संगीत
मॅनहातन्/न्यूयॉर्कमधील रॉक/क्लासिकल/संगीतप्रेमींसाठी असलेले स्थळ
नमस्कार,
मला चांगल संगीत फार आवडत. मग ते न कळणार ईंग्रजी का असेना. मागे एकदा मी सबवेहून हिल्टनला परत जात होतो तर वाटते एक समुदाय गोलाकार उभा होता. काहीजण खूपच दंग होऊन सुरात सुर मिळवून गात होते. जो खरा गायक होता तो पैसे मिळावे म्हणून मधे गात होता. मला तो प्रसंग इतका तरल वाटला की मी आतूनबाहेरुन अगदी मोहरुन सुखावून गेलो. घरी येऊन बघतो तर मी पाश्चात संगीताच्या प्रेमात पडलो होतो
इथे कुणाला मॅनहॅतन आणि न्यूयॉर्कमधील सांगितिक स्थळे माहिती आहेत का?
आहे मराठीत माझ्या
आहे मराठीत माझ्या
*----------------------*
आहे मराठीत माझ्या, गोडवा अमृताचा
आहे मराठीत माझ्या, गारवा सांवल्यांचा
*
कुठे लावणी तर कुठे भक्त गातो
आहे मराठीत माझ्या, ताजवा ताटव्यांचा
*
असो कोकणी वा, वऱ्हाडी राहणारा
आहे मराठीत माझ्या, चांदवा पौर्णिमेचा
*
अशी वाहते, ना थांबते कधी ती
आहे मराठीत माझ्या, कालवा निर्झरांचा
*
कुणा काय वाटे, पर्वा आहे कुणाला
आहे मराठीत माझ्या, थोरवा अंबराचा !
-अशोक
(जागतिक मराठी दिना निमित्तानं माझी एक जुनी कविता )
या (बंगाली) गाण्याचा अर्थ सांगाल का?
नमस्कार,
आज मुलीच्या डान्स क्लास चा कार्यक्रम झाला..त्यात हेमंत कुमार यांचे एक बंगाली गाणे (लोकगीत) ऐकण्यात आले आणि डोक्यात अडकुन बसले.शब्दांचा अर्थ नीट कळला नाही. पण अतिशय गोड गाणे आहे. थोडे डिग केल्यावर कळले..की मुळ गाणे सलिलदांचे आहे आणि ते १९५६ साली आवाज या चित्रपटात लताच्या आवाजात त्यानी केले आहे. (तेही ऐकले पण या गाण्याची मजा आली नाही).
http://www.youtube.com/watch?v=t33Eg-uAG5Y
कोणाला अर्थ कळत असेल तर लिहाल का?
धन्यवाद.
तबला वर्ग
कोथरुड मध्ये तबला वर्ग कुठे आहेत... माहिती असल्यास प्लीज सांगा...
तबला वर्ग
कोथरुड मध्ये तबला वर्ग कुठे आहेत... माहिती असल्यास प्लीज सांगा...
..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ७)
मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)

उत्साहाने आणि नव्या दमाने आपला खेळ सुरू राहूद्यात.
गाओ मॅरॅथॉन २०१४ : ..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ६)
मायबोलीकर, सर्व प्रथम तुम्हा सगळ्यांना नविन वर्षाच्या शुभेच्छा!
गाओ, अर्थात गाणे ओळखा!.
तर तो/ती कोणतं गाणं म्हणेल? या धाग्यांतर्गत आज दिवसभर एक कोड्यांची मॅरॅथॉन आयोजित केली आहे. आज भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजल्यापासून दर तासाला नवनविन कोडी इथे दिली जातील. तुम्हा सगळ्यांना ही कोडी डीकोड करायची आहेत. म्हणजे त्यातली गाणी ओळखायची आहेत.
बक्षिसं तर आहेतच अर्थात.....
तर थोड्याच वेळात मॅरॅथॉन सुरू होत आहे. लक्ष ठेवा! लक्ष ठेवा!! लक्ष ठेवा!!!
- टीम : जिप्सी, स्वप्ना_राज, माधव, मामी