अमित त्रिवेदी आवडतो?

Submitted by नताशा on 25 June, 2013 - 15:25

इथे अमित त्रिवेदीविषयी सुरु झालेली चर्चा पुढे नेण्यासाठी हा धागा.
मॅक्स | 25 June, 2013 - 22:30
नताशा अमित त्रिवेदी चांगला आहे पण प्रत्येक गाणं तोच का म्हणतो काय माहिती?

प्रतिसाद नताशा | 25 June, 2013 - 22:46
प्रत्येक गाणं कुठे मॅक्स? रेहमानकडे जसे अनेक नवे आवाज असतात तसे त्याच्याकडे पण आहेत की. तोची रैना, श्रुती पाठक, जोए बरुआ हे एकाहून जास्तवेळा वापरलेले. त्याशिवाय कायपोछे मध्ये दिव्यकुमार, इशकजादे मध्ये जावेद अली वगैरे पण आहेत. पण हां, किमान अर्धी तरी गाणी तो स्वत: म्हणतो हे खरंय पण मला आवडतो त्याचा आवाज. "नयन तरसे" मधला आवाज अन "मांजा" मधला किती वेगळा वाटतो. व्हेरी इनोव्हेटिव्ह.

संपादन प्रतिसाद असामी | 25 June, 2013 - 22:57
"नयन तरसे" मधला आवाज अन "मांजा" मधला किती वेगळा वाटतो. व्हेरी इनोव्हेटिव्ह. >>+१. वेगवेगळे लोक गातात कि त्रिवेदिकडे. आणी गाण्यांची range कसली अफलातून आहे.

प्रतिसाद दीपांजली | 25 June, 2013 - 23:01
लोकहो,
रहमान फॅ क्ल वर अमित त्रिवेदी चर्चा नको , त्याचा वेगळा फॅ क्ल काढा

प्रतिसाद नताशा | 25 June, 2013 - 23:04
डिजे, तो अजून veteran नाही झालाय. त्याच्या फॅक्लमध्ये बोलणार तरी कशाविषयी? मोजून फक्त १७० गाणी केलियेत त्याने अजुन. पण त्याच्या डोक्यावर रेहमान नी हात ठेवल्यासारखा वाटतो मला

संपादन प्रतिसाद दीपांजली | 25 June, 2013 - 23:10
चर्चा करण्यासारखी आहेत बरीच ' हटके' गाणी त्याच्या छोट्याशा करिअर मधेही .
रेहमान चा प्रभाव वाटतो खरा, कायपोछे मधे तर खूपच !
असो, बाकी फॅ क्ल काढा , तिथे करु चर्चा .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आवडतो Happy
'इकतारा' पासून. देव डीची गाणी आधी नव्हती आवडली पण नंतर एकदम पाथ्-ब्रेकिंग वाटली.
नो वन किल्ड जेसिका मधलं सुरुवातीचं 'दिल्ली दिल्ली' पण मस्त वाटतं. 'स्ट्रायकर'मधलं पण एक आवडलं होत गाणं. 'लुटेरा'ला पण त्याचे म्युसिक आहे ना? अजून ऐकायची आहेत.

देव डी , कायपोछे, वेक अप सिद , इंग्लिश विंग्लिश ची गाणी खूप आव्डतात !
इष्कझादे खूप अपिल नाही झाली झल्ला वला सोडून !

देव डी >> हा एक महान प्रकार आहे. १८ वेगवेगळ्या Genres ची गाणी. rock, पंजाबी, fusion, classical, Bhojpuri, Bangla, Rajasthani .... अतिशय extreme प्रकारचे संगीत आहे.

आताशा नाही आवडत. इकतारा आणि देव डी आवडले होते.

५०'s चे संगीत म्हणून जे तो सध्या खपवतोय ते अजिबात ५०'s चे वाटत नाहीये. तसेही मला एकुणातच 50's मधला आर्डिबर्मन हा कॉन्सेप्ट काय आहे ते समजले नाहीये. नुसती गाणी छान आहेत. 'अनकही' आवड्ले पण ५०'s च्या संगीताचा फील त्याला नाही. ७० चे म्हणले तर ठिके.

तसेच 'उलझा लेंगे सुलझे रिश्तो का मांझा' चाल आणि शब्द जबराट पण स्वत: का गायला ते समजले नाही. पण ते गाणे मला आवडते. फक्त त्याने स्वत: न गाता मोहित चौहान ला वगैरे द्यायला हवे होते असे वाटुन गेले.

इश्कजादे ऐकले नाहीये आणि उडान आठवत नाहीये. सिनेमा आठवतोय, गाणे आठवत नाहीये. घरी जाउन ऐकेन नीट विकांताला.

हा बीबी होता हे माहितच नव्हते ..

आतापर्यंत मोस्टली आवडलेली आहेत त्याची गाणी ..

बॉलीवूड मध्ये आमीर पासून सुरूवात झाली हे माहित नव्हतं .. त्यातलं ते एक लौ मला आवडतं ..

डीजे, परेशान आवडलं नाही का .. हुआ छोकरा जवाँन रे ही आवडलं ..

