माझे स्मार्टपण !

Submitted by स्नेहन्कित on 3 February, 2015 - 17:49

शीर्षक वाचून ,.... माझे माहेरपण, किव्वा माझे बालपण, असे काहीतरी वाचकाच्या मानता यावे, हा उद्देश !
कारण, एखादी नववधू, जेव्हा लग्न करायचे ठरवते, त्यानंतर साधारण, १-२ वर्ष ती आणि तिचे कुटुंब, चांगल्या स्थळाचा शोध घेतात, ४ ठिकाणी चौकशी करतात, इतराना लाभलेल्या नवर्यांचे भले बुरे गुण जाणून घेतात आणि मगच योग्य त्या स्थळाशी सौरिक जूळवतात.
इतके सारे करून देखील, सप्तपदी मधील शेवटचे पा उल टाकताना ती शासंक असते … काय होईल ?, कसे होईल?, मला जमेल का ?...माझे आयुष्य कायमचे बदलून जाणार ….मी चांगला निर्णय तर घेतला आहे ना ?…. एक ना हज्जार गोष्टी.
Exactly अशीच माझीही अवस्था होती, जेव्हा मी T-Mobile च्या दुकानात, कुटुंबा साठी Smartphones आणि त्या साठी लागणारा फॅमिली प्लान घेण्यास प्रवेश केला.
वन्स अ Smartphone धारी..इस ऑल्वेज़ अ Smartphone धारी … त्या मुळे, आता मागे वळणे नाही. साध्या भोळ्या Flip Phone च्या जगातून, या SmartPhone च्या कॉंप्लिकेटेड जगात , माझा प्रवेश होणार होता.… आजवर ताठ मानेने जगणारा मराठी माणूस, पुढील पूर्ण आयुष्य फोन कडे बघत बघत झुकल्या मानेने घालवणार होता.

काउंटर वरच्या मुलीने, आम्हाला प्लान समजावून सांगितला, आणि काही वेळातच, आम्ही कैक $ ने गरीब झालो. फोन घरी येऊन activate करायचे होते, म्हणून खोक्यासकट T Mobile च्या स्टाइलिश पिशवीत टाकले, आणि आमचे कुटुंब घरी निघाले. गाडीत बसल्यावर, मी, बाईकोशी, आणि मुलींशी बर्याच गप्पा मारून घेण्याचे ठरविले …कारण आज नंतर आयुष्यातील पुढचे सगळे कार प्रवास … शांततेत ( तीघी जणी अपापल्या फोन कडे आणि मी रस्ता & अधून मधून GPS कडे बघण्यात) घालवणार होतो. त्यादिवशी घरी येताना गाडीत बायको मला मद्रदेशीय ( तिच्या मद्रासी मैत्रिणींचे ) किस्से सांगत होती, मुली एकमेकींशी बोलत होत्या, गाडी च्या बाहेरील देखावे बघत् होत्या ….हे सगळा पाहून, माझे मन भरून आले, आता हे सारं कायमचे बदलून जाणार होते ……….
घरी आल्यावर ….फोन setup करणे, apps डाउनलोड करणे वगेरे वगेरे उद्योग सुरु झाले. चौघांना सेम फोन घेतल्याने टेक्नोलोजी चालेन्जेस तरी बर्या पैकी कमी होते. हे सर्वा करताना, अर्थातच धाकटी मुलगी (वय वर्ष १०) => थोरली मुलगी (वय वर्ष १८) => बायको => आणि अखेरीस मी , या क्रमाने दयानाचे वाटप सुरु होते. आणि एकदाचे फोन सेट झाले. धाकटी ने आई बाबांना दम दिला, "वाट्टेल ती बटणे दाबू नका … काही अडले तर आधी विचारा !

