भाषा
कथुकल्या [नवीन उपक्रम]
प्रतिभेचा महानायक श्री विनायकाला त्रिवार वंदन करून नवीन उपक्रमाला सुरुवात करत आहे.
कथा म्हटलं की दोन प्रकार आपल्यासमोर येतात – लघुकथा आणि दीर्घकथा. साधारणतः हजार शब्दांच्या वरील कथेला लघुकथा असं म्हटलं जातं. त्यापेक्षा छोट्या कथा आजकाल अधूनमधून लिहल्या जाऊ लागल्या आहेत. ह्या कथा पटकन वाचून होतात, लिहायला कठीण असतात आणि वाचकांना विचार करायला भाग पाडतात.
हजार शब्दांच्या आतील कथांचं नामकरण मी खालीलप्रकारे केलं आहे -
पं कुमार गंधर्व - येत्या जयंती निमित्त लेख
गेली अनेक शतके मनुष्याला अखंड साथ लाभत आली, ती स्वर आणि सूररूपी संगीताची! मात्र या प्रवासात अनेकदा अशी वळणे येतात, जेव्हा या कलेची मीमांसा करणे गरजेचे होऊन जाते. काही टोकदार प्रश्न विचारावे लागतात, प्रसंगी कलेच्या काही अंगांवर अभ्यासक-समीक्षकांना कठोर शब्दांत टीकादेखील करावी लागते. कारण, या संगीतकलेचा तिच्या उगमस्थानाशी असलेला संपर्क तुटलेला असतो.
केला इशारा! 'कट्टी' आणि 'बट्टी'चा.
सकाळी कामावर जाताना मी रोज लोकलने प्रवास करतो. आमच्या स्टेशनवरूनच गाडी सुटते. मी नेहमी ज्या सीटवर बसतो, त्याच्या समोरच्या सीटवर साधारण चार वर्षाची एक गोड छोकरी, मस्तपैकी शाळेच्या कडक छोटुकल्या गणवेशात आपल्या पप्पांसोबत बसलेली असते. आता रोजच्या येण्याजाण्यामुळे माझी त्या मुलीशी थोडीफार तोंडओळख झाली होती.
श्री तुकोबांचे अभंग धन
श्री तुकोबांचे अभंग धन
परीसाचे अंगे सोने जाला विळा । वाकणे या कळाहीन नोहे ।१|
अंतरी पालट घडला कारण । मग समाधान ते चि गोड ।२|
पिकली सेंद पूर्वकर्मा नये। अव्हेरू तो काय घडे मग ।३|
तुका म्हणे अाणा पंगती सुरण । पृथक ते गुण केले पाके ।४|गाथा ३३२२॥
वाकणे - वक्र, कळाहीन - निस्तेज, परिस - नुसत्या स्पर्शाने लोखंडाचे सोने करणारा काल्पनिक पदार्थ, सेंद - एक फळ, अव्हेर - अस्विकार
माझु बोबला अन प्रुफरीडिंग (विज्ञानचुंबित कथिका*)
आबा (अदभुतिका)
आबांची बुलेट धाडधाड आवाज करत अनाथाश्रमासमोर येऊन थांबली. हा आवाज सर्वाँच्याच, विशेषत: मॅनेजर बाईंच्या परिचयाचा होता. त्यांचं स्वागत करायला ती धावत बाहेर आली. एककाष्ठी धोतर नेसलेले अन खानदानी फेटा घातलेले आबा आकडेबाज मिशीआडून हसले. गाडीच्या एका अंगाला दूध वाटायला वापरतात तशी मोठी प्लास्टिकची कॅन लटकवलेली होती. आबांनी कॅनचं झाकण उघडलं अन आत हात घालून शंभरीच्या पाच गड्ड्या बाहेर काढल्या. सवयीप्रमाणे बाईंनी पुढे होऊन पैशांचा स्विकार केला. आभार मानणं आबाला आवडत नाही अन आग्रह केला तरी ते थांबणार नाही हे माहीत असल्याने बाई आत निघून गेल्या. आबांची गाडी पुन्हा रस्त्याने धावू लागली.
नाही बोलता येत आमच्या पोरांना मराठी, बरं मग?
म्हटलं तर तिच्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नव्हते. ती आमच्याच ऑफिसमध्ये काम करणारी. दोन प्रायमरी स्कूलमध्ये जाणार्या मुलांची आई. स्वत:चे शिक्षण ईंग्लिश मिडियममध्ये झालेली. तरीही तिच्या आईवडिलांच्या कृपेने छान मराठी बोलता येणारी. तिची मुलेही ईंग्लिश मिडीयमचीच. पण ही त्यांच्याशी घरी ईंग्लिशमध्येच संवाद साधत असल्याने त्यांचे मराठी कच्चेच राहिलेली.
शब्द-शृंखला - २७ फेब्रुवारी
आपण मायबोलीवर आहोत कारण आपले मराठीवर प्रेम आहे, आपल्याला मराठी भाषा येते ह्याचा अभिमान आहे. मग चला तर त्या अभिमानाला आव्हान देऊया. आपले मराठीचे, मराठी व्याकरणाचे ज्ञान तपासून बघूया.
आम्ही एक शब्द देऊ.
पहिला खेळाडू त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा दुसरा शब्द देईल.
दुसरा खेळाडू दुसर्या शब्दाच्या (पहिल्या खेळाडूने दिलेल्या शब्दाच्या) शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा पुढील शब्द देईल.
या प्रकाराने एकापुढे एक शब्द देत देत एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे.
तमिळ शिका.
तमिझ्(तमिळ)ही जगातल्या सर्वात प्रसिध्द अशा भाषांपैकी एक! सर्वात शुध्द द्रविड भाषा! म्हणूनच अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत थोडीशी अवघड!
कामानिमित्य,प्रवासानिमित्य किंवा एक वेगळी भाषा म्हणून म्हणा,किंवा तमिळ चित्रपट,तमिळ संस्कृती यांची आवड,कुतुहल म्हणून म्हणा 'तमिळ' शिकावीशी वाटते.
अशा तमिळ शिकणार्यांसाठी एक WhatsApp समुह सुरु करत आहोत.