मुक्तस्रोत(Open Source)

दुःख गंधाळून गेले !

Submitted by राजीव मासरूळकर on 21 August, 2012 - 22:14

दुःख गंधाळून गेले !

ओठ सुकले, पापण्यांचे काठही वाळून गेले
पावसा रे, लांबुनी जाणे तुझे जाळून गेले !

वेदनांचे वेद गाणाऱ्‍या दरिद्री माणसांनो
त्याग केलेल्या जनांचे दुःख गंधाळून गेले !

तू असेतो कैक तारे चेहरे झाकून होते
तू निघाला , काजवेही फार चेकाळून गेले !

"कोवळ्या कोँबांतला टाहो कुणी ऐका जरा ना "
वांझ झालेले बियाणे आसवे ढाळून गेले !

संत योगी झुंजले ज्या भ्रष्ट मार्गाच्या विरोधी
शेवटी ते राजनीतीलाच ओवाळून गेले !

लाख वेळा बोललो श्वासांस थांबा एकदाचे
तू उभी दारात नी ते नेमके पाळून गेले !

तरी गीत गावे

Submitted by राजीव मासरूळकर on 20 August, 2012 - 12:35

@तरी गीत गावे@

रुसावे फुगावे
तरी गीत गावे

नभी मेघ येती
लपेटून कावे

फुलालाच नाही
सुगंधी सुगावे

जगा हासवाया
उरा अंथरावे

दहा मैल चारा
सहा हात दावे

खरा न्याय द्याया
पुरावे पुरावे

इथे श्वान झाले
सराईत छावे

सुखे वंचितांचे
स्वतः देव व्हावे

- राजीव मासरूळकर
मासरूळ ता जि बुलडाणा

उसासे

Submitted by राजीव मासरूळकर on 20 August, 2012 - 11:19

उसासे

मला काय झाले
उरी युद्ध चाले

उन्हाला खुणावी
तमाधीन प्याले

सुखाच्या दूकानी
दुखाचे मसाले

सले पावसाला
(ढगांचे उमाळे)

मतांच्या महाली
पडे रोज घाले

वसंतास सांगा
फुलोरे गळाले

हवे नेमके ते
कुणाला मिळाले ?

हसू लागता मी
उसासे निघाले !

- राजीव मासरूळकर

मायबोलीवर प्रथमतःच लिहितो आहे . इथल्या वातावरणाचा सराव नाही . सर्वाँच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत आहे .

शब्दखुणा: 

उसासे

Submitted by राजीव मासरूळकर on 20 August, 2012 - 11:18

उसासे

मला काय झाले
उरी युद्ध चाले

उन्हाला खुणावी
तमाधीन प्याले

सुखाच्या दूकानी
दुखाचे मसाले

सले पावसाला
(ढगांचे उमाळे)

मतांच्या महाली
पडे रोज घाले

वसंतास सांगा
फुलोरे गळाले

हवे नेमके ते
कुणाला मिळाले ?

हसू लागता मी
उसासे निघाले !

- राजीव मासरूळकर

मायबोलीवर प्रथमतःच लिहितो आहे . इथल्या वातावरणाचा सराव नाही . सर्वाँच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत आहे .

शब्दखुणा: 

विषय क्र. ३ : माझ्या मनातला मराठी चित्रपट

Submitted by Kiran.. on 19 August, 2012 - 11:44

सह्याद्रीवर दूरदर्शनचे सुवर्णक्षण दाखवले गेले. कुणीतरी आवर्जून फोन केल्याने टीव्ही लावला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. पडद्यावर पथनाट्याच्या धाटणीचं एक नाटक सादर केलं जात होतं. वेटिंग फॉर गोदो या नावाचं ते नाटक... सुरूवातीला काही कळेचना. माझ्या मेंदूच्या आकलनाच्या सीमा ढवळून काढणारं काहीतरी समोर घडत होतं आणि सुन्न करणारा एक अनुभव घेऊन मी अवाक होऊन गेलो होतो. एक जबरदस्त संहिता ! कुणी लिहीलीये हे या क्षणाला माहीत नाही, कधी लिहीलिये हे ही माहीत नाही. पण टाईमलेस अशी ती कलाकृती होती.

येताय दरोडे टाकायला ?

Submitted by Kiran.. on 18 August, 2012 - 07:13

टीप : माझे डोळे नुकतेच उघडलेत. सर्वांचे उघडावेत या सदिच्छेपोटी हा लेखनप्रपंच. उपरोध, उपहास या प्रकाराशी माझा संबंध येत नसल्याने सर्व लिखाण नम्रतेने वाचावे.

