चिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान

विवेकाला फाशी दिली होती तेव्हाची गोष्ट - श्री. नितीन चव्हाण

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

समाजातील अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात यासाठी लढा देणार्‍या, जनजागृतीचे प्रयत्न करणार्‍या डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांची पुराणमतवाद्यांनी केलेली निर्घृण हत्या आणि त्यानंतरचा धार्मिक उन्माद यांनी पुरोगाम्यांनाच नव्हे, तर सर्वच शांतताप्रेमी नागरिकांना अस्वस्थ केलं.

विषय: 
प्रकार: 

गंधर्वाचं देणं - श्रीमती कलापिनी कोमकली

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

लखनऊतले दिवस - श्रीमती श्रुति सडोलीकर-काटकर

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

विख्यात गायिका श्रीमती श्रुति सडोलीकर-काटकर फेब्रुवारी, २००९ ते सप्टेंबर, २०१५ या साधारण सहा वर्षांच्या काळात लखनऊ इथल्या भातखंडे संगीत संस्थानच्या विश्वविद्यालयात कुलपती म्हणून कार्यरत होत्या. संगीतविश्वात भातखंडे संस्थानाचं महत्त्व फार मोठं आहे. या विश्वविद्यालयातल्या व्यवस्थापनात अन् एकूणच संगीताच्या अभ्यासक्रमात त्यांनी अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केलं. भल्या-बुर्‍या अनुभवाला कणखरपणे सामोरं जात कुलपती म्हणून यशस्वी कारकीर्द पूर्ण केली...

***
प्रकार: 

पडूद्या की प्रश्न! - श्री. केतन दंडारे

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

नॉर्थवेस्टर्न विद्यापीठात शिकत असतानाची गोष्ट. त्या सुमारास इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी असे मत व्यक्त केले होते की, दुसर्‍या महायुद्धात ज्यूंचे शिरकाण झालेच नाही, ज्यूंचे हत्याकांड हा केवळ एक बनाव आहे. या विधानाचा अर्थात सार्वत्रिक निषेध झाला. पण विद्यापीठातील आर्थर बट्झ नामक एका सहयोगी प्राध्यापकाने मात्र त्यांच्या खाजगी वेबपेजवर या विधानाचे समर्थन केले. असे करण्याची या बट्झमहाशयांची पहिलीच वेळ नव्हती. त्यांनी आधीसुद्धा अश्याच स्वरुपाची विधाने केली आहेत. थोडक्यात, त्यांची ही मते सर्वज्ञात आहेत. हे प्रकरण जेव्हा पेटले तेव्हा मला वाटले की आता ह्यांना डच्चू मिळणार. तर तसे काहीच झाले नाही.

प्रकार: 

'लौकिक आणि अलौकिक' - डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या साहित्याच्या अभिवाचनाचा कार्यक्रम

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

​लोकसाहित्य व संस्कृती, संतसाहित्य आणि दैवतविज्ञान अशा विषयांमध्ये संशोधन करणारे व्यासंगी अभ्यासक व साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मूलगामी संशोधनाचा आणि लालित्यपूर्ण लेखनाचा आनंद घेण्याच्या हेतूने त्यांच्या जन्मदिनी, गुरुवार, दि. २१ जुलै रोजी अरभाट फिल्म्स्‌ आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे, यांनी ’लौकिक ​आणि​ अलौकिक’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

प्रकार: 

'अस्तु' - गाणी आणि ट्रेलर

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

'अस्तु' हा नितांतसुंदर चित्रपट गेली दोन वर्षं निधिअभावी महाराष्ट्रात पुण्याशिवाय इतरत्र प्रदर्शित होऊ शकला नव्हता. पण क्राऊड-फंडिंग'च्या माध्यमातून निधी गोळा करून हा चित्रपट आता उद्या, म्हणजे १५ जुलैला, महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होतो आहे.

Astu-poster.jpg
विषय: 
प्रकार: 

’कळते न कळे कसे’ - डॉ. अरुणा ढेरे यांचं अभिवाचन

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

परब्रह्माचा साक्षात्कार व्हावा म्हणून साधक साधना करतात खरी; पण त्या ब्रह्माला हवं असतं ते साधकाचंच समर्पण. संपूर्ण समर्पण. तुमचाच प्राण, तुमचीच आहुती त्याला हवी असते. मी माझ्या ज्ञानब्रह्मापुढे अशा आहुतीच्या तयारीनं उभा राहिलो आहे. - डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे

***
प्रकार: 

अकोल्यातले दिवस - श्री. आनंद मोडक

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

शाळेत तिसरीचौथीत असताना एका कुठल्याश्या बुधवारी का गुरुवारी रात्री जेवण झाल्यावर गादीवर मी लोळत पडलेलो असताना आईनं टीव्ही लावला. म्हणाली, ’आता सुरू होणार आहे तो कार्यक्रम नीट ऐक. पु. ल. देशपांड्यांचा कार्यक्रम आहे. आपल्या घरी त्यांची पुस्तकं आहेत. तुला कार्यक्रम आवडला तर लायब्ररीतून तुला त्यांची अजून पुस्तकं आणून देईन.’ कार्यक्रमाचं नाव होतं ’निवडक पु.ल.’. कार्यक्रम सुरू झाला आणि संपला. आई, आजी खदखदून हसत होत्या. टीव्हीतले पुलंसमोरचे प्रेक्षकही खोखो हसत होते. मला फारसं काही कळलं नाही. पण तरीही पुढच्या आठवड्यात आईनं सांगण्याआधी मी टीव्ही सुरू केला.

प्रकार: 
शब्दखुणा: 

'आई, मी गे आहे' - श्री. अभिजीत देशपांडे

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

यावर्षीच्या जानेवारी महिन्याच्या 'माहेर' मासिकात श्री. अभिजीत देशपांडे यांनी लिहिलेला हा लेख -

विषय: 
प्रकार: 

'शूट अ शॉर्ट' - न्यू जर्सी येथे श्री. उमेश विनायक कुलकर्णी यांची लघुपटनिर्मितीची कार्यशाळा

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

’वळू’, ’देऊळ’, ’विहीर’, ’हायवे’ अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कार-प्राप्त दिग्दर्शक श्री. उमेश विनायक कुलकर्णी हे गेली पाच वर्षं पुण्यात आणि मुंबईत ’शूट अ शॉर्ट’ ही लघुपटाची कार्यशाळा आयोजित करत आले आहेत.

ही कार्यशाळा यंदा प्रथमच न्यू जर्सी इथे २१ आणि २२ मे, २०१६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - चिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान