Submitted by वैवकु रीटर्न्स on 17 May, 2016 - 06:16
क्षितिजपार अंबर आहे
हा प्रवास खडतर आहे
दु:खावरती फुंकर फ्री
ही नवीच ऑफर आहे
दुनिया हसते माझ्यावर
मी बहुधा जोकर आहे
इमले आठवणींसाठी
स्वप्नांना तळघर आहे
बेफिकीरही नाही मी
मी कुठला कणखर आहे
खोल बुडाल्यावर कळते
जे आहे वरवर आहे
जग-बिग मायावी असते
हा विचार सुखकर आहे
तू असणे अन तू नसणे
केवळ शब्दांतर आहे
~वैवकु
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बरेच शेर लाजवाब
बरेच शेर लाजवाब !
नेहमीप्रमाणेच !!
धन्यवाद !
दोन शेरात इंग्रजी शब्दांचा
दोन शेरात इंग्रजी शब्दांचा वापर (सहसा तुम्ही एकाच गझलेत असं करत नाही) शब्द प्रचलित असल्याने आवडलंच
गझल मस्तच प्रतिसाद अर्धाच
गझल मस्तच
प्रतिसाद अर्धाच उमटला :
कणखर वरून माझा एक शेर आठवला
बेफिकीरची श्रीमंती बघ जय
तुझ्याकडे ते वैभव आहे का
धन्यवाद दोघांचे दोनच
धन्यवाद दोघांचे
दोनच जणांच्या प्रतिक्रिया आल्याचे पाहून अपेक्षाभंग झाला
लोक मुद्दम प्रतिक्रिया देत नाहीयेत की ही गझल तितकी चांगली नाही हे समजत नाही आहे
पूर्वी मायबोलीवर गझलकारांना चांगले दिवस होते. खूप आठवत राहतात ते दिवस
असो
अप्रतीमच गझल आहे. व्वा!
अप्रतीमच गझल आहे. व्वा!
धन्यवाद बेफिजी मायबोलीवर मी
धन्यवाद बेफिजी
मायबोलीवर मी हल्ली पुन्हा गझल प्रकाशित करत आहे त्याचे एकमेव कारण हेच की इथे सादर केले की आपल्या नजरेखालून नक्कीच ते लेखन जाईल याची खात्री असते
आणि आपला प्रतीसादही आला तर मग केलेल्या कामाचे चीज झाल्यासारखे वाटते
अशीच कृपादृष्टी असूद्यावीत प्लीज
_/\_
अप्रतीमच गझल आहे. <<< अच्छा
अप्रतीमच गझल आहे. <<<
अच्छा म्हणजे काही जण मुद्दम प्रतिसाद देत नव्हते तर
दु:खावरती फुंकर फ्री ही नवीच
दु:खावरती फुंकर फ्री
ही नवीच ऑफर आहे
नाविन्य आहे शेरात.
इमले आठवणींसाठी
स्वप्नांना तळघर आहे
सुरेख…
एकूणात गझल मस्त आहे.
आवडली गझल !
आवडली गझल !