सोप्या पद्धतीने मराठीत लेखन (भाग २ - युबंटू लाईव्ह सीडी)

Submitted by shantanuo on 28 November, 2014 - 08:41

माझा "सोप्या पद्धतीने मराठीत लेखन" हा लेख ज्यांनी वाचला असेल त्यांना मराठीत स्पेल चेक, अ‍ॅटो करेक्ट वगैरे कसे वापरायचे ते लक्षात आलेच असेल.

http://www.maayboli.com/node/39752

पण त्यासाठी कितीतरी सॉफ्ट्वेअर टाकावी लागतात. कॉन्फ्युगरेशन शिकावे लागते. हाताशी विंडोजची सिडी असावी लागते. विंडोजमध्ये मराठीत टाईप करायचे असेल तर किती सव्य / अपसव्य करावे लागतात ते इथे पहा.

http://www.google.co.in/intl/mr/inputtools/windows/windowsxp.html

हे सर्व वापरून नवीन माणूस मराठीत टाईप करायला लागेपर्यंत थकून जातो. त्याचा इंटरेस्ट संपतो. हे सर्व टाळण्यासाठी मी युबंटूमध्ये आवश्यक ती सर्व सॉफ्ट्वेअर आधीच इन्स्टॉल करून एकच एक पॅकेज बनविले आहे.

खाली दिलेल्या लिंकवरून युबंटूची आव्रुत्ती डाऊनलोड करून त्याची सीडी बनवा. ही सीडी आपल्या कॉम्प्युटरमध्ये टाकून तो सुरू करा. आता युबंटू सुरू होईल आणि सर्व मराठी आयुधे आपोआप उपलब्ध होतील. काम झाले की ही सिडी काढून टाका व कॉम्प्यूटर परत चालू करा. आपली आधीची विंडोजची प्रणाली सहीसलामत परत मिळेल.

64 bit:
gamabhana.s3.amazonaws.com/ubuntu-14.10-desktop-customised-amd64.iso

32 bit:
gamabhana.s3.amazonaws.com/ubuntu-14.10-desktop-customised-i386.iso

३२ की ६४ बिटची व्हर्जन टाकावी असा प्रश्न असेल तर सरळ वर दिलेली ३२ बिटची व्हर्जन ट्राय करा. या लाईव्ह सिडीमुळे आपल्या सध्याच्या प्रणालीला कसलाही धक्का न लावता युबंटू आणि मराठी स्पेल चेक असे दोन्ही लाभ मिळवता येतात. अर्थात हे फक्त मराठी सॉफ्टवेअर नसून ही पूर्ण युबंटू ऑपरेटिंग सिस्टिम असल्यामुळे ही फाईल साईज आहे सुमारे २ जीबी ! आता इतकी मोठी फाईल नेटवरून उतरवून घेणे शक्य नसेल तर मला आपला पत्ता कळवा म्हणजे मी ही डीव्हीडी पोस्टाने पाठवून देईन. आणि हो, हे सॉफ्टवेअर पूर्णपणे मोफत आणि मुक्त स्त्रोत आहे.

युबंटूच्या लिबर ऑफिसमध्ये मराठी टाईप आणि स्पेल-चेक कसा दिसेल ते खालील चित्रावरून स्पष्ट होईल.

https://s3.amazonaws.com/gamabhana/aaa1.png

या चित्रात सर्वात वरच्या बाजूला मराठी इनपुट मेथड (इन्स्किप्ट / फोनेटिक) निवडण्याचा पर्याय दिसत आहे. मधल्या भागात लाल रंगावर राईट क्लिक केल्यावर शुद्ध शब्दांचे पर्याय दिसत आहेत.

आपल्याला काही सुधारणा सुचवायच्या असल्या तर त्या देखील कळवा म्हणजे पुढच्या आवृत्तीत सुधारणा करता येतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाइव्ह सिडी म्हणजे काय?
उम्बटु इन्स्टॉल करावे लागते का?
मग विन्डोज आणि त्याच्यात पार्टिशन कसं होतं?

लाइव्ह सिडी म्हणजे काय ते येथे वाचायला मिळेल.
http://mr.upakram.org/node/308

युबंटू इन्स्टॉल केलेच पाहिजे असे नाही. ती लाईव्ह सिडी काढून संगणक परत सुरू केला की विंडोज !

