मुक्तस्रोत(Open Source)

सोप्या पद्धतीने मराठीत लेखन (भाग २ - युबंटू लाईव्ह सीडी)

Submitted by shantanuo on 28 November, 2014 - 08:41

माझा "सोप्या पद्धतीने मराठीत लेखन" हा लेख ज्यांनी वाचला असेल त्यांना मराठीत स्पेल चेक, अ‍ॅटो करेक्ट वगैरे कसे वापरायचे ते लक्षात आलेच असेल.

http://www.maayboli.com/node/39752

पण त्यासाठी कितीतरी सॉफ्ट्वेअर टाकावी लागतात. कॉन्फ्युगरेशन शिकावे लागते. हाताशी विंडोजची सिडी असावी लागते. विंडोजमध्ये मराठीत टाईप करायचे असेल तर किती सव्य / अपसव्य करावे लागतात ते इथे पहा.

तू येण्याच्या आधी काही तू गेल्याच्या नंतर..

Submitted by दुसरबीडकर on 17 October, 2014 - 10:05

तू येण्याच्या आधी काही तू गेल्याच्या नंतर..
सखये मी मग मोजत बसतो दोघांमधले अंतर..!!

सोपे नसते.कळले..!आयुष्याचे चंदन होणे..
वेढा घालुन बसलेला प्रश्नांचा नाग निरंतर..!!

येता-जाता 'तो' डोकावत असतो विहिरीपाशी..
'भरल्या' विहिरीतुन नक्की जगण्याचा मिळतो मंतर..!!

सारवलेली मायेने स्वप्ने शेणा-मातीची..
फरशीवर त्यांना 'पुसण्या'वाचुन नाही गत्यंतर..!!

कृष्णाला पाहुन त्या पुतनेलाही फुटला पान्हा..
मग का आजमितीच्या कैक यशोदांचे स्थित्यंतर..??

-गणेश शिंदे..
दुसरबिड,बुलडाणा...

हकनाक वेदनांचा येथे जमाव बसतो..

Submitted by दुसरबीडकर on 7 September, 2014 - 08:26

पाऊसलेखणीने जमिनीत काव्य कसतो..
कवितेत जिंदगीच्या तो एकरूप दिसतो..!!

म्हणतात कैक आधी जोडी खिलार होती..
आता खुटा रिकामा दारी उदास हसतो..!!

सत्कार सोहळ्याला ज्याच्याकडून शाली..
बांधावरी बिचारा तो बोडखाच असतो..!!

नुसताच आसवांचा अंदाज बांधल्याने,
रोपास भावनेच्या बघ कोंब येत नसतो..!!

इतक्या सुरेल ताना घेऊ नकोस दुःखा..
हकनाक वेदनांचा येथे जमाव बसतो..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
९९७५७६७५३७

मी नास्तिक आहे असा माझा समज आहे.... पण

Submitted by ब्रह्मांड आठवले on 10 July, 2014 - 10:23

सामान्य माणूस नास्तिक असू शकतो का ?
कारण मी नास्तिक आहे, असा माझा समज आहे. मी नास्तिक असण्याने इतरांना त्रास होतोय असं आजवरच्या वाटचालीवरून वाटलं नाही. पण मी नास्तिक का आहे याची कारणं मला माहीत असलीच पाहीजेत असा आजूबाजूच्यांचा आग्रह का ?
मग मिळेल ते वाचावं लागतं. म्हणजे असं वाटतं की आपण इतरांच्या कटकटीला वैतागून वाचतोय हे सर्व..
पण खरं म्हणजे
माझ्या नास्तिक असण्याशी माझा अंतर्गत झगडा चालू असतो. निरंतर.
मग सगळी तत्त्वज्ञानं थोडी थोडी, झेपेलशी चाळून मेंदू बधीर होतो. वाचनासाठी डोळे खोबणीतून बाहेर येतात आणि झोप न झाल्याने आता आत खेचले जाऊन मेंदूला चिकटतात.

शब्दखुणा: 

तू गेल्यावर.....!!

Submitted by दुसरबीडकर on 2 July, 2014 - 12:01

तू गेल्यावर पक्के घर नुसते कोसळते..
आधाराला कोणी नसले की मन छळते..!!

राहू दे ना हात घडीभर स्वप्नांभवती..
'अंगण झाडायाचे आहे' मजला कळते..!!

वापरतो तू कुठले अत्तर सांगत जा रे..
धरतीवर तू कोसळतांना जग दरवळते..!!

मी नसले की वार्यावरती लक्ष असू दे..
आठवणींच्या पानोपानी मी सळसळते..!!

बांधावरचे सुकले होते झाड जरासे..
त्याला कळले जमिनीमधले दुःख तरळते..!!

प्रत्येकाचे 'घर कौलारू' सुंदर नसते..
अंदर गेल्यावर कळते,छप्परही गळते..!!

आयुष्याची भाकर साला चन्द्र नसावा..
ते तर नक्की सुर्याइतके सत्य उजळते..!!

विषय क्रमांक २ - आमच्या दाते बाई

Submitted by आशिका on 26 June, 2014 - 01:26

जून-जुलै महिन्यातील एक दुपार आणि बाहेर पडत असलेला धुवाधार पाऊस. तिसर्‍या मजल्यावरच्या आमच्या वर्गात खिडकीजवळच्या बाकावर बसून आषाढातल्या पावसाचे विहंगम सौंदर्य पाहण्यात मी गढून गेले होते. सायन स्टेशनबाहेरचा तो एरवी गजबजलेला परिसर, दुपार आणि त्यात पाऊस यामुळे शांत पहुडला होता. फळे, भाज्या विक्रेते आपापल्या गाड्यांवर प्लॅस्टिक घालुन आडोशाला उभे होते. रस्त्याच्या दुतर्फा असलेली अशोक, वड, पिंपळ ही झाडे नुकत्याच न्हाऊन आलेल्या, ओलेचिंब केस पाठीवर मोकळे सोडलेल्या, हिरवाजर्द शालू नेसलेल्या नवरीसारखी तजेलदार दिसत होती. त्यावर काही पक्षी अंग चोरुन बसले होते.

माझ्या मनातले घर कोंदट. .

Submitted by दुसरबीडकर on 25 June, 2014 - 06:58

माझ्या मनातले घर कोंदट..
अन तू अख्खे घर धडधाकट...!!

तुझ्या प्रितीचे औषध व्हावे...
मरणावरी उतारा दसपट..!!

मौन तुझे मज बोलत असते..
व्यर्थ कशाला आदळआपट..!!

वसतिगृहावर मला सोडुनी..
हळवा होतो 'बाबा' तापट..!!

सुगी संपली स्वप्नांमधली..
मागे आठवणींचे धसकट..!!

असे जगू की तसे जगू मी...
आयुष्याची नुसती फरपट..!!

विहिर मनाची भरली नाही..
यंदा झाला पाउस हलकट..!!

डोळ्यामधले कळते तुजला..
उगीच का तू म्हटली...'चावट.'.!!

सुखाचीच पडझड झाल्यावर..
डागडुजी दुख करते दणकट...!!

मिठाचा चहा

Submitted by ब्रह्मांड आठवले on 30 May, 2014 - 08:54

मिठाचा चहा म्हटल्यावर मिठाचा खडा लागल्यासारखं झालं ना ?

अहो पण खरंच असा चहा आहे आणि खूप टेस्टी आहे. हिमालयन टी किंवा तिबेटीयन टी या नावाने हा चहा प्रसिद्ध आहे. नंदादेवी मोहीमेदरम्यान आणि लडाख मधल्या वास्तव्यात या चहाशी चांगलीच दोस्ती झाली. नंदादेवी मोहीम काही पूर्ण झाली नाही पण बेसकँपला तिबेटीयन चहा बनवण्याचं प्रशिक्षण मिळालं. आयटीबीएफ च्या दार्जिलिंगच्या माउंटेनिअरैंग इन्स्टीट्यूटचे एक तिबेटी प्रशिक्षक होते, ली दोरजी नावाचे त्यांनी पारंपारीक चहाही शिकवला आणि त्याच्या कैक वर्जन्सची माहीती पण दिली.

ती आई होती म्हणून.....

Submitted by आशिका on 14 May, 2014 - 03:08

३ तास होऊन गेले तरी गाडी जागची हलत नाही हे पाहून नेहाची अस्वस्थता शिगेला पोहोचली. या ओव्हरहेड वायर्सना तुटायला आजचाच मुहुर्त बरा साधायचा होता, ती मनातल्या मनात धुसफुसली. पण असा त्रागा करून काही उपयोग होणार नाही हे जाणवून ती शक्य तितक्या संयमाने गाडी सुरु होण्याची वाट पहात बसली.

जळगांवमध्ये चाळीसगांवच्या पुढे खर्डा नामक एका गावातील सुधारणांची पाहणी करुन अहवाल सादर
करण्याची ऑर्डर मिळाली होती नेहाला वरिष्ठांकडून, म्हणूनच हा प्रवास-प्रपंच.

शब्दखुणा: 

राम नाही..(घुसमट छंद)

Submitted by रमा. on 10 April, 2014 - 23:14

याच्यात राम नाही, त्याच्यात राम नाही, बघायला गेले खरं तर कशातच राम नाही...

मोठ्याने गर्जू आम्ही 'मंदिर वही बनाएंगे', पण राहू नका भ्रमात, त्याच्यात राम नाही..

कत्तल-दंगल, कापाकापी यात काय मोठेसे, मेले ते केवळ सामान्य, त्यांच्यात राम नाही..

भ्रष्टाचार तो अब्जांचाच फक्त, त्याला काय घेऊन बसलाय, बोंबलण्यावाचून कर्तुत्व शुन्य, आपल्यात राम नाही..

गलतिया तो लडकोसे होती है, कशाला उगीच फाशी-बिशी? हे ऐकून रक्त आटवू नका, त्याच्यात राम नाही

आम्ही फेसबूकवर अपडेटस टाकणार, तुम्ही लाईक करायचे, 'एवढे का आज सिरीयस ?' घरात बाम नाही???

Pages

Subscribe to RSS - मुक्तस्रोत(Open Source)