भाषा

१०० नंबरी प्रेम (कविता)

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 14 February, 2017 - 00:08

बायकांच्या बडबडीने जेव्हा
इच अँड एव्हरीजण कंटाळला
'रोज शंभरच शब्द बोलायचे'
सरकारने नियम काढला

मला फारसा त्रास नव्हता
नेहमीच मी कमी बोलायचो
गप्पा,भांडण,उपदेश
मोजक्या शब्दांत मांडायचो

नियम लागू व्हायच्या थोडं आधी
मला भलताच नाद लागला
एका गोग्गोड बडबड्या पोरीवर
नकळंत जीव जडला

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तिला
प्रपोज करायचं ठरवलं
शंभर शब्द काय बोलायचे
गणित मांडायला घेतलं

५० सुक्ष्मकथा: मेँदुला खुराक पुरवणारा कथांचा एक भन्नाट प्रकार

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 31 January, 2017 - 02:30

सुक्ष्मकथा म्हणजे अतिशय छोट्या कथा. इंग्रजीमध्ये हा प्रकार ten words story, twenty words story, nanofiction वगैरे नावांनी मिरवतो. मराठीमध्ये एवढ्या छोट्या कथा लिहण्याचा प्रयत्न फार क्वचित झाला आहे.

शब्दखुणा: 

साहित्यिक लोकांना , जनतेच्या पैशावर फुकटची मेजवानी झोडायला मिळत नाहीए . म्हणून या लोकांनी तोडलेले तारे ..

Submitted by अभि१ on 26 January, 2017 - 09:20

डोंबिवलीत ‘निवडणूक’ संमेलन!
Maharashtra Times | Updated: Jan 24, 2017, 12:37 AM IST

सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - १२

Submitted by Suyog Shilwant on 22 January, 2017 - 21:30

मुलांसाठी वाचन गट

Submitted by अल्पना on 19 January, 2017 - 23:43

आम्ही काही मैत्रिणी गेल्या काही दिवसांपासून मुलाच्या मित्र-मंडळींसाठी एखादा वाचनगट सुरु करण्याच्या विचारात आहोत. शाळेत असा काही उपक्रम नाही आणि जवळपास वाचनालयही नाही.
मुलांचा वयोगट ७-८ वर्षे आहे. सध्या तरी चार मेंबर तयार आहेत. उपक्रम सुरु झाल्यावर अजून मुले तयार होतिल.
वाचनाची आवड असणारी, रोज काही ना काही वाचायला हवे असणारी, कधीतरी वाचणारी आणि अजिबात न वाचणारी अशी सगळ्या प्रकारची मुले आजूबाजूला आहेत.
सगळ्यात मोठी अडचण पुस्तकांची येईल. आम्हाला माझ्या घरी असणाऱ्या आणि मी वाचनालयातून आणलेल्या पुस्तकांचा वापर करावा लागेल. एका पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या मिळणार नाहीत.

शब्दखुणा: 

सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - ११

Submitted by Suyog Shilwant on 19 January, 2017 - 18:28

चैतंन्य, अजिंक्य आणि मल्हारी गुरुजींना सुयुध्दने गुरु विश्वेश्वरांच्या घरात घुसताना पाहिले व तो ही त्यांच्या मागे मागे घरात शिरला. गुरु आतल्या खोलित ध्यानस्थ होते. जेव्हा ते तिघे आत शिरले ते सरळ गुरुंच्या खोलीकडे गेले होते. सुयुध्द्ने माजघरात कोणी नाही हे पाहुन खोलीकडे जाण्याचे ठरवले. खोलीच्या दाराशी जाऊन तो थांबला. आत चैतंन्य गुरु विश्वेश्वरांना काही सांगत होते. त्याने कानेसा घ्यायला म्हणुन दाराशीच उभे राहुन ते काय बोलत आहेत हे ऐकण्याचा प्रयत्न केला. चैतंन्य गुरुजी बोलत होते. तो त्यांचा आवाज ओळखत होता.

नविन सुधारीत मायबोली वर लिखाण कुठे करायच?? लिखानाची खिडकीच गायब आहे

Submitted by Suyog Shilwant on 16 January, 2017 - 07:22

नविन सुधारीत मायबोली वर लिखाण कुठे करायच?? लिखानाची खिडकीच गायब आहे

ये आता मागे नाहि.........

Submitted by वि.शो.बि. on 11 January, 2017 - 08:26

मि आजच प्रथम एक अभंग share करत आहे
निसर्गाने दिलेली एक सुंदर अशि वास्तु किंवा सौंदर्य.
जणु समुद्राला हि हेवा वाटावा अस आपल जिवन.
त्याला काहि नविन माझे मित्र- मैत्रिनि व्यसन अंगि कारुन स्वत:ला आगेत झोकुन देत आहेत.
आपल शरिर म्हणजे काय exchange offer वाटली काय....
म्हणुन एका अभंगातुन तुम्हाला नविन सुंदर अश्या जगात घेउन जात आहे. जणु रायगडाच्या पाय्थ्याला जसा झुरु झुरु वाहणारा वारा, थंडित शरिराला गरम उब देनारी, मायच्या साडिची गोधडिच. असच वाटेल हि शरिराला मुक्ति देनारा अभंग.......

निसर्गाचि देन अभंग "शरिर"
हात करि कृत्य, पाय करि वाटचाल
ज्याच्या त्याच्या हाती आहे, कर्तवव्याचे माफ!
हात जाइ पुढे पुढे

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - भाषा