मी लाईव्ह सीडी वापरुन पाहीली त्यामधे विशेष असे कस्टमायझेशन आढळले नाही. फक्त ibus मधे मराठी Keyboard load केले आहेत.स्पेल चेक पण वापरुन पाहीला."षटकोन"लिहीण्या ऎवजी "शटकोन" असे लिहुन स्पेल चेक केले.तर काटकोन अशी correction सुचवण्यात आली.मल वाटले होते कि Office चा ईंटरफेस पूर्णपणे मराठीत असेल पण तो इंग्रजीतच आहे.

या सिडीतील काही गोष्टी आपल्या नजरेला आणू इच्छितो:

ऑटो-करेक्ट
मी itrans मध्ये टाईप करताना जर काही चुका झाल्या तर त्या आपोआप सुधारल्या जातात. उदा. "चूका" हा शब्द यात आपोआप "चुका" असा बदलला गेला आहे. असे हजारो शब्द सुधारले जातील.

डिफॉल्ट मराठी:
संगणक सुरू केल्यावर आपण थेट मराठीत टाईप करायला सुरू करतो. ऑफिसचा रायटरदेखील मराठीत सुरू होतो. आता हे एक किंवा दोन क्लिक करून कोणीही करू शकतो हे मान्य. पण त्या दोन क्लिक कुठे करायच्या हे शिकण्याचा वेळ वाचतो. तीच गोष्ट Ctrl + shift + M या शॉर्टकटची. याने आपली इनपुट मेथड बदलता येते. IBUS च्या सेटिंगमध्ये जाऊन हे कोणालाही करता येऊ शकते. पण अगदी नवीन माणसाला शॉर्टकट सेट करणे सहजपणे जमेल का?

फॉन्ट:
IBUS मध्ये नसलेले अक्षरयोगिनीसारखे सुबक फॉन्ट यात आहेत.

स्पेल चेक:
शटकोन असे लिहून स्पेल चेक केले. तर काटकोन अशी correction सुचवण्यात आली. हे आपले निरीक्षण बरोबर आहे. पण असे का झाले असावे? मुळात "षटकोन" हा शब्द यातील कोशात नाही. आपण जर षटकोन शब्दावर उजवी क्लिक करून "add to dictionary" असा पर्याय निवडला तर पुढच्या वेळी आपल्याला अपेक्षित पर्याय मिळेल. हा स्पेलचेक माझ्यासारख्या उत्साही मंडळींनी हौस किंवा छंद म्हणून बनविलेला असल्याने त्यात काही त्रुटी असणे शक्य आहे. हा उपक्रम कसा सुरू झाला ते आपण येथे वाचू शकता.
http://mr.upakram.org/node/1834

हायफनेशन:
पॅराग्राफ जस्टीफाय केल्यावर जी जास्तीची जागा दोन शब्दांमध्ये मोकळी राहते त्यासाठी पॅराग्राफ सेटिंगमध्ये टेक्स्ट फ्लो टॅबमध्ये हायफनेशनचा पर्याय स्वीकारता येतो. (नेहमीच्या उबंटूत हा पर्याय इंग्रजीसाठी चालतो. मराठीसाठी नाही.)

फायरफॉक्स स्पेलचेक:
हाच स्पेल चेक फायरफोक्ससाठी देखील (बाय डिफॉल्ट) उपलब्ध आहे.
_____

फक्त ibus मधे मराठी Keyboard load केले आहेत, विशेष काही नाही - असे मानले तरी ते देखील जमवायला मला सुरवातीला खूप श्रम पडले होते. नव्याने मराठीत टाईप करू लागलेल्यांचा वेळ वाचावा असा यामागील उद्देश आहे.

ऑफिस, फायरफॉक्स (आणि इतर) एप्लिकेशनचा पूर्ण इंटरफेस मराठीत असावा अशी अपेक्षा रास्त आहे. पण ते कसे करता येऊ शकेल हे जर कोणी तज्ञाने सांगितले तर मी पुढील आवृत्तीत त्याचा समावेश करू शकेन.

(हा प्रतिसाद या सीडीतून टाईप करून दिलेला आहे.)

या सिडी मधील आयट्रान्स प्रणाली वापरून काही मजकूर टाईप केल्यावर खालील ३ गोष्टी माझ्या लक्षात आल्या आहेत. येथे बरेच तज्ज्ञ असून कोणीतरी यावर प्रकाश टाकेल अशी आशा आहे.

१) व्यंजनाला स्वर जोडल्यानंतर व्यंजन मूळ रुपात (पाय मोडक्या अवस्थेत ) राहू शकत नाही. त्यामुळे खालील शब्द नुसता अशुद्ध नाही तर तो मुळात शब्दच नाही!
ग्ंगा
तर ते एक व्यंग म्हणता येईल. असे शब्द सहसा कोणत्याही इनपुट मेथडमध्ये काढता येत नाहीत. पण या आयट्रान्स प्रणालीमध्ये ते शक्य आहे. याला कॉम्प्युटर ग्लिच म्हणता येईल.

२) पूर्णविराम देताना काही विचित्र प्रकार घडताना दिसतात. 'आहे' असा शब्द टंकून लगेच पूर्णविराम द्यावा तर इंग्रजी eहे अक्षर टंकून येत आहे. त्यासाठी स्पेस देऊन मग फुल-स्टॉप दिल्यावर मागे जाऊन स्पेस काढून टाकावी लागत आहे. हा काय प्रकार आहे?

३) तिसरा मुद्दा अ‍ॅटो-करेक्ट विषयी आहे. 'करता' असा शब्द आपोआप 'कर्ता' असा बदलतो आहे. याचे कारण मला माहीत आहे. स्पेल चेकच्या सोर्स कोडमध्ये बदल करून तो शब्द काढून टाकावा लागेल. तोपर्यंत undo (ctrl + z) वापरतो आहे.

गं आणि ग: ही दोन अक्षरे टाईप् करताना मुळाक्षर पूर्ण करून मग स्वर (अनुस्वार अथवा विसर्ग) लावावा लागतो.

ग गा गि गी गु गू गे गै गो गौ ग्ं ग्:
ga gaa gi gI gu gU ge gai go gou gM g:

पायमोडक्या ग ला इकार किंवा उकार लावता येत नाही. पण अनुस्वार मात्र वर दाखविल्याप्रमाणे लावता येतो. त्यासाठी ग पूर्ण करून मगच त्याला अनुस्वार लावावा खाली दाखविल्याप्रमाणे.

gaM ga:
गं ग:

ही समस्या आयट्रान्स प्रणालीतच उद्भवली. फोनेटिक/ इन्स्क्रिप्ट / कगप या तीन प्रणालीत ही समस्या नाही. उदाहरण म्हणजे इन्क्रिप्टमध्ये मुळाक्षराला स्वर लावून मिळतो. मूळ अक्षर हवे असेल तर d द्यावा लागतो .

गं ग्ं
ix idx

तर मग फोनेटिक/ इन्स्क्रिप्ट / कगप यातील एखादा पर्याय का नाही निवडत? कारण त्यात ओ आणि औ वेगळ्या की स्रोकवर आहेत. ते शिकावे लागेल. आयट्रान्स पद्धतीने लिहू गेल्यास त्यात हे असे दिसते .

ग गा गि गी गु गू गॆ गाि गॊ गॊु गं ग:

असे असेल तर आयट्रान्स मध्येच gM च्या एवजी gaM लिहायला काय प्रॉब्लेम आहे? त्याने वेगावर परिणाम होतो . सध्या मी १० (WPM) वर्ड प्रति मिनीट टाईप करू शकतो . मराठीत संस्कृत प्रमाणे ग: टाईप् करावे लागत नाही. पण ग्ं सारखा अनुस्वार मात्र मराठीत बराच येत येतो. आयट्रान्सच्या सोर्स कोडमध्ये डोकावून पहिल्या दोन समस्यांवर काही उपाय मिळतो का ते पहायला हव्e. (पहा 'हवे' शब्द टाईप करून पूर्णविराम द्यावा तर ए. चे e. होत आहे. )

कदाचित हे दोन बग्स रीपोर्ट होऊन फिक्सही झाले असतील. पण मग त्यासाठी उबंटूची इनपुट मेथड अपग्रेड करून पहावी लागेल. Happy

युबंटू लाईव्ह सीडीची नवीन आवृत्ती आता उपलब्ध आहे. युबंटूच्या १८.०४ या व्हर्जनमध्ये मराठीसाठी अनुकूल बदल करून बनविलेल्या नवीन युबंटूला "रिमास्टर" असेही म्हणतात. यात लिबर ऑफिसचा स्पेल चेक व फायरफॉक्सचे मराठी स्पेल चेक ऍड ऑन अर्थात आहेच. Audacity आणि GIMP ही मूळ युबंटूत नसलेली सॉफ्टवेअर यात आधीच टाक़ून ठेवलेली आहेत.

