दिवे

कोणा सांगावयाचे?

Submitted by निखिल मोडक on 21 June, 2023 - 17:03

काटे वाट्यास आले, हे ना सांगावयाचे
केले जखमी फुलांनी, कोणा सांगावयाचे?

नव्हता अंधार नशिबी, हे तो खरे जरीही
मज पोळले दिव्यांनी, कोणा सांगावयाचे?

जो मार्ग चाललो तो, होता खरे सुगंधी
ते रान केतकीचे, कोणा सांगावयाचे?

सत्यात उतरली स्वप्ने, नसता ध्यानीमनी हे
उडवून झोप ती गेली, कोणा सांगावयाचे?

झाल्या असतील कविता, मागे काही बऱ्याही
मज काळजी नव्याची, कोणा सांगावयाचे?

©निखिल मोडक

शब्दखुणा: 

बाजरीच्या पीठाचे गोड दिवे

Submitted by मनीमोहोर on 27 July, 2017 - 15:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 

चायनिज लॅन्टर्न फेस्टीव्हल अर्थात दिपोत्सव

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मागच्या वर्षीचे कंदिलांचे आकाश आठवतेय का तुम्हाला ?

ह्या वर्षी देखिल इथे डॅलस मध्ये चायनिज लॅन्टर्न फेस्टीव्हल सुरु आहे.
त्यातिल गेल्या वर्षिपेक्षा वेगळी असलेली निवडक प्रकाशचित्रे इथे शेअर करत आहे.

प्रतिबिंबित ही बिंब जाहले....

small1.jpg

ड्रॅगन ची बोट आणि मागे दिसणारा रंगिबेरंगी पॅलेस....

small2.jpg

हे दोन ड्रॅगन्स

दिपावली पणत्या(टी लाईट होल्डर्स)

Submitted by मनःस्विनी on 4 November, 2010 - 03:31

सर्व मायबोलीकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

ह्या मी स्वनिर्मित पणत्या बनवल्या, ह्यावर टि लाईट ठेवू शकतो. ओळखा पाहु कश्या बनवल्या आहेत.
panati2.jpgpanati1.jpgpanati3.jpgpanati4.jpg

गरम टी लाईट ने नाजूक रंग जरासा हे झाला,
panati5.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - दिवे