Adm यांचे रंगीबेरंगी पान

मायबोलीवरच्या नेहमी केल्या जाणार्‍या पाककृती

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

हा बाफ तसा उगीच! परवा एकांशी बोलताना लक्षात आलं आपण माबोवरच्या काही पाकृ बरेचदा करतो. इतकच काय फक्त माबो रेसिप्या वापरून एखादा पार्टीचा मेन्यूही ठरवता येईल. आठवायला बसल्यावर बरेचदा केल्या जाणार्‍या / केल्या गेलेल्या खालच्या रेसिप्या आठवल्या. आठवल्या आहेतच म्हणून इथे लिहून ठेवतो आहे. कोणी पाहिल्या नसतील तर बघता येतील.

विषय: 
प्रकार: 

मॅनहंट

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर वरच्या हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली आणि त्यानंतर अल्पावधीतच अमेरिकेने दहशतवादाविरोधी कारवाया सुरु केल्या. नंतर हाती आलेल्या माहितीनुसार 'अल-कायदा' ही संघटना आणि तिचा प्रमुख ओसामा बीन लादेन ह्यांचा ह्या हल्ल्यामागे हात होता आणि त्यामुळे ते अमेरिकेचे प्रमुख शत्रू बनले. बीन लादेनला मारण्यासाठी अमेरिकेने जंग जंग पछाडलं आणि अखेर २ मे २०११ रोजी अमेरिकन नेव्ही सिल्सच्या पथकाने केलेल्या कारवाईत लादेन ठार झाला. 'मॅनहंट - ९/११ ते अ‍ॅबटाबाद' ह्या पिटर बर्गन लिखित आणि रवी आमले अनुवादित पुस्तकात ह्या १० वर्षांच्या शोधकथेचा थरार आपल्या सामोर उलगडतो.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

कलरफुल कोलोरॅडो

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

"कोलोरॅडो म्हणजे स्वर्ग.. कोलोरॅडो म्हणजे बर्फाळ सौंदर्याची परमावधी.. कोलोरॅडो म्हणजे स्किईंग.. कोलोरॅडो म्हणजे हिमवादळं.. आणि कोलोरॅडो म्हणजे निव्वळ शांतता !"

विषय: 
शब्दखुणा: 

कैलास मानससरोवर यात्रा !

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

मागे नववीच्या सुट्टीत आईची एक मैत्रिण कैलास मानससरोवरच्या यात्रेला जाऊन आली आणि तिने तिच्या प्रवासवर्णनाची हस्तलिखित प्रत वाचायला पाठवली होती. तेव्हा कैलास मानससरोवराबद्दल पहिल्यांदा ऐकलं. लगेच मी दहावीच्या सुट्टीत जाऊ ? असं घरी विचारलं. पण एकंदरीत बर्‍याच अटींमध्ये ते बसणारं नव्हतं. नंतर शिक्षण, नोकरी, लग्न वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये ते मागेच पडलं. मग दिड वर्षांपूर्वी अनयाची मायबोलीवरची कैलास मानस यात्रेबद्दलची सुंदर लेखमाला वाचली आणि भारतात परतल्यावर लगेच इथे जायचच हे ठरवून टाकलं.

विषय: 
प्रकार: 

हॅपी हॉलिडेज.. !

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

अटलांटामधल्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये डिसेंबर महिन्यात नाताळ आणि नववर्षानिमित्त दिव्यांची रोषणाई केली जाते. संध्याकाळी सूर्यास्त होता होता म्हणजे साधारण पाच वाजता बाग उघडते आणि १० वाजेपर्यंत उघडी असते. तसही थंडीमध्ये बर्‍याच झाडांची पानं गळून गेलेली असतात, फुलं, पानं बघायला येणार्‍या पर्यटकांचा ओघ आटलेला असतो. ह्या रोषणाईच्या निमित्ताने लक्ष दिव्यांनी उजळून निघालेली पुन्हा एकदा पर्यटकांनी फुलून जाते. गेले दोन वर्ष ही रोषणाई बघायला जाणं राहून जात होतं, पण यंदा मात्र योग आला. तिथे काढलेल्या ह्या प्रकाशचित्रांसह तुम्हां सर्वांना आणि तुमच्या परिवाराला नाताळ तसेच नववर्षाच्या लखलखत्या शुभेच्छा !!