त्याव्यतिरिक्त दोन मुख्य सुधारणा केल्या आहेत.
१) यशोमुद्रा, जैनी, लैला यासारखे अनेक युनिकोड फॉन्ट
२) मराठी / इंग्लिश दोन्ही भाषेत सहज टाईप करता यावे म्हणून F9 ही टॉगल की ऍड केली. "प्रमुख" सॉफ्टवेअरमध्ये F9 हीच की वापरली आहे. म्हणून युबंटूमध्ये देखील तीच ठेवली.

s3.ap-south-1.amazonaws.com/kagapa/ubuntu-18.04-v7-2-remaster.iso

वर दिलेली फाईल डाऊनलोड करून घ्या. याची साईज खूप मोठी आहे. (सुमारे दोन जी.बी. ) त्यानंतर "निरो" या सॉफ्टवेअरमध्ये "Burn Image to Disk” असा ऑप्शन वापरून युबंटूची सी.डी. तयार करा. ही सी.डी. कोणत्याही कॉम्प्युटरमध्ये टाकून तो सुरू केला की विंडोजच्या ऐवजी युबंटू सुरू होईल. सिडी काढून कॉम्प्युटर परत सुरू केला की पुन्हा विंडोज. याला लाईव्ह सिडी असे म्हणतात. याची चर्चा उपक्रमाच्या या पानावर वाचता येईल. कोणाला जर याचा सोर्स कोड पाहायचा असेल तर तो येथे उपलब्ध आहे.

हो, मी आयबस आयट्रान्स वापरतो. गमभन इथे वेबसाईटवर वापरल्यामुळे ते जास्त सोपं वाटतंय. म्हणून विचारलं की उबंटू वर ते इन्स्टॉल करता येऊ शकतं का. शंतनू यांनी त्याच्यासकट पूर्ण उबंटू 18 ची डीव्हीडी केली आहे, पण मला नुसतं ते पाहिजे.

फोनेटिक, आयट्रांस, इन्स्र्किप्ट आणि कगप असे चार पर्याय माझ्या युबंटूत उपलब्ध आहेत. या चित्रात दाखविल्याप्रमाणे. त्यातील आयट्रांस ही प्रणाली गमभन/ मायबोलीशी जवळीक साधणारी आहे. एक दोन अक्षरे नव्याने शिकावी लागतील. पण ते कठीण जाणार नाही. डी.व्ही.डी. वापरणे शक्य नसेल तर खाली दिलेली कमांड वापरून पहा.

apt install ibus{,-m17n,,-gtk} im-config -y

आयट्रान्स आणि मायबोलीवरील गमभन यात नेमका काय फरक आपल्याला जाणवला ? फक्त काही ठराविक दोन चार अक्षरांचाच फरक आहे की बराच फरक पडत आहे? तसे असेल तर फोनेटिक, इन्स्र्किप्ट किंवा कगप या तीनपैकी एक की-बोर्ड शिकावा लागेल असे मला वाटते.

उबंटूवर ऑफलाइन (म्हणजे ब्राउजर न वापरता) मराठी लिहायचे असेल तर मलापण हा त्रास झाला आहे.
iTrans (m17n) ही प्रणाली त्यातल्या त्यात "गमभन"च्या जवळ जाणारी आहे. बाकी इतर KaGaPa phonetic, inscript (m17n), phonetic (m17n)आणि हिंदी बोलनागरी वापरून मराठी लिहिणे खूपच कठीण आहे आणि पटपट लिहिणे तर जवळपास अशक्य आहे, विशेषतः मायबोली आणि मिसळपावसारखी "गमभन"ची सवय असेल तर.

iTrans (m17n) मध्ये पुढील अक्षरे लिहिताना त्रास होतो.
उ, ऊ, इ, ई ( उदा: कठीण kaThiiNa vs kaTheeN) अनुस्वार (उदा: मं), ट, अ‍ॅ, ऑ
तसेच प्रत्येक अक्षरापुढे a हे अक्षर वापरावे लागते, स्पेस वापरून चालत नाही. paLoon jaa = पळॊन् जा, असा अचानक् कसा काय् आलास् वगैरे.

akShare
axare = अक्षरे

कॅपिटल लिहिताना:
iTrans (m17n) मध्ये
आ B C ड् ऎ F ग़् ः ई ज़् ख़् ळ् ं ण् ऒ P Q R S ट् ऊ V W X य़् Z

"गमभन"मध्ये
आ ब च ड अ‍ॅ फ ङ । ई ़ ़ ळ ं ण ऑ प ॓ र्‍ स ट ऊ व क्ष ञ झ

iTrans (m17n)
ee = ऎ , I = ई

गमभन:
ee = I = ई

वरती उपाशी बोका ह्यांनी भरपूर उदाहरणं दिली आहेत. मला आचार्यांनी आणि आचाऱ्यांनी हे वेगळं लिहिता आलं नाही itrans मध्ये. शिवाय ऑ, ऍ (हा पण चूक आहे, पण तो अँड्रॉइडवर लिहिलाय) हे जमत नाहीत.

