नातं बाप्पाशी

Submitted by मनवेली on 9 August, 2018 - 10:18

आपलं बाप्पाशी असलेलं नातं वयाबरोबर बदलत जातं नाही? आपली समज वाढते तसा कदाचित अधिक समजत जातो बाप्पा आणि दिसायला लागतो त्याच्या वेगवेगळ्या रुपात. लहान्पणी तो बुद्धी देणारा बाप्पा असतो, मग मागण्या पुरवणारा देव होतो, ज्याच्याशी वाद घालता येतो असा मित्र होतो, प्रश्नांची उत्तरे असणारा सखा होतो, आपला आधार होतो, दाता होतो, त्राता होतो.

आपण त्याच्याशी भांडतो, कधी त्याच्या अस्तित्वावर संशय घेतो, कधी त्याचं असणं नाकरतो, कधी त्याला वेगळ्याच कोणाच्या रुपात पाहतो, कधी स्वतःच्या चुका त्याच्यावर लादतो, कधी त्यचं श्रेय स्वतःकडे घेतो. कधी समाजातल्या दु:खासाठी, अन्यायासठी त्याला जबाबदार धरतो, तर कधी मिळालेल्या सुखांसाठी त्याचे मनःपूर्वक आभार मानतो.

जे मिळालंय त्यात आनंद मानण्याचं सोडून, जे मिळालं नाही त्यावर रडतो, तेंव्हा बाप्पाचा अनादर करतो आपण. स्वतःचं माणूसपण विसरतो तेंव्हा अपमान करतो त्याचा. स्वतःच्या असफलतेची गार्हाणी त्याच्यापाशी मांडत असताना, स्वतःच्या त्यानेच दिलेल्या सामर्थ्याकडे कानाडोळा करतो, तेव्हा अपेक्षाभंग करतो त्याचा, तर कधी स्वतःमधल्या 'त्याला' ओलखून चकित करतो त्याला.

"मला चांगली बुद्धी दे" ची फेज संपली की हक्कने मागण्यातली निरगसता संपते आणि सुरु होतो व्यवहार. मग हा देव्बाप्पा कधी नवसांच्या ओझ्याखाली दबलेला, देवेळे-देव्हरे ह्यांच्या पिंजरयामधे कोंडलेला भासतो. धूप-उद्बत्तीच्या वासामधे दडलेल्या अवाजवी अपेक्षांच्या दर्पाने गुद्मरलेला, दुधातुपाच्या लिंपणामधे लपलेल्या स्वर्थी मागण्यांमुळे घुसमटलेला, थोडा हरलेला, काहीसा थकलेला भासतो.

गणपती हे भक्तांचं लाडकं दैवत. त्याचं लाघवी रूप एखाद्या नस्तिकालाही मोहवणारं असं. ह्या गणेशाचं रूप एखाद्या गोंडस बाळासरखं. त्याच्या येण्याने घरात मांगल्य, चैतन्य, उत्साह आपसुकच येतात. आणि त्याच्या जाण्याने घरात अन मनात एक रितेपण भरून राहतं. ते खाळाळतं पाणी आणि "पुढच्या वर्षी लवकर या" च्या जयघोशात विसर्जित होणारी बाप्पाची मूर्ती - हे द्रुश्य कोणाच्याही डोळ्यात पाणी आणणारं असंच.

पण विसर्जन होतं ते बाप्पाच्या मूर्तीचं, त्याच्या येण्याने प्राप्त झालेल्या अमूर्त अशा आनंदाचं नाही, त्याने देऊ केलेल्या आत्मभानाचं नाही, त्याच्याकडून मिळालेल्या आंतरिक श्क्तीचं नाही. मूर्त ते क्षणभंगुर आणि अमूर्त ते चिरंतन टिकणारं, ही केवढी मोठी गोष्ट शिकवून जातो गणपती बाप्पा, आपल्या १० दिवसांच्या वास्तव्यात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

_/\_

"मला चांगली बुद्धी दे" ची फेज संपली की हक्कने मागण्यातली निरगसता संपते आणि सुरु होतो व्यवहार. >>>> मस्त लिहिलय

"मला चांगली बुद्धी दे" ची फेज संपली की हक्कने मागण्यातली निरगसता संपते आणि सुरु होतो व्यवहार. +११११११११११११११