Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 5 March, 2014 - 04:41
हात जोडूनं | करतो वंदन | देव गजानन | आरंभी मी || १ ||
तुझ्या कृपेनं | तुझे नमन | येते घडून | शुभ कार्यी || २ ||
दु:ख सरुनी | विघ्न पळूनी | जाते होवुनी | विश्व सुखी || ३ ||
मी तो बालक | नवथर साधक | भक्ती एक | तुज मागे || ४ ||
रिद्धीसिद्धीचा | दाता जगाचा | परि मी त्याचा | नसे भुका || ५ ||
तुझ्या चरणी | मी पण वाहुनी | जावी संपूनी | सर्व गती || ६ ||
हेच सांगणे | देवा मागणे | ठाव देणे | तुझ्या पदी || ७ ||
तव गुण गाणी | झिजो लेखणी | सदैव वदनी | नाव तुझे || ८ ||
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे.
छान आहे.
छान आहे
छान आहे
विक्रांत प्रभाकर, चांगली
विक्रांत प्रभाकर, चांगली आटोपशीर आहे. साधी गोष्ट सरळपणे मागितली आहे. आवडली!
आ.न.,
-गा.पै.
जोशी ,गामा जी
जोशी ,गामा जी यशस्विनी,,धन्यवाद .
वा सुरेख गणेश वंदन अमोल
वा सुरेख गणेश वंदन
अमोल केळकर
मला इथे भेटा
धन्स अमोल
धन्स अमोल
गणेश वंदन चांगलं जमलंय.
गणेश वंदन चांगलं जमलंय.
धन्यवाद उल्हासजी
धन्यवाद उल्हासजी