आयट्रांन्सचा ऑनलाईन इंटरफेस येथे उपलब्ध आहे.

https://www.aczoom.com/itrans/online/

या पानावर “customize this package” ही लिंक़ आहे. त्यात दिलेली माहिती वापरून कोणाला काय हवा तो बदल करता येतो. असा बदल करून बनविलेली .tsv फाईल मला मिळाली की ती ऑफलाईन कशी वापरता येईल याबद्दल खटपट करता येईल. उदाहरणार्थ मी या फाईलमध्ये कॅपिटल E व कॅपिटल O या अक्षरांत बदल केला त्यामुळे मला आता फॉक्स, फॅक्स असे शब्द गमभन सारखे सहज काढता येतात. त्यासाठी वर दिलेल्या पानाऐवजी खाली दिलेल्या लिंकवर जावे लागेल.

https://tinyurl.com/itransnew

बदल केलेली फाईल जिटहबवर अपलोड केली की त्यात काय बदल झालेत ते नीट पाहता येतात. हे असे…

https://tinyurl.com/2p9uswp5

आपल्याला नेमके काय बदल हवे आहेत ते त्या फाईलमध्ये लिहायचे आहेत. आयट्रांंसमध्ये सुधारणा हवी असेल तर इतके तरी परिश्रम करावेच लागतील. ओपन सोर्स सॉफ्टवेअरचे काम लोकशाहीसारखे चालते. फ्री आणि ओपन सोर्स म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकसहभागातून बनवलेले सॉफ्टवेअर!

मराठी आयट्रांसमध्ये सुधारणा करत बसायला कोणाला वेळ नसेल तर सरळ हिंदी आयट्रांस वापरा. तो की-बोर्ड पुष्कळसा गमभनसारखा आहे. फक्त सर्व मजकूर टाईप करून झाल्यावर "फाईंड रिप्लेस" वापरून दंड । पूर्णविरामात बदलून घ्यावा लागेल!

अखेरीस उपाय मिळाला आहे, जो मी पूर्वी लिहिला होता. हिंदी itrans(m17n) पेक्षा मराठी itrans(m17n) चांगला आहे कारण त्यामुळे मराठी स्पेल चेकर वापरता येतो. (उबुन्टु २०.०४ वर)

marathi-itrans-m17n-keyboard1.jpg

अ‍ॅपल, बॉक्स हे शब्द नीट लिहिता येत नाहीत आणि इतर थोड्या गैरसोई आहेत (उदा. "आहे." हा शब्द पूर्णविरामासहित लिहिला की आहe असा लिहिला जातो, I = ई पण ee <> ई, ee = ऎ ) . मी तो त्रास कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण एकंदरीत Marathi(itrans(m17n)) कीबोर्ड हा "गमभन"च्या ९०-९५% टक्के जवळ जाणारा आहे.

गमभन आता लिनक्सवर कसे आणायचे ते आता कळले आहे. त्याची माहिती पुढीलप्रमाणे.
$cd /usr/share/m17n
$sudo cp mr-itrans.mim mr-gamabhana.mim

मग mr-gamabhana.mim ही फाइल एडिट करा.
$sudo edit mr-gamabhana.mim (सूडो वापरणे महत्वाचे आहे. File must be owned by root.)
महत्वाचे म्हणजे पुढील बदल हवेत. (पहिली ओळ ही फक्त कॉमेंट आहे)
;; mr-gamabhana.mim -- Marathi input method with ITRANS method
(input-method mr gamabhana)

तुम्हाला जमत नसेल तर मी माझी फाईल पाठवू शकेन. (अजून १००% टेस्ट केलेली नाही, पण बर्‍यापैकी बदल केले आहेत ते व्यवस्थित वाटले)
नंतर रिबूट करा.
सेटिंग्ज => रिजन्/लँग्वेज मध्ये जाऊन Marathi (gamabhana(m17n)) इंस्टॉल करा आणि मग LibreOffice Writer मध्ये लिहून बघा.

m17n-gamabhana.png

पुढील साईट उपयुक्त आहे जिचा फायदा झाला.
https://www.nongnu.org/m17n/
Read related pages => Data provided by the m17n database
Read related pages => tutorial

आपण केलेल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद. मी हिंदी आयट्रान्स फाईल कॉपी करून घेतली कारण त्यात प्रत्येक शब्दानंतर अधिकचा a लावावा लागत नाही. याबरोबर मराठी स्पेलचेकही अगदी व्यवस्थित चालत आहे. या पानावर दिलेले ५-६ बदल केल्यावर १००% गमभन पद्धतीने लिहिता येत आहे. उदा...

ऑस्कर Oskar
ॲपल Epal
फॅक्स phEks
फॉक्स phOks
कुऱ्हाड kuRhaaD
दऱ्यात daRyaat
दर्यात daryaat

युबंटू (लिनक्स) वापरणाऱ्यांची आणि त्यातही मराठीत टाईप करणाऱ्यांची संख्या नगण्य आहे याची मला कल्पना आहे. तरी पण असे विचारावेसे वाटते की अगदी सोप्या पद्धतीने जलद टायपिंग करता येणारी ही नवीन आयट्रान्स पद्धत कोणी आयबसमध्ये इंटिग्रेट करून देईल का?

मी जेव्हा चुकून "पध्दत" असे टाईप करतो तेव्हा ऍटोकरेक्टद्वारे ते आपोआप बदलून "पद्धत" असे होत आहे. पण मी जेव्हा "पध्दतीसाठी" असे टाईप करतो तेव्हा ऍटोकरेक्ट ट्रीगर होत नाही. त्यासाठी पध्दतीसाठी > पद्धतीसाठी अशी नोंद कुणीतरी सोर्स कोडमध्ये करावी लागेल. पण मग असे हजारो/ लाखो शब्द ऍटोकरेक्टमध्ये टाकले गेले तर संगणक नक्कीच क्रॅश होईल किंवा ऍटोकरेक्ट चालणेच बंद होईल. त्यासाठी खाली दिलेली नोंद आयट्रांसच्या consonant विभागात केली तर मला ध्द असे टाईप करताच येणार नाही. कारण अर्धा ध आणि द साठी dh + d असे जेव्हा मी टाईप करेन तेव्हा ध्द च्या ऐवजी द्ध उमटेल.

("dhd" "द्ध्")

सध्याच्या प्रणालीत "पध्दत" शब्द टाईप करून स्पेस दिल्यावर तो "पद्धत" असा होतो हे खरे. पण मी लगेच undo (control + Z) केले तर तो परत पध्दत असा करता येतो. किंवा ऍटोकरेक्ट तात्पुरते डिसेबल करण्याचा पर्याय (Tools – Autocorrect – while typing) देखील उपलब्ध आहे. पण आता इनपुट मेथडच बदललेली असल्यामुळे मला जर काही कारणाने पध्दत असेच टाईप करायचे असेल तर मग की-बोर्ड आयट्रांस, फोनेटिक किंवा इंस्क्रिप्ट असा बदलून तो चुकीचा ध्द टाईप करावा लागत आहे. निर्दोष व जलद टायपिंगसाठी इतकी उठाठेव करायची माझी तयारी आहे!
नेहमी चुकणारी अशीच आणखी काही अक्षरे/जोडाक्षरे कोणी सुचविली तर ती देखील या इनपुट मेथडमध्ये टाकता येतील.

नवीन आयट्रान्स पद्धत कोणी आयबसमध्ये इंटिग्रेट करून देईल का? >> प्रयत्न सुरू आहेत.

