वेड्या पावसानं ...
जीव वेडावला बाई कसा वेड्या पावसानं
अंग ओलावत जाई मन चिंब थरारून
असा भरारा पाऊस दिशा जाती काजळून
मना चाहूल कुणाची जरा जाते उजळून
टप टप पावसाची लय जातसे भिनून
एक शिरशिरी आंत नकळत खुणावून
येतो पाऊस माहेरा जरा थांबून थांबून
कळ आतली उगाच उठे दाटून दाटून
कुणा लुभावे पाऊस कुणा घेतो कवळून
डोळा लागला पाऊस कढ अंतरी पिऊन ....
झुंबर ढगांचे
झुंबर ढगांचे
झुलते तालात
गाणे पावसाचे
पेरते वनात
सावळे सावळे
घन आभाळात
सल उकलवी
भुईचे अल्लाद
थेंब पावसाचे
येती आवेशात
मुग्ध रान सारे
बेहोशी उरात
दाटला कल्लोळ
गगनी अवनी
जलरुप घेई
स्वये नारायणी
विनवणी
क्षणाक्षणाला पडतो खाली
उठुनी पुन्हा उचलतो पाऊली
नसे साथीला दिसे कुणीही
रणरण अवघी नसे सावली
बघुनी सारे राजमार्ग ते
वाटबिकटशी हीच निवडली
तुम्हासारखे दिग्गज कोणी
कधी चालले याच दिशेनी
केशर-बुक्का खुणा पाहुनी
दिशा हीच ती नाही चुकली
गाथेमधल्या शब्दांना मी
कधी मस्तकी उरी सांभाळी
त्या बोलाच्या साथीने तर
चालतोच ही वाट निराळी
आळी पुरवा एक एवढी
करी विनवणी माथा लवुनी
नसेल उत्कट भाव तरीही
घ्या ओढूनी घ्या हो जवळी
-------------------------------
अवघे सावळ
उतरले पूर्ण | तुकोबा जीवन | यथार्थ दर्शन | गाथेमाजी ||
चिंतनी मननी | भक्तांसी तुकोबा | नवल विठोबा | करीतसे ||
अभंग तुक्याचे | निरखी विठ्ठल | मनी कुतुहल | फार दाटे ||
कैसी ही आगळी | भक्तिची माधुरी | शब्दी खरोखरी | सामावेना ||
मिटूनी नयन | बैसे स्वस्थचित्त | श्रीहरि एकांत | भोगतसे ||
तुकोबा तुकोबा | गजर अंतरी | आनंद सागरी | देव बुडे ||
विठ्ठल का तुका | तुका कि विठ्ठल | अवघे सावळ | एकरुप ||
संतांचे उपकार
भक्तासाठी देव | होतसे प्रगट | येरा तो अदृष्ट | आकळेना ||
भाव ऐसा थोर | देवापायी नित्य | जीवभाव सत्य | लुप्त होई ||
आठविता चित्ती | एकमात्र हरि | लौकिक विसरी | पूर्णपणे ||
वेड लागे देवा | भक्ताचेच पूर्ण | सांडिले निर्गुण | अरुपत्व ||
ठाकतसे उभा | भक्ताचे ह्रदयी | निर्गुण सामायी | सगुणत्वे ||
आकळावे वाटे | कोणासी श्रीहरि | अभंग उच्चारी | सप्रेमाने ||
ज्ञानेश्वरी गाथा | मनन - चिंतन | स्वये नारायण | दृष्य होई ||
मराठीविषयी सातत्यानं चर्चा सुरू असते. वृत्तपत्रं, दूरचित्रवाणी यांची भाषा, त्या माध्यमांमधील जाहिरातींचे (चुकीचे) अनुवाद, खरं तर भाषांतर; चुकीची वाक्यरचना, इंग्रजी धाटणीची वाक्यरचना, अतिरिक्त विशेषणांचा वापर, चुकीच्या शब्दांचा सर्रास वापर, इंग्रजी किंवा मराठी शब्दांची अयोग्य संक्षिप्त रूपं (त्यांची चुकीची पूर्ण रूप), परभाषांतील नावांच्या चुका... अशा अनेक गोष्टी आढळतात. त्याबद्दल संताप, हताशपणा, वैफल्य अशा भावना व्यक्त केल्या जातात. काही जण दुर्लक्ष करतात, तर काही जण हसून साजरं करतात.
मुलाच्या शाळेतुन वर लिहिलेल्या कोर्सवर एक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की अंतर्मुख मुलांसाठी हा कोर्स फार उपयोगाचा आहे. त्यामुळे मुलांना इतरांशी सहजपणॅ मिसळणे शक्य होईल. कुणी हा कोर्स केला आहे का?
http://www.helenogrady.co.in/website/index.php/about
सध्या मी 'शिक्षण कोणत्या माध्यमात घ्यावे' ह्या विषयावरचे काही लेख आणि चर्चा पाहिल्या. त्यासोबत 'प्रमाण भाषा कुठली असावी / असावी का?' असेही प्रश्न उद्भवलेले पाहिले. ह्या प्रश्नांवरती अजून माझे मत काही एक असे बनलेले नाही, परंतू ज्या क्षेत्राबद्दल थोडीफार माहिती आहे, त्याबद्दल जरा सर्वांसमोर मांडावे ह्या उद्देशाने हा लेख लिहितो आहे. ह्या सर्व चर्चा ऐकताना/ वाचताना असे जाणवले की अनेकांना संशोधन नक्की कसे चालते ह्याची नीट कल्पना नसते. शिवाय 'अमुक एक भाषा ही ५ वर्षात ज्ञानभाषा होऊ शकेल' वगैरे बाता करताना इतर ज्ञानभाषांनी काय काय सोसले/ जिंकले आहे ह्याची देखील माहिती त्यांना नसते.
मी माझ्या घरात बसलो होतो. ती व्यक्ति माझ्यासमोर होती....
साधारण तीस वय. भारदस्त बांधा. सहा फूट उंच. लांब नाक. तरतरित डोळे.
मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचे हात आणि पाय चांगलेच लांब असून त्याचे तळवे अत्यंत पसरट होते.
कोपऱ्यात असलेले खास बनवलेले बूट त्याची साक्ष देत होते.
तर पुतळा प्रकरणानंतर झालेल्या गोष्टी म्हणजे मी माझ्या घरात बसलो होतो आणि माझा पुतळा घराबाहेर दिमाखात उभा होता.
"तर आपल्याला आपले घर परत हवे आहे."
"हो."
"आणि त्यासाठी आपण मी मोजलेली किंमत परत करायला तयार आहात."
"हो."
"तर हे घर मी विकत घेतले आहे हे आपणांस मान्य आहे."
"हो."
एका चिनी शिवीचा अर्थ मराठीत 'वारंवार वेश्यागमन करणारा म्हातारा' असा आहे अशी मजेशीर माहिती घरच्या मँडरीन शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून मिळाली. आता मराठीत याला प्रतिशब्द नाही. त्यावरून विचार करत होते, आपण 'नाव' कशाला देतो? नित्याच्या अनुभवांतल्या किंवा सुखदु:खाची काहीतरी अतिशय परिणामकारक अनुभूती देणाऱ्या वस्तू, घटना यांना. (उदा. मृद्गंध - याला इंग्रजीत petrichore असा प्रतिशब्द आहे हे मला अनेक वर्षं माहीत नव्हतं.)
म्हणजे साधं एखाद्या भाषेत nouns कुठली प्रचलित आहेत त्यातही त्या समाजाचं लख्ख प्रतिबिंब दिसतं.