लंडनचे भिकारी आणि स्लमडॉग मिलेनिअर

Submitted by अंड्या on 2 June, 2013 - 04:41

आता जब तक है जान बघतोय.. लंडनचे चकचकीत पॉश रस्ते आणि त्यावर गिटार वाजवत गाणे म्हणत पैसे गोळा करणारा शाहरुख.. येणारी जाणारी पब्लिक निव्वळ त्याला पैसेच देत नव्हती तर टाळ्या वगैरे ही देत होती.. मागेही शाहरुखच्या एका चित्रपटात असाच सीन होता, फरक इतकाच की त्यावेळी तो गाणार्‍या भिकार्‍याला टाळी देऊन पुढे गेला.. या उलट आपल्या कडे ट्रेनमधील गाणारे भिकारी निव्वळ इरिटेट करतात, अन पैसे मागायला पायाला येऊन हात लावतात तेव्हा कसली किळस वाटते म्हणून सांगू..

एकीकडे स्लमडॉग मिलेनिअर सारख्या चित्रपटांत विदेशी दिग्दर्शक येऊन आपल्या येथील अंगावर येणारी गरीबी अन रोगराई दाखवतात तर दुसरीकडे आपण तेथील भिकार्‍यांनाही एक दर्जा देतो.. हा एवढा मोठेपणा फक्त भारतीयच दाखवू शकतात.

यश चोप्रांना या अंड्याचा सलाम !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईब्लिस
असहमत, शाहरुखला ईंग्लिश बोलता येत नाही असे दाखवले होते चित्रपटात, तरी टाळ्या मिळता होत्या.
तुम्हाला असे म्हणायचे आहे का की त्याला फ्ल्यूएंट ईंग्लिश येत असते तर लोकांनी डोक्यावर नाही तर किमान कडेवर घेतले असते !

उदयन,
कसले विभाग, कूटप्रश्न, प्रवास, लेखन, तत्त्वज्ञान वगैरे वगैरे का?
उगाच का वाढवू? ज्या पैलूंवर चर्चा अपेक्षित आहे तसेच ज्या दृष्टीकोणातून पाहिल्यास हा प्रश्न सोडवता येईल, ज्या ज्या विभागांना हा प्रश्न स्पर्शून जाईल अश्यांचाच समावेश केला आहे.