शाळा शिकून जे शिकलो त्यामुळे नोकरीचे विचार सतत मनात घोळत असतानाची गोष्ट. कुणी सरकारात गेला, कुणी मल्टीनॅशनल मधे गेला कुणी नुकत्याच जम बसलेल्या आयटी क्षेत्रात गेला तर कुणी मनपा, रेशन कार्ड, जमीन महसूल खाते अशा ठिकाणी गेला. ज्याला कुठेच काही संधी मिळाली नाही त्यांच्याशी काही वर्षे संपर्क राहीला मात्र त्यांच्या अडचणींची जंत्री वाढत गेल्याने सगळेच सेटल्डस त्यांना टाळू लागले. सहानुभूती मात्र होतीच !!

होता एक दिवस असा ....

Submitted by तनवीर सिद्दीकी on 18 August, 2012 - 06:23

तो 'दिवस'च किती छान होता..!!

दिवसभर काबाडकष्ट करून 'दिवस' जेव्हा घरी यायचा
'रात्र' चुलीवर भाकऱ्या थापत बसलेली असायची
वंशाचा 'दिवा' क्षणार्धात उजळायचा
दिवसाने त्याच्या डोळ्यातले मोती मोजायचे
रात्रीने दोघांकडे प्रेमाने पाहायचे
जरासे इथे तिथे करपलेले चंद्र सर्वांनी आनंदाने गिळायचे
आणि
रात्रीच्या खांद्यावर हात ठेवून
सूर्याला कडेवर घेवून
दिवसाने उगाचच आभाळातले चंद्र मोजायचे..

आभाळात मिणमिणते तारे बघूनच खुश असणाऱ्या सूर्याकडे बघत
मग थकून दिवस मालवायचा एकदाचा
सर्वापासून लपवलेला आकाशातला चंद्र
त्याच्या डायरीत चिकटायचा एकदाचा..

आणि रात्रीच्या केसात हात फिरवत

अभूतप्रेम

Submitted by तनवीर सिद्दीकी on 18 August, 2012 - 06:15

'अजून एक बनव' - एका हाताने ग्लास सांभाळत आणि एका हात टेबलावर ठेवून स्वत:ला सावरत शाहिद अस्पष्ट बोलला.
'बस..बस..पुरे..आधीच चढलिये तुला..' - लोकेशने समजूत घातली..
'@#%&, टाक रे..' .. शाहिदचा स्वर आता थोडा भिजून हलका झाला होता..
'अरे पण झाल तरी काय?..कोणी काही बोललं का? ती काही बोलली का ?... आपण काहीतरी मार्ग काढूच की..सांग तरी... ' - लोकेश

माझा स्वप्नवत भारतदौरा

Submitted by विस्मया on 12 August, 2012 - 21:58

भारतात यायचं खूप दिवस चाललं होतं. एकदाचं ते स्वप्न पूर्ण झालं. मी भारतात पोहोचले ते पावसाळ्याचे दिवस होते. पहाटे एक वाजता विमान सहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं. इतक्या पहाटे उतरल्यावर काय करायचं हा प्रश्न होताच. पण विमानतळावरची अद्ययावत व्यवस्था पाहून थक्क झाले. जगातले सर्व पर्यटक भारतातच का येतात हे विमानतळावरच समजतं. विमानापासून असलेले सरकते पट्टे (प्रवाशांसाठी ) आणि सामानासाठी वेगवेगळे असले तरी ग्रीन चॅनेलच्या तोंडाशी आल्यावर आपलंच सामान आपल्याकडेच येत असताना दिसतं. ही व्यवस्था जगात कुठेच पाहिलेली नसल्याने अनेक परदेशी पर्यटक देखील आश्चर्य व्यक्त करताना दिसले.

पुनर्जन्मावर शोधकार्य करणारे स्व. डॉ. आयन स्टिव्हन्सन

Submitted by शशिकांत ओक on 3 August, 2012 - 02:53

पुनर्जन्मावर शोधकार्य करणारे स्व. डॉ. आयन स्टिव्हन्सन

डॉ. आयन स्टिव्हन्सन
स्व. डॉ. स्टीव्हन्सन यांचे पुनर्जन्मावरील संशोधन ग्रंथ फार मोठे आणि सहज उपबलब्ध होण्यासारखे नाहीत. उपलब्ध झाले तरी ते वाचण्याची तसदी सहसा कोणी घेत नाही. हे माहित असल्यामुळे बुद्धिवादी लोक या प्रकरणांविषयी व सिद्धांताविषयी धडधडीत खोटे लिहिण्याचे धाडस करीत असतात. म्हणूनच हे ग्रंथ मुळात वाचण्याची शिफारस केला आहे. त्यामुळे हे लोक खोटे लिहायला किती निर्ढावलेले आहेत याची कल्पना येईल.

Pages

Subscribe to RSS - मुक्तस्रोत(Open Source)