रेहमान इज बॅक असं वाटलं. तेच गाणं कायम ऐकत/गात राहायचो. नंतर 'पिया मिलेंगे' आवडायला लागलं, त्यातला हाय टेंपो अचाट आहे, मग 'बनारसिया' पाहिलं टीव्ही वर. 'तुम तक' / 'रांझणा'/ 'नजर लाये ना' फिरून फिरून आवडायला लागली. 'ऐसे ना देखो' हे थोडसं 'जाने तू या जाने ना' च्या टायटल साँगह्च्या वळणावर वाटलं.
एकूणच रांझणाची सगळीच गाणी आवडेश.
आणि 'इर्शाद कामिल चे शब्द' फार भारी. त्याचा पन फॅन क्लब लवकरच होवो तयार Happy

Pages