भाषा

अनौपचारिक स्पोकन इंग्लिश वर्गांसाठी स्वयंसेवक शिक्षक हवेत (२०१६-१७)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 13 June, 2016 - 04:14

भाषेचं शिक्षण आणि शिक्षणाची भाषा

Submitted by अपूर्व on 6 June, 2016 - 01:46

ब्लॉग दुवा - http://www.apurvaoka.com/2016/06/mother-tongue-education-india.html

विषय जुना आहे, काथ्या कुटून झालेला आहे. पण रहावलं नाही म्हणून पुन्हा तोच राग आळवतोय. ज्यांची मतं ठाम आहेत त्यांनी दुर्लक्ष करावं, डळमळीत आहेत त्यांनी जरूर वाचावं, आणि तटस्थ असलेल्यांनी क्षमा करावी किंवा मजा घ्यावी.

तुझे ओठ ..

Submitted by वैवकु रीटर्न्स on 31 May, 2016 - 09:02

नजरेत तुझ्या , आधीच कट्यारी भाले
हसतेस गोड ..जखमांवर मीठ मसाले !

मी तुझे ओठ न्याहाळत बसलो होतो
म्हटलेस काय ..लक्षातच नाही आले

केवढ्या अपेक्षा बाळगल्या होत्या मी
या बसा असेही नाही कुणी म्हणाले

ह्या व्यवहाराचा नियम किती सोपा ना
जे झाले ते विसरून जायचे.. झाले !

डोहात मनाच्या प्रलय ओढवे नंतर
पाण्यात तुझे चांदणे जरासे हाले

~वैवकु

सांगावा

Submitted by पुरंदरे शशांक on 31 May, 2016 - 06:02

सांगावा

आले सांगावा घेऊन
ढग गहिरे जरासे
येई पाऊस मागून
सोड मनाचे निराशे

येतो हवेत गारवा
वारा वाभरा दुवाड
किलकिले करुनिया
ठेव मनाचे कवाड

नवलाची येई खास
मत्त वळवाची माया
घेई ऊरात भरून
भुई-अत्तराचा फाया

पखरण थेंबुट्यांची
होत राही अविरत
सल कोरडे विरु दे
ओल राख अंतरात ....

क्षितिजपार अंबर आहे

Submitted by वैवकु रीटर्न्स on 17 May, 2016 - 06:16

क्षितिजपार अंबर आहे
हा प्रवास खडतर आहे

दु:खावरती फुंकर फ्री
ही नवीच ऑफर आहे

दुनिया हसते माझ्यावर
मी बहुधा जोकर आहे

इमले आठवणींसाठी
स्वप्नांना तळघर आहे

बेफिकीरही नाही मी
मी कुठला कणखर आहे

खोल बुडाल्यावर कळते
जे आहे वरवर आहे

जग-बिग मायावी असते
हा विचार सुखकर आहे

तू असणे अन तू नसणे
केवळ शब्दांतर आहे

~वैवकु

बहुरुपी तुकोबा !!

Submitted by पुरंदरे शशांक on 16 May, 2016 - 00:17

बहुरुपी तुकोबा !!

नटनाट्ये अवघें संपादिलें सोंग । भेद दाऊं रंग न पालटे ॥१॥
मांडियेला खेळ कौतुक बहुरूप । आपुलें स्वरूप जाणतसों ॥ध्रु.॥
स्फटिकाची शिळा उपाधि न मिळे । भाव दावी पिवळे लाल संगे ॥२॥
तुका म्हणे आम्ही या जनाविरहित । होऊनि निश्चिंत क्रीडा करूं ॥३॥५६४

एखाद्याच्या बोलीमुळे मायबोली धोक्यात येऊ शकेल का ?

Submitted by घायल on 21 April, 2016 - 11:46

मराठी प्रमाण भाषा म्हणजे काय ? ही किती लोकांकडे बोलली जाते ?

वेगवेगळ्या गावचं पाणी वेगळं म्हणतात. दर दहा कोसावर बदलत जाणा-या . मराठी भाषेत / बोलीत बोलणा-याने प्रमाण भाषेत व्यक्त व्हावे, मूठभरांनी लादलेले सभ्यतेचे संकेत पाळत लिखाण करावे अशी बंधने लादल्यास लहानपणापासून कानावर पडलेल्या बोलीला टाळून जी आपली नाही त्या संस्कृतोद्भव मराठीतून सकस आत्मलक्षी साहीत्य निर्मिती होऊ शकते का ? ज्याचे त्याचे अनुभवविश्व, अनुभूती हे परक्या भाषेत व्यक्त करणे प्रत्येकाला जमू शकते का ? अपवाद असतील. पण असा नियम होऊ शकेल का ?

विषय: 
शब्दखुणा: 

ऊन

Submitted by जाई. on 13 April, 2016 - 02:45

ऑफिसातला एक नेहमीचा दिवस . कटकट करणारे सीनियर्स , नेहमीच्या डेडलाईनची रडारड , एसीची गोठलेली हवा , या सर्वात डोक्यात प्रश्नांचं भेंडोळ जमलेल असताना चेहऱ्यावर दिसू न देण्याची कॉर्पोरेट कसरत करत असलेले आपण . एका क्षणी डोक्यातल काहूर चेहऱ्यावर पसारायला सुरुवात होते. स्क्रीन धूसर दिसू लागते . डोळे जड होतात . पटकन फ्रेश होऊन येण्याच्या नावाखाली पाऊले वॉशरूमची वाट चालू लागतात . पण तिथून येऊनही काही होत नाही . सुरुवातीचं लो फिलिंग आता सिंक होऊनच थांबणार काय इतपत प्रकरण येतं .

आणि तेव्हाच टिंग टॉंग होतं .

ऐका!

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

काल असाच मल्हारी मार्तंड शिनुमा आठवला.

प्रकार: 

संतकृपादीपक

Submitted by पुरंदरे शशांक on 5 April, 2016 - 02:12

संतकृपादीपक

नित्य समाधान | संतांची संपत्ती | स्वस्थ चित्त वृत्ती | सर्व काळ ||

अहर्निश वृत्ती | वसे भगवंती | कसलीच खंती | उरेचिना ||

वैराग्य विवेक | बाणतो नेमक | सहजचि एक | योग घडे ||

असोनी संसारी | विरक्त अंतरी | नित्य सदाचारी | धन्य जगी ||

संत सहवास | घडता सहज | जीवनाचे काज | कळो येई ||

शांति लाभतसे | भाविका अपूर्व | वासना त्या सर्व | नष्ट होती ||

प्रेम जडतसे | सहज साधनी | अलिप्त राहूनी | करी कर्मे ||

उद्धरुन ऐसे | जाताच साधक | विशेष हरिख | संता वाटे ||

संतकृपा ऐशी | भाग्याने लाभता | येतसे पूर्तता | जीवनाते ||

Pages

Subscribe to RSS - भाषा