सामान

शेवटचा पाश

Submitted by Meghvalli on 28 March, 2024 - 04:47

मला आणले जेथे ते स्मशान होते
कळले शरीर माझे गतप्राण होते
चौथऱ्यावर होती चिता मांडलेली
प्रेत माझे ज्यावर जणू सामान होते
दक्षिण दिशेस होती मांडली पिंडे
कावळे झाडावर का सावधान होते
सोपस्कार सर्व उरलेले पूर्ण झाले
शरीरास नमुन लोकांचे प्रस्थान होते
दुःखात काही,ओठांवर काही स्मित
जाणे काय मना त्यांच्या अवधान होते
पेटली शेवटी ती चिता जी होती शांत
शेवटचा पाश तुटला ,वर अस्मान होते

गुरुवार , २८/०३/२०२४ , ०१:४८ PM

अजय सरदेसाई (मेघ )

कोव्हिड केंद्रात भरती होताना काय सामान न्यावे? खबरदारी घ्यावी?

Submitted by अश्विनीमामी on 2 April, 2021 - 06:54

माझ्या कोविड चाचणीचा निकाल आज सात परेन्त येइल. सध्या तरी मला फार त्रास नाही. पण वय व को मॉर्बिडीटीज मजबूत आहेत.
होम आयसोलेशन व रिकव्हरी मला सर्वात सोयीचे पडेल. व मानसिक ताण पण कमी बसेल. आता अश्या परिस्थितीत बीएम सी तल्या लोकांनी कोविड सेंटर मध्ये शिफ्टच व्हा असा आग्रह धरला तर काय करावे? त्यांच्या नियमा नुसार जावेच लागेल. माझी पॉलिसी सरकारी नियम कायदे फर्माने आदेश पाळण्याचीच आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

थंडी...

Submitted by मी मुक्ता.. on 14 December, 2010 - 01:20

http://merakuchhsaman.blogspot.com/2010/12/blog-post_13.html

चिमुरी आणि सूर्यकिरण यांच्या सूचनेवरून लेख इथे पण टाकत आहे.. Happy मूळ लेखाची link वर दिली आहेच.. Happy

लंपन वाचलेल्या आणि आवडलेल्या सर्वांसाठी.. (लंपन वाचून न आवडणारे कमीच.. अर्थातच त्यांच्यासाठी हा लेख नाही.. :-)) पुण्यातल्या गोड गुलाबी थंडीच्या उबदार शुभेच्छा..!

गुलमोहर: 

...तू (विड्म्बन)

Submitted by मी मुक्ता.. on 8 December, 2010 - 03:34

कौतुक शिरोडकर यांची क्षमा मागून...
मूळ गझल इथे वाचा...
http://www.maayboli.com/node/15178

बोलशी खोटे जरी तू
मागचीपेक्षा बरी तू...

तू न मुन्नी, तू न शीला..
साक्षात मल्लेश्वरी तू...

स्वप्न बघतो नित्य सुंदर..
ती खोटी, का खरी तू?

चिंतीशी वाईट माझे..
भार्या न, वैरी तू...

समजलो मी डाळखिचडी,
मिसळीवरची तर्री तू....

बघ नको, बागेत भेटू
सरळ ये ना घरी तू...

गुलमोहर: 

उपरती..

Submitted by मी मुक्ता.. on 7 December, 2010 - 04:07

गुलझारच मेरा कुछ सामान ऐकत होते..
अगदी तितका आणि तसा दूर नसलास तरीही तुझ्या दूर असण्याची जाणीव पुन्हा एकदा चमकून गेली...
असं काही ऐकलं की सरसरून आठवण येते तुझी, अगदी हृदयाच्या तळापासून, खोलवरून, अतिशय आर्त हाक मारावीशी वाटते तुला अशा वेळी.. किव्वा मारूही नये..कदाचित तुझ्यापर्यंत आधीच पोहचली असेल ती... की तू स्वतःच हाक मारतो आहेस मला?

गुलमोहर: 
Subscribe to RSS - सामान