आता फोन घेण्या मागचे प्रत्येकाचे उद्देशहि वेगवेगळे होते! ( अगदी स्पेसिफिक )
थोरली – म्हणजे काय ? SmartPhone हवाच ….
धाकटी – इन्स्टाग्राम , पिंटृस्ट, - Ashley / Mia / Tiara / Maraya / Alexis..आणि तत्सम नामक मुलींशी हितगुज. लॉंग ड्राइव वर CID बघणे / Tylor Swift ची गाणी etc etc etc….लिस्ट खूप मोठी होती
बायको – ती कधी ड्राइविंग करताना गाडी बंद पडली तर ? आणि iPad वर झोपून games खेळता येत नाहीत!
मी – इंडीयतल्या मित्र मैत्रिणीशी whatsapp आणि अधून मधून games.
या आणि अशाच फुटकळ कारणांसाठी ....( सगळ्यांचीच करणे अशा टाइप चीच असावीत )..आम्ही Smatphone सारख्या असाध्य व्याधी ला आमच्या घरात प्रवेश दिला.
मगकाय..आनंदी आनंद गडे …
मी Whatsapp वर धुव्वा … इंडिया मधले ग्रूप जणू माझी वाटच बघत् होते ….घंटाळी . सोवनी बंधू , SES Rockstars, एक आमच्या जवळच्या मित्रांचा ग्रूप … नाव काय तर म्हणे "हलकट" ग्रूप.
फारसा न वापरला गेलेला माझा वाचण्याचा चष्मा … आता whatsapp मुळे, माझा सोबती झाला. मधूनच रात्री २ वाजता ….तुणूक वाजते, आणि एखादा आचरट जोक वाचून हसायला येते … म्ज्जा न काय.
2015 चा संकल्प म्हणून मी "पोट" कमी करायचे ठरविले होते … पण SmartPhone मुळे, पोटाच्या आधी.."बोटे" बारीक करणे गरजेचे झाले आहे. काय वाट्टेल ते टाइप होते जाड्या बोटांनी … आणि भलतेच विनोद होतात.

SmartPhone हाती लागल्या पासून … अजिबात गरज नसलेल्या गोष्टी … अचानक महत्वाच्या झाल्या आहेत …दर 5 -10 मिनिटांनी
1. Reliance चा स्टॉक किती झाला बघणे
2. बापरे 32 Deg F ? पाहून उगाचच एसी मध्ये सुद्धा थंडी वाजायला लागते
3. Whatsapp वर आलेल्या 5-6 Mb च्या files…phone मधून delete करणे
4. अरे वा $ 62 च्या वर गेला वाटते ? वगेरे वगेरे …………………………………
मला कायम वाटते , बाळ रडू नये म्हणून, त्याच्या तोंडात बुच कोंबतातना, आणि ते बिचारे तास अन तास ते चोखत बसते, ना रडता. त्या प्रमाणे SmartPhone हे मोठ्या माणसांसाठी शोधलेले बुच आहे. एकदा हाती लागला, की त्यात काय बघतात कुणास ठाऊक .
मला हा प्रश्ना कायम पडायचा … ऐरपॉर्टवर बोरडिंग ची वाट बघताना, कुठल्याही रांगेत उभे असताना, रेस्टोरेंट मध्ये फुड येई पर्यंत, ट्रॅफिक जाम मध्ये,……..सगळे सारखे फोन कडे बघण्यात बिझी बोटांनी स्क्रीन सारखे खाली वर करण्यात मग्न , मध्येच हसायचे, स्वतःशीच..... एरपोर्ट सारख्या ठिकाणी मी बघितले आहे, SmartPhone पासून डोळे, फक्त तेव्हाच बाजूला होतात, जेव्हा कुणाचा तरी फोन येतो, आणि SmartPhone नामक खेळणे कानाला लावावे लागते.
जागे पाणी सदोदित SmartPhone कडे बघता यावे, म्हणून बरेच शोध लागलेत अलीकडे … उदहाणार्थ car च्या dashboard वरील SmartPhone holder. Stamford यूनिवर्सिटी मधल्या शास्त्रद्यांनी तश्याच टाइप चा होल्डर शोधला आहे, जो आता पूर्णा अमेरिकेतल्या मेन्स पब्लिक restroom मध्ये बसवणार आहेत म्हणे.…… ती दोन चार मिनिटे तरी फोन खिशात ठेवायला लागायचा …..आता तेही नाही,...... वा केवढे ते उपकार मानवजाती वर.

म्हणूनच SmartPhone आणि लग्न , यात मला बरेच साम्य वाटेचे ….. जो खाये वो भी पछ्ताये, जो ना खाये वो भी पछ्ताये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगलं लिहीलंय.
याहूनही छान लिहू शकाल.
एकावेळी चौघांना स्मार्टफोन घेतलेत.
Happy
भारी आहे.
आमचं एक घेताना आर्थिक कंबरडं मोडलं असतं.

मस्तं लिहिलय. फोन घेण्याची कारणे, भविष्याची चाहूल वगैरे खुसखुशीत. हा शोध पण नवीनच समजला Happy

थोड्या शुद्धलेखनाच्या चुका सुधारणार का? उगाच खडा लागतोय असं वाटायला नको म्हणून.