तुझ्या नी माझ्या भेटी गाठी
डोळ्यांत सखे दिठी दिठी
पहा झाडां वर सांजवेळी
काजव्यांचे ग दिवे किती
मन वेल्हाळ, वेल्हाळ मती
हृदयांत चांदण्यांचे झरे किती
एकच उत्तर सखे मम ओठी
तरी विचारतेस मज प्रश्न किती
प्रारब्ध संचित माझे का असे
जवळी तु, तरी तूच दुर किती
सोमवार ०१/०४/२०२४ ,०५:५६ PM
अजय सरदेसाई (मेघ )
दिठी दिठी = नजरेतल्या नजरेत, द्रुष्टाद्रुष्टी
वेल्हाळ = वेडं
मती = बुद्धी
प्रारब्ध = नशीब , Destiny
संचित = साठवलेले , जमा झालेले
१. आधी माझ्याकडे पेंडींग पुस्तकं नसायची. लायब्ररीतून आणायचो, वाचून झाली की परत दुसरी आणायचो. पण मग हळूहळू हावरटासारखा स्टॉक करायच्या मागं लागलो. दिसलं, चांगलं वाटलं की आणायचं. वाट बघायला नको, हक्काचं आपल्याजवळ असलं की हवं तेव्हा वाचू शकतो, हे समर्थन.
आता होतासी
लपलासी कोठे
सख्या पांडुरंगा
शोधू तुज कोठे
लपंडाव देवा
का खेळिसी
पोच माझी नाही
तुज शोधू मी
मन ना निर्मल
बुद्धी ना विमल
मी दुर्बल सर्व ठायी
कागा विठाई परिक्षिसी
धरी हात आता
का देसी चिंता
भवार्ण तरावया
मज बळ नाही
जरी तु देवा
आला न भेटीस
नाव रख्माईस
बघ सांगेन मी
या उपरी जरी
तू न कृपा करी
चंद्रभागा कुशीत
देवा जाईन मी
'मेघ' म्हणे देवा
तिढा सोडवा हा
खेळ तो मांडावा
किती तव भक्ताचा
परमात्मा परात्परू
पाविजे मज लौकरू
मी विश्वाचे लेकरू
प्रार्थी तुझे ठायी
तव चित्त चिदंबरू
काया ती अगोचरू
ते चक्षू सोम-सुर्यु
तुज देखिजे केवी
मज नको अष्ट सिद्धी
मज नको नव निधी
सदा जवळिक तुझी
देई कृपाळा
सहस्रसाराचा परिमळु
परमानंद आळुमाळु
मिळो दे रे कृपाळू
नित्य मज
तूची सदा सर्वकाळ
करशी माझा संभाळ
माझे तुची आभाळ
न करी आबाळ
बालकाची
आता सरते शेवटी
तव एकची विनंती
मुक्ती द्यावी गोमटी
सायुज ती
एकांतात दुरुन बोलावी कोण मला
सावल्या कुणाच्या खुणावतात मला
गुप्प अंधार,आणि दुसरे ना काहीच
त्या गडदांत सुद्धा कोण दिसे मला
मन बेचैन, भीतीने दाटले रोमांच
सुर भयाण, निरंतर ऐकु येती मला
ते डोळे मजवर सतत नजर ठेवून
काळोखातून वटारत असती मला
सांगा कुणी तरी कोण ते अनोळखी
ज्यांची ओळख वाटते नकोशी मला
गुरुवार , २८/०३/२०२४ , ०४:२७ PM
अजय सरदेसाई (मेघ)
https://meghvalli.blogspot.com/
१.
बराचसा काटकोनी दिसणारा आणि आटोपशीरसा असणारा तो फ्लॅट रंग देऊन तयार झाला होता. " आता आणखी एक वल्ली येणार इथे राहायला! मागच्या त्या कर्कश्श पोरापेक्षा, एखादी शांत मुलगी आली तर कसलं भारी!!" आपली पाने सळसळवत त्या गरम दिवसाच्या शेवटी विचार करीत 'तो' उभारला होता, घट्टपणे!
मला आणले जेथे ते स्मशान होते
कळले शरीर माझे गतप्राण होते
चौथऱ्यावर होती चिता मांडलेली
प्रेत माझे ज्यावर जणू सामान होते
दक्षिण दिशेस होती मांडली पिंडे
कावळे झाडावर का सावधान होते
सोपस्कार सर्व उरलेले पूर्ण झाले
शरीरास नमुन लोकांचे प्रस्थान होते
दुःखात काही,ओठांवर काही स्मित
जाणे काय मना त्यांच्या अवधान होते
पेटली शेवटी ती चिता जी होती शांत
शेवटचा पाश तुटला ,वर अस्मान होते
गुरुवार , २८/०३/२०२४ , ०१:४८ PM
अजय सरदेसाई (मेघ )
तू हे जिवन मैथुन जाण
ते जीवाने मिथ्या जगावे
इच्छा सुटण्याची होता
सद्य शरीर लागते सोडावे
घालमेल होत असे जिवाची
न जाणो ते काय घडावे
स्वर्गा ची ईच्छा असता
नर्कात स्व:कर्माने न्यावे
कोण हिशेब ठेवील याचा
जीवास कसे सर्व ज्ञात रहावे
तो चित्रगुप्त जी देईल शिक्षा
जिवास ते सर्व लागे भोगावे
जेव्हा शरिराचे होते कलेवर
पोहचतो जीव वैतर्णी घाटावर
त्या वैतर्णी चा प्रवाह विक्राळ
उठती ज्वाळा न दिसे तळ
एक ही नाव नोहे घाटावर
जीवास पोहचणे पैलतीर
भले भले थरथरले वीर
पिण्यस इथे न मिळे निर
तुझ्या आठवांचे ते विरह गीत माझे।
डोळ्यांत अश्रु,ओठांवर स्मित माझे
रणरणत्या ऊन्हात चालती पाऊले माझी ।
सांग सखे दाखवू कोणास हे दुःख माझे ।।
त्या उंच शिखरांच्या पलीकडे।
आहे एकटेच ते झोपडे माझे।।
हसले सर्व आसवांस माझ्या ।
परी कुणा न दिसले घाव माझे।।
जल धारा मेघांतून बरसल्या।
तरी शुष्क का ओठ माझे।।
स्वप्न पहात नाही मी आता।
छाटले कुणी तरी पंख माझे।।
मंगळवार , २६/०३/२०२४ , ०६:१० PM
अजय सरदेसाई (मेघ)
https://meghvalli.blogspot.com/
डोळ्यांत तुझ्या एक स्वप्न आहे
ओठांत तुझ्या माझे गीत आहे
दिसते तू जशी चंद्रकोर नभात
प्रेमात तुझ्या तो ईश्वर ही आहे
डोळे मिटूनी मी चांदणे स्मरतो
चांदण्यात तुझीच ज्योत आहे
कुंद भावनांचा झरा वाहतो एक
स्त्रोत त्याचा तुझ्या हृदयांत आहे
ती रात्र सारी सरली मिठीत तुझ्या
मावळतीस पूर्वेला शुक्र तारा आहे
कोंडला श्वास अवचित, हुंदका फुटला
जाणतो सखे वेळ बिछडण्याची आहे
मंगळवार , २६/०३/२०२४ , ०५:०५ PM
अजय सरदेसाई (मेघ)
https://meghvalli.blogspot.com/