साहित्य

सूर्यास्ताच कोडं

Submitted by प्रतिक सोमवंशी on 20 March, 2019 - 02:00

संध्याकाळ झाली का गच्चीत जाऊन सूर्यास्त पहायचा त्याने पायंडाच घातला होता. एकदा त्याला मित्राने विचारल काय करतोस रे तो सूर्यास्त पाहून?
तो म्हणाला, “ कोडं सोडवत असतो मी एक”
मित्र : “कसलं कोडं ?”
तो, “ तू कधी निरखून पाहिल आहेस सुर्यास्ताला? जाता जाता का होईना किती रंगांची उधळण करून जातो तो, मी जेंव्हा तो सूर्यास्त बघत असतो ना, तेंव्हा तो सूर्य क्लाउडे मोनेट बनतो आणि त्या क्षितिजावरच्या मोकळ्या कॅनव्हास वर किरणांच्या कुंचल्यातून रंग सांडून स्वतःच एक मस्त सूर्यास्ताचा लँडस्केप चित्तारतो.

त्याला लिहावच लागेल

Submitted by प्रतिक सोमवंशी on 20 March, 2019 - 01:57

तो एका सरळ रेषेत चालतो
मध्येच कुठे यु टर्न, कुठे टर्न टू लेफ्ट
कुठे टर्न टू राईट,
मग हळू हळू दिसू लागतात
डीव्हायडर ने वेगळे केलेले समाजाचे लवलेश
कुठे अश्रूंच्या पडलेल्या थेंबानी बनलेले
वेडेवाकडे, पुसटशे डाग
कुठे काळ्या पॅरालल चालणाऱ्या रेषेखालील
तुंबलेल्या भावनांची गटारे
कुठे वाहणाऱ्या पाण्याची बंदिस्त पाईपलाईन
तर कुठे , कुठे मागे पडत चाललेली रेलचेल
कुठे हरवतो मनाच्या नो पार्किंग स्पेस मध्ये
तिथल्या गाड्यांच्या काचेवरची धूळ झटकली जाते
सगळ क्लिअर दिसायला लागत
पुन्हा तो चालायला लागतो सगळ विसरून

वाटा

Submitted by प्रतिक सोमवंशी on 20 March, 2019 - 01:52

असलेल्या नसलेल्या सरणाच्या वाटा
भेदरलेल्या सगळ्या मरणाच्या वाटा

या मुखकमलावर किरण निजावे सारे
का ठाऊक मला या तिमिराच्या वाटा

शुभ्र असो चांडाळ जरी त्रिकोणाचा
नाही धरल्या उलट्या रोगाच्या वाटा

चाचपडत सापडली ती रेषा काळी
विरलेल्या होत्या पाषाणाच्या वाटा

आता साग्र संगीत उश्याला घेऊ
कुठवर नेऊ एकट्या जगण्याच्या वाटा

(शुभ गंगा वृत्त - गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा )

शब्दखुणा: 

होळीचा दिन

Submitted by Asu on 19 March, 2019 - 22:57

होळीचा दिन

होळीचा दिन आज
रंग रंग उधळूया
दु:ख कष्ट, माया मोह
संग संग जाळूया

थेंब थेंब पाण्याचा
मिळून सात, पिऊया
निसर्गाच्या कुशीत शिरुनि
वृक्ष दिन पाळूया

धरती आपुली मायमाउली
उपकार तिचे स्मरुया
होळीचा दिन आज
रंग रंग उधळूया !

- प्रा. अरुण सु. पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 

तुझमे तेरा क्या है - ७

Submitted by हजारो ख्वाईशे ऐसी on 18 March, 2019 - 11:01

या आधीचे भाग ईथे वाचा
तुझमे तेरा क्या है -१
https://www.maayboli.com/node/53637

तुझमे तेरा क्या है -२
https://www.maayboli.com/node/53652

तुझमे तेरा क्या है -३
https://www.maayboli.com/node/65884

तुझमे तेरा क्या है - ४
https://www.maayboli.com/node/68484

सृजनाचे बीज

Submitted by Asu on 14 March, 2019 - 23:29

सृजनाचे बीज

जगण्याआधी मरणाचा गुंता
मोक्ष मिळविण्या करती चिंता
पुत्रप्राप्तीने स्वर्ग मिळविता!
मुलीने का नरकात शिरता?

पुत्र पाजिता पाणी पित्याला
मोक्ष मिळवून जाई स्वर्गाला
पुत्रप्राप्तीचे गाई जुनेच गाणे
गरुड पुराण तर झाले पुराणे

कुलदिपक ध्यास जनाला
मुलगा मुलगी भेद कशाला?
जुने ते सगळे नसते सोने
विषमतेचे ना गाऊ गाणे

मुलगा मुलगी दोन्ही समान
हक्क वारसा दोघांचा मान
बाळगा लेकीचा अभिमान
नका करू तिचा अपमान

शब्दखुणा: 

रुळांवरुनी जुळ्या भरधाव गाडी धावते आहे

Submitted by सुप्रिया जाधव. on 13 March, 2019 - 14:29

रुळांवरुनी जुळ्या भरधाव गाडी धावते आहे

वळुन मागे न बघता ध्येय ठरले गाठते आहे
रुळांवरुनी जुळ्या, भरधाव गाडी धावते आहे

कितीदा प्रश्न पडतो की उलट तर चाललो नाही ?
करावे काय जर वेळेत ठरल्या पोचलो नाही ?
कटाक्षाने मिळाला तोच सिग्नल पाळते आहे
रुळांवरुनी जुळ्या, भरधाव गाडी धावते आहे

भयावह बोगदे केलेत सहजी पार गाडीने
नदीचे पूल ओलांडत टिकवला ताल गाडीने
जणू की गात अंगाई मुले जोजावते आहे
रुळांवरुनी जुळ्या, भरधाव गाडी धावते आहे

विषय: 

पुस्तक परिचय - राम गणेश गडकरी यांच्या आठवणी

Submitted by प्राचीन on 13 March, 2019 - 04:58

राम गणेश गडकरीयांच्या आठवणी - प्र.सी.गडकरी

विषय: 

मैत्रीचे नाते

Submitted by Asu on 12 March, 2019 - 22:44

मैत्रीचे नाते

तुझे नि माझे नाते होते
भक्तीचे, ना सक्तीचे
नाते फक्त प्रेमाचे
नव्हते परि रक्ताचे

नाजुकसे फुलपाखरू होते
विविधरंगी आनंदाचे
नाते होते स्वच्छंदाचे
नव्हते परि बंधाचे

आठवण जेव्हा अजून होते
धुंद मनाच्या गंध कुपीतुनि
सुगंध उधळीत येते,
भुलवून मजला जाते

संशय जरी जनात होते
प्रश्न आमच्या मनात होते
दोन जीवांच्या भेटी नुसते
मैत्रीचे का नाते नसते?

मैत्रीचे हे चेक अनेक
जगण्याखाती ठरले फेक
वटतील जेव्हा होऊन नेक
प्रेमाने होईल मानव एक

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - साहित्य