याव्यतिरिक्त मी केलेले बदल.
१. पुढील कोड (danda शी संबंधित सर्व कोड) काढून टाकला आहे कारण त्याची गरज नाही.
(danda
((?. Return) "।" (pushback 1))
((?. Tab) "।" (pushback 1))
(".(" "।" (pushback 1))
(".)" "।" (pushback 1))
(".[" "।" (pushback 1))
(".]" "।" (pushback 1))
(".{" "।" (pushback 1))
(".}" "।" (pushback 1))
(".'" "।" (pushback 1))
(".\"" "।" (pushback 1)))

(intermediate
;; CANDRA-E-O is set to the character CANDRA E or CANDRA O when "e"
;; or "o" is typed, and in that case, if ".c" is typed, the
;; character set to CANDRA-E-O is inserted.
(t (set CANDRA-E-O 0))
;; LAST-HALANT-POS is set to the position after a consonat + HALANT
;; sequence. If the following key is for non-letter, that HALANT
;; character is removed.
(consonant (mark LAST-HALANT-POS) (shift second))
(independent (cond (CANDRA-E-O (shift after-eo)) (1 (shift init))))
(digit (shift init))
(danda (shift init))
(backspace)
(commit-key (shift init)))

(second
;; CANDRA-E-O is set to the character CANDRA E or CANDRA O when "e"
;; or "o" is typed, and in that case, if ".c" is typed, the
;; character set to CANDRA-E-O is inserted.
(t (set CANDRA-E-O 0))
(consonant (mark LAST-HALANT-POS))
(dependent (cond (CANDRA-E-O (shift after-eo)) (1 (shift init))))
(danda
(cond (trim-last-halant (move LAST-HALANT-POS) (delete @-) (move @>)))
(shift init))

(backspace)
(commit-key (shift init))
(nil (cond (trim-last-halant (move LAST-HALANT-POS) (delete @-) (move @>)))
(shift init)
))

(after-eo
(t (set DOT 0))
(dot)
(eo-dot-c (shift init))
(danda (shift init))
(commit-key (shift init))
(nil (cond (DOT (delete @-) (pushback 1))) (shift init))))

२. "oo" चे मॅपिंग "ऊ" बरोबर केले आहे.
(independent
("oo" (set CANDRA-E-O 0) "ऊ") ; not in ITRANS Devanagari table

(dependent
("oo" (delete @-) (set CANDRA-E-O 0) "ू") ; not in ITRANS Devanagari table

आपल्या सहभागाबद्दल धन्यवाद.
पण कोण काय बदल करत आहे त्या विषयी माझा गोंधळ होऊ शकतो. कृपया खाली दिलेल्या सूचना पहा…

१) जिटहबवरील खाली दिलेल्या साईटवर जाऊन "फोर्क" लिंकवर क्लिक केली की प्रोजेक्ट तुमच्या अकाऊंटमध्ये कॉपी होईल.

https://github.com/shantanuo/spell_check

२) आता तुम्ही तुम्हाला जे योग्य वाटतील ते बदल mr-gamabhana.mim या फाईलमध्ये करा.

३) त्यानंतर पुल-रिक्वेस्ट या लिंकवर क्लिक करून नवीन पुल-रिक्वेस्ट तयार करा.

अशाने प्रत्येक फाईलची वेगळी आवृत्ती त्याच्या कर्त्याच्या नावाने साठविली जाते. काय बदल झाले ते सहज कळते. काही चूक झाली तर मागे फिरता येते. (आणि प्रोग्रामर म्हणून मान मिळतो!)

शक्य असल्यास वरील प्रतिसाद संपादित करा.

युबंटू (किंवा फेडोरासारखी लिनक्स) सिस्टीम वापरत असाल तर टायपिंग बूस्टर वापरून आपला वेग वाढवू शकता. त्यासाठी ही कमांड वापरा...

sudo apt install ibus-typing-booster

आयबसमध्ये आयट्रांस इंस्टॉल केले होते तसेच बूस्टर इंस्टॉल करा, या चित्रात दाखविल्याप्रमाणे.

आता आपल्याला सर्व बाजूंनी मदत मिळायला सुरुवात होईल. ही अशी..

ज्यांचा टायपिंगचा स्पीड चांगला आहे त्यांच्यासाठी ही सुविधा म्हणजे "भीक नको पण कुत्रा आवर" अशी होण्याची शक्यता आहे. पण नव्यानेच संगणक वापरणाऱ्यांची "घेता किती घेशील दो करांनी” अशी स्थिती होईल!

हा की-बोर्ड उबंटूसाठी एका पॅकेजच्या स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे. खाली दिलेल्या ३ कमांड एकामागून एक अशा पद्धतीने टाईप किंवा कॉपी पेस्ट कराव्या.

sudo add-apt-repository ppa:gamabhana-team/gamabhana
sudo apt-get update
sudo apt install gamabhana

आपला संगणक बंद करून पुन्हा सुरू करण्याची आवश्यकता नाही पण काही समस्या आल्यास तसे करून पहायला हरकत नाही. अगदी नवीन युबंटू संगणकावर देखील ही कमांड वापरता येईल कारण मराठीत टाईप करण्याकरता आवश्यक असणारी सॉफ्टवेअर (जसे आयबस, एम१७एन) देखील यातून आपोआप इंस्टॉल होतील. पन्नासहून अधिक फाँट आणि अतिशय सोप्या पद्धतीचा गमभन की-बोर्ड मुक्त स्रोत लायसन्सद्वारे उपलब्ध आहे. मोफत आहे, हे वेगळे सांगायला नको.

