बेंढया... एक अवालिया...
आपल्या आयुष्यात आजूबाजूला आपण अनेक माणसे बघतो. काही चांगली, काही वाईट , काही हसणारी तर काही रडणारी तर काही रडवणारी आणि काही रडून हसवणारी. प्रत्येक क्षण काहीतरी देतोच आपल्याला तश्याच नवीन नवीन ओळखी हि. पण काही माणसे असतात जी आपल्या आयुष्यभर लक्षात राहतात आणि त्याचं जीवन आपल्याला नेहमीच एक कोड असते न उमगलेल असाच हा एक अवलिया...
तो कोसळत होता असाच न सांगता माहित नाही कधी थांबणार होता तो. तरी आज दिवस त्याच होता. त्याच्या येण्याने कुठेतरी सुखावलो तरी मनातून मात्र तुझ्या आठवणीच्या कप्यात ओढलो गेलो. अंधेरी स्टेशन वर रोज सकाळी आपली नजरभेट व्ह्याचीच. तू जायची दादर ला तर मी मित्राची वाट बघत असायचो. रोजचाच तो कटाक्ष आणि ७.४३ ची तुझी दादर लोकल कधीच काही चुकल नाही. त्या दिवशी तो कोसळत होता असाच आजच्या सारखा आणि तुला यायला उशीर झाला. गाडीत चढता चढता तुझी छत्री मात्र राहिली मागे आणि तू गेली पुढे. राहिलेली छत्री मी घेतली लोकांकडून सांगून कि मी तुला ओळखतो. दुसर्या दिवशीची ७.४३ ची लोकल मी विसरूच शकत नाही.
देवळाच्या घाभाऱ्यात बसलेल्या देवाला विचारल
मिळत कारे समाधान तुला या चार भिंतीत
त्यातील समोरची भिंत सजीव पण सतत बदलणारी
त्या भिंतीवरचे भाव वेगळे रंग वेगळे रूप वेगळे
पण एक गोष्ट सारखीच तिचे डोळे जे सदैव मिटलेले
अन तुझ्या अखंड कृपेची वाट बघणारे
तुलाही आता सवय झाली असेल या रंगांची आणि
मिटलेल्या डोळ्यातील अपेक्षांची.
का कंटाळलास तू सुद्धा या रोजच्याच अपेक्षांनी भरलेल्या भिंतीना
वाटत तुलाही जाव पळून कुठेतरी निर्जन ठिकाणी
जेथे असेल फक्त निरागस प्रेम ना कुठल्या भिंती ना कुठले आसन
पण तुला तसही करून चालणार नाही
कारण तुला ह्या भिंतीनीच आसनावर सुरक्षित वा बंदिस्थ
"निकाल बारावीचा"
दरवर्षी बारावीचा निकाल लागला की मला आठवतो तो आमचा बारावीचा निकाल.
बारावीतले आम्ही तिघे मित्र, एका बाकावर बसणारे.. सुर्य उगवल्यापासुन संध्याकाळी झोपायच्या वेळेपर्यंत आम्ही एकत्र असायचो..फक्त जेवायला आणि झोपायला आपापल्या घरी जायचो.. बारावी कॉमर्स शाखा असल्यामुळे अभ्यासाची कधीच काळजी केली नाही. काळजी करायचे आमचे मास्तर.. कसे पास होणार हे विद्यार्थी?
जन्म घेऊन या जगात येण्या इतके तुम्ही सक्षम होत नाहीत तोपर्यंत स्वतःच्या उदरात जी तुम्हाला जपते...ती स्त्री असते
जन्मानंतर जगण्यासाठी लागणार सर्वात पहिल पोष्टिक अन्न जिच्या उदरात तयार होतं ...ती स्त्री असते....
चालायला, बोलायला आणि सर्वाइव करायला लागणारी प्रत्येक महत्वाची शिकवण जी देते ...ती स्त्री असते....
सतत तुमच्या सोबतीने वावरणारी, पहिली स्त्री-पुरुष मैत्रीची देणगी देणारी तुमची हक्काची मैत्रीण तुमची बहिण ...स्त्री असते
गूगल विज्ञान जत्रा ही एक जागतिक आंतर्जालीय विज्ञान स्पर्धा आहे. ही स्पर्धा १३ ते १८ वयोगटातील कोणत्याही देशाच्या मुलांसाठी खूली आहे. गूगल, जगात बदल घडवून आणणार्या कल्पनांच्या शोधात आहे. ह्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी गूगल वर आपले खाते असणे आवश्यक आहे. आपली प्रवेशिका दाखल करण्याची अंतीम तारीख आहे ३० एप्रिल २०१३.
मायबोलीवरील जास्तीत जास्त पालक शिक्षकांनी आपापल्या पाल्या / विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास उत्तेजन द्यावे.
अधिक माहीती साठी ह्या दुव्यावर टिचकी मारू शकता......
कृपया कमकुवत हृदयाच्या वाचकांनी इथेच थांबावे.
हा प्राणी पहा. (चित्र आंतरजालावरून साभार)

या प्राण्यास सार्वजनिक ठिकाणी असे वागताना पाहून आपण काय केलं असतं हे थोडक्यात किंवा विस्ताराने किंवा कसेही लिहा.
घराचं फाटक उघडून मी आत शिरलो. कॅप्टन झाडांना पाणी घालण्यात मग्न होते. मी जिन्यावर चार पावलं चढलो न चढलो, तोच मागून आवाज आला,
“या विजयराव, चहा घेऊ.”
त्यांची ती विनंती म्हणजे ऑर्डरच. ती मोडण्याची हिंमत माझ्यात नव्हती. मी ‘अबाउट टर्न’ केलं आणि खाली आलो. कॅप्टनच्या हातातला पाण्याचा पाइप घेतला, तोंडावर गार पाण्याचे शिबके मारले, आणि रुमालानं तोंड पुसत हॉलमध्ये शिरलो. कॅप्टन शिर्के ग्रीन रंगाचा टी-शर्ट अन रंगीबेरंगी बर्मुडा घालून बहुदा माझीच वाट बघत बसले होते.
मायबोली हे संकेतस्थळ कोणत्या प्रणालीवर आधारीत बनवले आहे?
मराठी मंडळ कोरियाचे अश्याच प्रकारचे संकेत-स्थळ बनवण्याचा विचार आहे,त्याकरीता संकेतस्थळ बनवणारे निष्णात तज्ज्ञ असणे गरजेचे आहे का की ज्याला थोडाफार अनुभव आहे, तोही (मर्यादीत प्रमाणात का होईना) बनवु शकेल?
अगावू धन्यवाद
सुप्रभात मित्रांनो. 
अग्निकोल्ह्याचे नवीन व्हर्जन आले आहे. (Firefox 18)
मोझिल्लाचे म्हणणे आहे की या नवीन व्हर्जनमध्ये पेज लोडींगची स्पिड २५ टक्क्यांनी वाढली आहे.
अजून काय नवीन आहे पाहण्यासाठी :
||
\/
What's New ?