संगीत

ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका

Submitted by फारएण्ड on 26 June, 2014 - 12:02

पावसाळा आला आहे. आता कोणत्याही क्षणी भारतात मॉन्सून, व सर्वत्र पावसाच्या कविता सुरू होतील. आम्हाला पावसाबद्दलच्या कवितांचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याला दिल्या जाणार्‍या त्याच त्याच उपमांना घाबरून आम्ही वैचारिक छत्री मे महिन्यापासून उघडून बसलो आहो. हा प्रॉब्लेम पावसापुरता मर्यादित नाही. उपमांपासून भले भले सुटलेले नाहीत. "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे". असे कोणीतरी गाण्यात म्ह्णताना उपमा नाही करत करत पुलंच्या रावसाहेबांच्या शिवीप्रमाणे पुढच्याच ओळीत एक निसटली आहे हे त्यांच्याही लक्षात आलेले नसावे. तसेच उपमांप्रमाणेच ठोकळेबाज वाक्ये व घटनांचाही सध्या कथांमधे प्रादुर्भाव झाला आहे.

शब्दखुणा: 

मनी वाहे भरुनी आनंद ....

Submitted by पुरंदरे शशांक on 15 May, 2014 - 00:08

मनी वाहे भरुनी आनंद ....

आज सकाळचीच गोष्ट. सकाळी सकाळीच कंपनीची बस पकडावी लागते. बसमधे जरा स्थिर-स्थावर झाल्यावर सवयीने मोबाईलला इअर फोन लाऊन कधी आकाशवाणी वरचे संगीत -सरिता इ. कार्यक्रम तर कधी मस्त मोबाईलवर डाऊन लोड केलेली गाणी ऐकणे असा कार्यक्रम असतो. कोणी हातात पेपर(वर्तमानपत्र) दिलाच तर जरा त्यातील बातम्यांवर नजर फिरत असते पण कानांवर काय पडतंय याची जास्त उत्सुकता असते. कारण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर सकाळी आठच्या सुमारास जी २-३ भक्तिगीते लागतात त्यात कधी कधी लॉटरीच लागते अगदी ...

घराणेशाहीत एक 'स्वतंत्र घराणे'

Submitted by आशयगुणे on 27 April, 2014 - 06:00

परवा म्हणजेच २४ एप्रिल रोजी सायनला एक कार्यक्रम ऐकायला गेलो होतो. निमित्त होते 'दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार' वितरण. अर्थात आम्ही त्यानंतर आयोजित केलेले उस्ताद झाकीर हुसैन ह्यांचे तबला वादन ऐकायला म्हणून गेलो होतो. परंतु आधीचा पुरस्कार प्रदान सोहळा न बघता नुसते तबला वादन ऐकायचे असे करणे आम्हाला पुरस्कार मिळणाऱ्या दिग्गजांचा अपमान होईल असे वाटले आणि त्यामुळे बरोब्बर वेळेत पोहोचणे आम्ही चुकवले नाही.

रंजिश ही सही.................

Submitted by अनघा आपटे on 14 March, 2014 - 12:24

रविवारची सकाळ …प्रसन्न सकाळ म्हणू हवे तर. अदल्या दिवशी संध्याकाळीच बऱ्याच दिवसांनी जुना ग्रुप भेटल्यामुळे मूडही तसा आपसूकच छान बनलेला होता. पेंडिंग कामे संपवावीत म्हणून सिटीत जायचा प्लान ठरलेला, लेकीचा जर्मनचा क्लास ही होताच तिला तिथे सोडून कामे संपवावी आणि परत येताना तिला घेऊन परत यावे हा उद्देश.

मॅनहातन्/न्यूयॉर्कमधील रॉक/क्लासिकल/संगीतप्रेमींसाठी असलेले स्थळ

Submitted by हर्ट on 6 March, 2014 - 09:46

नमस्कार,

मला चांगल संगीत फार आवडत. मग ते न कळणार ईंग्रजी का असेना. मागे एकदा मी सबवेहून हिल्टनला परत जात होतो तर वाटते एक समुदाय गोलाकार उभा होता. काहीजण खूपच दंग होऊन सुरात सुर मिळवून गात होते. जो खरा गायक होता तो पैसे मिळावे म्हणून मधे गात होता. मला तो प्रसंग इतका तरल वाटला की मी आतूनबाहेरुन अगदी मोहरुन सुखावून गेलो. घरी येऊन बघतो तर मी पाश्चात संगीताच्या प्रेमात पडलो होतो Happy

इथे कुणाला मॅनहॅतन आणि न्यूयॉर्कमधील सांगितिक स्थळे माहिती आहेत का?

विषय: 

आहे मराठीत माझ्या

Submitted by डॉ अशोक on 27 February, 2014 - 00:54

आहे मराठीत माझ्या
*----------------------*

आहे मराठीत माझ्या, गोडवा अमृताचा
आहे मराठीत माझ्या, गारवा सांवल्यांचा
*
कुठे लावणी तर कुठे भक्त गातो
आहे मराठीत माझ्या, ताजवा ताटव्यांचा
*
असो कोकणी वा, वऱ्हाडी राहणारा
आहे मराठीत माझ्या, चांदवा पौर्णिमेचा
*
अशी वाहते, ना थांबते कधी ती
आहे मराठीत माझ्या, कालवा निर्झरांचा
*
कुणा काय वाटे, पर्वा आहे कुणाला
आहे मराठीत माझ्या, थोरवा अंबराचा !
-अशोक

(जागतिक मराठी दिना निमित्तानं माझी एक जुनी कविता )

या (बंगाली) गाण्याचा अर्थ सांगाल का?

Submitted by mansmi18 on 16 February, 2014 - 15:28

नमस्कार,

आज मुलीच्या डान्स क्लास चा कार्यक्रम झाला..त्यात हेमंत कुमार यांचे एक बंगाली गाणे (लोकगीत) ऐकण्यात आले आणि डोक्यात अडकुन बसले.शब्दांचा अर्थ नीट कळला नाही. पण अतिशय गोड गाणे आहे. थोडे डिग केल्यावर कळले..की मुळ गाणे सलिलदांचे आहे आणि ते १९५६ साली आवाज या चित्रपटात लताच्या आवाजात त्यानी केले आहे. (तेही ऐकले पण या गाण्याची मजा आली नाही).

http://www.youtube.com/watch?v=t33Eg-uAG5Y

कोणाला अर्थ कळत असेल तर लिहाल का?

धन्यवाद.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - संगीत