अतिशय पुण्याचं काम केलं आहे तुम्ही! कित्येक दिवस गमभन कीबोर्ड शोधतो आहे. आता ह्या विकांताला हे काम उबनटूवर फत्ते करून टाकतो. धन्यवाद.
पुढे वापर करून प्रतिक्रिया कळवीनच.

मी पॉप ओ एस नावाचं उबुंटूचं एक रूप वापरतो आहे. (विज्ञान वगैरे लोकांसाठी त्यात बरेच क्स्टमाइझ्ड गोष्टी अंतर्भूत आहेत). त्यावर मी वरचा गमभन कीबोर्ड इन्स्टॉल केला. तो कीबोर्डच्या यादीत दिसत नव्हता त्यामुळे एकदा रिबूट करावे लागले. पण आता व्यवस्थित चालतो आहे. कित्येक वर्षांची प्रतिक्षा संपली. ह्यासाठी मी वणवण भटकत होतो. अखेर हा कीबोर्ड मिळाला. तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत.

ह्यात ट्र, प्र, र्‍ह, र्ह, र्‍य, र्य, अ‍ॅ, ऑ, अँ, आँ, ॐ इत्यादी सर्व अगदी सहज टंकता येते आहे. ह्याचा शक्य तितका प्रसार करावा आणि गूगलच्या 'वापरकर्त्यांच्या चुकीच्या, आणि काही हिंदी लेखनावर आधारित बर्‍याचदा चुकीच्या पद्धतीने लिहिले जाणार्‍या फोनेटिक' कळपाटापासून मराठी जनांची मुक्तता करावी.

एकच सुधारणा सुचवू इच्छितो. ज्ञ हे अक्षर आपण मराठी लोक द्+न्+य असं जरी उच्चारत असलो, तरी ते मुळात ज्+ञ असं आहे. त्यामुळे j + SHIFT n किंवा j + SHIFT y दाबल्यावरही ज्ञ उमटायला हवा, जे सध्या होत नाहीये. तेवढा बदल करता येईल का?

ता.क.
बदल करायची गरज नाही. असं लक्षात आलं की j + SHIFT n + SHIFT y दाबल्यावर ज्ञ उमटतो आहे. हे योग्यच आहे. धन्यवाद.

रेड हॅटची फेडोरा ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरणाऱ्यांना आता गमभन वापरणे अधिक सोपे होईल कारण आयबस इंस्टॉल करताना आयट्रान्स, इंस्क्रिप्ट बरोबर हा की-बोर्डदेखील आपोआप उपलब्ध होईल.

https://bodhi.fedoraproject.org/updates/FEDORA-2022-742f4d9ed2

आणखी एक गोष्ट सांगायला हवी ती म्हणजे युनिकोड संकेतांक माहीत असेल तर ते यात थेट टाईप करता येतात. त्यासाठी कंट्रोल (ctrl) + u अशी दोन्ही बटणे दाबायची आणि मग युनिकोड नंबर लिहायचा. उदाहरणार्थ 094d हा नंबर आहे पाय मोडक्या हलन्ताचा ् "अन अवाक खर्रकन विद्युत” हे शब्द जर "अन् अवाक् खर्रकन्‌ विद्युत्” असे लिहायचे असतील तर त्या शब्दाच्या शेवटी कर्सर नेऊन आधी ctrl + u टाईप करावे. त्यामुळे स्क्रीनवर U+ असे चिन्ह येईल. त्यापुढे 094d इतकेच टाईप केले की हलन्त येईल. गूगलमध्ये शोधले तर हे संकेतांक सहज मिळतात. दुसरे उदाहरण म्हणजे u+20b9 हा नंबर भारतीय रुपयासाठी निश्चित केला गेला आहे. रुपयाचे हे चिन्ह ₹ कोणत्याही की-बोर्ड सपोर्टची वाट न पाहता नुसत्या नंबराने थेट टाईप करता येते.

Pages