विषय: 

पश्चिमेतला स्वर्ग

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

अमेरीकेत आल्यापासून प्रत्येक लाँग विकेंडला भटकंती सुरुच असते. सेंट लुईस तसच अटलांटा ह्या दोन्ही ठिकाणांपासून एखाद-दोन दिवसांत बघता येतील अशी ठिकाणं पहाणं साध्या विकेंडना चालू असतं आणि लाँग विकेंडना मोठ्या ट्रिप. बरेच मित्र-मैत्रिणी अमेरीकेतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलेले असल्याने त्यांच्या भागातल्या नविन नविन ठिकांणाबद्दल कळत असतं आणि मग तिथे जायचे प्लॅन्स ठरतात. अमेरीकेत यायच्या आधी नायगारा आणि ग्रँड कॅनियन सोडून बाकी काही नैसर्गिक गोष्टी बघण्यासारख्या आहेत हे माहित नव्हतं. योसेमिटी आणि क्रेटर लेक ही नावं मी साधारण दिड-एक वर्षांनंतर एका मित्राचे फोटो बघताना ऐकली होती.

विषय: 

नववर्षाच्या शुभेच्छा !

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

ह्या वर्षी भारतात घेऊन जाण्यासाठी तसेच इथल्या काही मित्र-मैत्रिणींना भेट देण्यासाठी काहितरी वेगळी गोष्ट शोधत होतो. कॉस्कोत फिरताना कळलं की आपण फोटो दिले तर ते त्यांची कॅलेंडर्स, कप्स, ग्रिटींग कार्ड्स इ बनवून देतात. त्यावरून आम्ही स्वतः काढलेल्या फोटोंची कॅलेंडर्स बनवून ज्यांना द्यायची त्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, इथले तसेच भारतातले सणवार त्यावर मार्क करून ती द्यायची अशी कल्पना सुचली. नंतर फोटो निवडताना एकच थीम निवडायच्या ऐवजी त्या त्या महिन्याचे वैशिष्ट्य दाखवणारे फोटो निवडले तर ते जास्त चांगलं वाटेल असं जाणवलं.

विषय: 

कथाकथी

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मध्यंतरी ऑफिसमध्ये एकाने विचारलं, "मला चांगल्या मराठी कथा वाचायच्या आहेत. सारखा मायबोली मायबोली करत असतोस.. तर तिथल्या कुठल्या कथा वाचू ते सांग आणि लिंक पण शोधून दे.. "
तेव्हा त्याला पटकन सापडतील अश्या कथांच्या लिंक दिल्या. (त्या अर्थातच यंदाच्या दिवाळी अंकातल्या होत्या. Wink )

विषय: 
प्रकार: 

अटलांटा १३.१

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

बर्‍याच दिवसांपासून ज्यासाठी तयारी (आणि चर्चा) चालू होती ती अटलांटा १३.१ हाफ मॅरेथॉन आज पार पडली.
दोन ५ के आणि दोन १० के रेसेसमध्ये भाग घेऊन झाल्यावर पुढची पायरी म्हणून हाफ मॅरेथॉन पळायची होती.
जुलै महिन्यातच रजिस्ट्रेशन केलं होतं. अटलांटा कंपूतले राहूल जोग आणि विनायक ह्यांनीपण पळायची तयारी दाखवली. राहूल पण १३.१ रेसमध्ये तर विनायक ५ के मध्ये सहभागी झाला होता. शिवाय आम्हांला चिअर करायला कंपूतले बाकीचे लोक, प्रमुख पाहूणी म्हणून नानबा आणि माझा मित्र रोहित हे पण उपस्थित होते.

विषय: 
प्रकार: 

"ओपन" अगासी.....

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

आंद्रे अगासी आणि स्टेफी ग्राफ हे माझे सर्वात नावडते टेनीसपटू. त्यामुळे आंद्रे अगासीचं "ओपन" हे आत्मचरित्र जेव्हा प्रसिध्द झालं तेव्हा ते वाचायची प्रचंड उत्सुकता वगैरे मला अजिबात नव्हती. आधीच अगासीचं पुस्तक, त्यात स्टेफी ग्राफ बद्दलही बरच काही येणार तेव्हा नकोच ते असा विचार करून मी एकदा जवळजवळ विकत घेतलेलं पुस्तक परत ठेऊन दिलं होतं. पण माझ्यातला टेनीस फॅन मला स्वस्थ बसू देईना. वेळ झाल्याझाल्या पहिल्यांदा लायब्ररीच्या वेबसाईटवर नंबर लावायला गेलो तर त्या पुस्तकासाठी माझा १५९ वा नंबर होता.

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - Adm यांचे रंगीबेरंगी पान