मी पण ह्या क्लबात! लुटेरा, अय्या, इंग्लिशविन्ग्लीश, देव-डी, क्वीन - सगळी गाणी! इकतारा, जल्लावल्ला!
जाम भारी, एकदम हटके आणि ऐकून ऐकून जास्ती जास्ती आवडायला लागणारी अशी गाणी असतात अमित त्रिवेदीची. आधी जेव्हा माहिती नव्हतं तेव्हा "अरे ह्या गाण्यात काहीतरी मज्जा आहे बरं का!" असं जेव्हा वाटायचं तेव्हा ते नेमकं अमित त्रिवेदीचं गाणं असायचं! शिवाय त्याचं पार्श्वसंगीत देखिल एक नंबर असतं. He arranges his own songs. He'll have his own genre of songs like ARR in the long run.
Bombay Velvet ची गाणी ऐकली नाहीयेत अजून मी. कोणी ऐकली का?

अर्रे!! मित, मी पण आजच बघितला हा व्हिडिओ आणि इकडे लिहिणारच होते. धन्यवाद व्हिडिओ टाकल्याबद्दल.
मागे कोणीतरी म्हणत होतं ना की हल्ली लोकसंगीतच नसतं फिल्मी संगीतात. तेव्हाच ही लिस्ट फेकता आली असती तर छान झालं असतं.

मला लुटेरा, कैपोचे, प्र चं ड आवडतात.

गुफ्तगू नावाचा एक कार्यक्रम आहे राज्यसभा टीव्ही चा. त्यात अमित त्रिवेदीची मुलाखत घेतली आहे जी यु ट्युब वर बघा....मस्त माहीती मिळते !गुफ्तगूचे इतर इंटरव्यु पण फार अप्रतिम आहेत.

नताशा, काय जबरी विडिओ शेअर केलास. दिल भर गया.

@गावकर, गुफ्तगूमधील मुलाखती खरेच फार मस्त असतात.

टण्या, विडिओ मित नी टाकलाय. Happy
पण खरंच एकदम मस्त आहे.
ड्रीमम वेकपम पण सुपर आहे.. पुर्ण गाणं च फनी आहे पण त्यात ते मधेच ओकटी, रंडु, मुडु, नालु (तेलुगु नंबर्स) फार फनी वाटतं. Proud

तो संपूर्ण व्हिडिओच भन्नाट आहे. सुरु झाल्यापासून मराठी गाणं कुठलं असेल असा विचार करत असतानाच त्या आजीबाई येऊन 'नवराई माझी ' गाऊन जातात ! साॅलीड !!!

वरचा व्हिडीयो बघितला नाही पण गाण्यात त्याच्या आईचा आवाज आहे अशी समजूत होती माझी.

बरेच दिवसांनीं हा बीबी वर आला. अमित त्रिवेदीचंच माझं अजून एक आवडतं गाणं म्हणजे आमिर पिक्चर मधलं "एक लौ". काल अन्यत्र ह्यातल्या एका ओळीबद्दल पोस्ट लिहीलं होतं ते परत इकडे लिहीते.

त्या "इक लौ" मध्ये अशी ओळ आहे (लिरीक्स कोणाचे आहेत माहित नाही):
धूँप के उजाले से ओंस के प्याले से खुशीयाँ मिले हमको
ज्यादा माँगा है कहाँ सरहदें ना हो जहाँ दुनिया मिले हमको

दवाचा एक अख्खा प्याला लागणे खुशी मिळण्याकरता हे अति नाही का? की ओंस का प्याला म्हणजे दव पडणे असा ढोबळ अर्थ आहे त्याचा?

सशल मला वाटतं की ओस का प्याला म्हणजे दवाचा एक बिंदू.. म्हणजे केवळ कोवळ्या उन्हाने आणि दवबिंदू पिऊन आम्हाला सुख मिळतं सीमारेषा नसलेलं जग आम्ही कुठे मागतो आहोत.
मी गाणं ऐकलेलं नाही पण ह्या ओळी वाचून असा अर्थ असावा असं वाटतं.

जिज्ञासा, थँक्स. तू म्हणतेस तसाच अर्थ असणार त्याचा पण तो "प्याला" शब्द मला मिसलिडींग वाटत होता. (काव्य समजणं कठिणच बुवा!)

हा धागा इतका दिवस कुठे होता ???
मी पण ह्या क्लबात.
मला देव-डी पासुन सगळी गाणी आवडायला लागली. त्यावेळेस मी आवर्जुन कोण संगीतकार आहे हे पाहिल.

मिर्ची अवार्डस मधला परफाॅरमन्स:
https://youtu.be/1EtI0KjXfdk

खुप खुप धन्यवाद ह्या लिंकसाठी.किती सुपर्ब परफॉरर्मन्स आहेत.इव्हन त्या कोरस मधले लोक्स इतके सुपर्ब आहेत की त्यांना पाहुन मला खुप छान वाटतय.हापिसात नसते तर नक्कीच नाचले असते. Proud
क्युट.मेड माय डे.

हायला! कालच हा व्हिडीओ फेबुवर शेअर केला मी. पोस्ट-रहमान जनरेशन मधला सगळ्यात भारी संगीतकार आहे हा.
हा बघा अजून एक व्हिडीओ, https://www.youtube.com/watch?v=6VTyRJS6KQM

Pages