'शूट अ शॉर्ट' - न्यू जर्सी येथे श्री. उमेश विनायक कुलकर्णी यांची लघुपटनिर्मितीची कार्यशाळा

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

’वळू’, ’देऊळ’, ’विहीर’, ’हायवे’ अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कार-प्राप्त दिग्दर्शक श्री. उमेश विनायक कुलकर्णी हे गेली पाच वर्षं पुण्यात आणि मुंबईत ’शूट अ शॉर्ट’ ही लघुपटाची कार्यशाळा आयोजित करत आले आहेत.

ही कार्यशाळा यंदा प्रथमच न्यू जर्सी इथे २१ आणि २२ मे, २०१६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

लघुपट / लघुचित्रपट हे गोष्ट सांगण्याचं एक अनोखं, अद्भुत माध्यम आहे. मात्र दरवर्षी तयार होणार्‍या दर्जेदार लघुपटांची संख्या फारशी नाही. आजच्या तरुण दिग्दर्शकांच्या हाती उत्तम तंत्रज्ञान आणि इतर आधुनिक सुखसोयी असतानाही लघुपटांचं माध्यम फारसं बहरलेलं नाही.

’गिरणी’, ’थ्री ऑफ अस’, ’विलय’, गारूड’ अशा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या लघुपटांचं दिग्दर्शन करणार्‍या श्री. उमेश विनायक कुलकर्णी यांनी म्हणूनच ’शूट अ शॉर्ट’ या कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. चित्रपट आणि लघुपट यांची हाताळणी, व्याकरण वेगळं असतं. त्यामुळे लघुपट या माध्यमाच्या भाषेची योग्य जाण तरुण दिग्दर्शकांना मिळाल्यास उत्तम लघुपटांची निर्मिती ते करू शकतील, असा श्री. कुलकर्णी यांना विश्वास आहे.

फिल्ममेकिंगचे सिद्धांत, लघुपट-निर्मितीची मूलभूत तत्त्वं, कल्पनांचं पटकथेत रूपांतर करणं, निर्मितिप्रक्रिया, नवख्या आणि जाणत्या कलाकारांबरोबर काम करण्याच्या पद्धती, तंत्रज्ञांबरोबर एक टीम म्हणून काम कसं करावं इत्यादी बाबींबद्दल या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येईल.

अठरा वर्षांवरील व्यक्ती या कार्यशाळेत भाग घेऊ शकतात.

या कार्यशाळेत समभागी होण्यास उत्सुक असणार्‍यांनी कृपया shootashortworkshop@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.

दिनांक - २१ व २२ मे, २०१६
वेळ - सकाळी १० ते संध्याकाळी ५

स्थळ -

1002 Penny Ln
Scotch Plains, NJ 07076
USA

Contact - 732-735-0939
Paypal - rpofale@gmail.com

शुल्क - $१५०

MODULE OF THE WORKSHOP

Session 1

· Introduction to Short Filmmaking
· Introduction to process of Filmmaking: Pre Production – Production – Post Production
· Introduction to elements of film making- space & time
· Possibilities of the Medium

Session 2

· Idea to Narrative Structure of a Short Film
· Screenplay Writing

Session 3

· Elaborate session on elements of Filmmaking: Space & Time
· Elaborate session on process of Filmmaking: Pre Production – Production – Post Production
· Casting, Scheduling, Costume Design & Art Direction

DAY 2

Session 4
· Image Making

Session 5
· Sound Design
· Editing

Session 6
· Interaction with Participants
· Short film scenario in film festivals
· Funding for short films.
· Short Films Screening & Discussion

***

कार्यशाळेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास कृपया shootashort@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.

***
प्रकार: