आधार
"मी"
अगणित शत्रू मिळून न केले
द्विगुणीत नुकसान मीच माझे
गरज पडता धावा केला देवाचा
ईप्सित साधता आठव फक्त स्वार्थाचा
असा मी माझीच झोळी फाडाया तत्पर झालो
विसर होताच तुझा, माझा "मी" मोठा झालो
मीच माझा ..... या अहंकारात गुरफटता
पुन्हा काठी बसली न आवाज करता
अकारण कारूण्य तुझे
ज्यामुळे मी भानावर आलो
तुझ्या चरणी माथा टेकता
सुखी अनन्य झालो
ये बेटीया किस घर की होती है ??
गेल्या काही दिवसांत एक पोस्ट व्हाट्स अप वर येत होती, हळदी कुंकू बद्दल. आमच्या बिल्डिंगच्या ग्रुपवरही आली होती. फक्त केवळ लग्न झालेल्या स्त्रियांनाच का हळदीकुंकू चे आमंत्रण द्यायचे या विषयावरून. मला ते पटलेही. विधवा स्त्रियांना, अनेक विभक्त स्त्रियांनाही केवळ नवरा नाही किंवा सोबत नाही म्हणून एखाद्या सामाजिक प्रथेतून वर्ज्य का करायचे असा विषय होता. आता त्यात या स्त्रीला स्वतःहून भाग घ्यायचा आहे की नाही हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आमंत्रण द्यायचेही टाळणे वगैरे प्रकार अतिशयच दुखी करत असणार अशा व्यक्तीला.
'स्वप्न' आणि 'सत्य' - भाग ६- सुट्टी
भाग ५: http://www.maayboli.com/node/61529
दोघेही टिव्ही समोर बसून मध्ये मध्ये बोलत आहेत.
ती: ए आपण सुट्टीला कुठं जायचं?
तो: कुठली सुट्टी?
ती: असं काय करतोस आता २६ जानेवारी येतोय ना?
तो: अगं मग एकच दिवस तर आहे.
ती: अरे, मधला एक दिवस रजा टाकली तर ४ दिवस मिळतात ना?
तो: हां खरंच की.
ती: मग कुठे जायचं?
तो: जायला कशाला पाहिजे? घरीच राहू की.
ती: शी किती बोअर होईल अरे? घरी काय राह्यचं?
'स्वप्न' आणि 'सत्य' - भाग ५
भाग ४: http://www.maayboli.com/node/59705
तो: परवा लाईट बिल भरलंस ना?
ती: अर्रर्रर्रर्रर्रर्र .....सॉरी विसरले.
तो: किती वेळा आठवण करून द्यायची?
ती: ए मला नाही लक्षात रहात असलं सगळं.
तो: म्हणूनच तर सांगतोय.
ती: पण मी बाकी बघतेच ना?
तो: मग हे पण करायचं. तुला आठवण राहावी म्हणून मुद्दाम तेव्हढं एकंच काम सांगितलंय. बरं, तेही ऑनलाईन भरायचं असतं. स्वतः जायलाही लागत नाही.
ती: बरं, भरते आज.
तो: काही गरज नाहीये. काल शेवटची तारीख होती. मी भरून टाकलं कालच.
नवऱ्याचा मित्र
नवऱ्याचा मित्र हा लग्नानंतर सोबत आलेल्या नातेवाईकांपैकी 'आपला' वाटणारा माणूस.
आता हा मित्र कसा असला पाहिजे, जो एकदम जवळचा आहे, ज्याने आपल्या नवऱ्याला चांगल्या- वाईट दिवसांत पाहिलेलं आहे आणि त्याला साथही दिली आहे. अगदी बालपणीचाच असे नाही पण त्याला आतून बाहेरून ओळखणारा. दर वेळी अशा मित्रांना( अगदी एका हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच असतात) भेटले की ठराविक अनुभव येतात ते दरवेळी मनात येतात पण बोलायचे राहतात.
सामाजिक उपक्रम २०१७ - स्वयंसेवक हवेत
चला डोकावूया - भाग १. 'अंध व्यक्तींच्या जीवनात!'
काही दिवसांपूर्वी लोकलट्रेनने प्रवास करीत असताना एका स्टेशनवर ५-६ अंधव्यक्ती, गाडी सुटता सुटता माझ्या डब्यात चढले. मी त्यांच्या शेजारीच ऊभा असल्याने मला त्यांचे आपापसातील बोलणे ऐकू येत होते. आपण सर्वसामान्य जेव्हा एकत्र प्रवास करतो, तेव्हा आपल्या बोलण्यात आपल्या पोराबाळांचे, ऑफिसचे, राजकारणाचे वगैरे विषय येत असतात. तर त्या अंधव्यक्तींच्या बोलण्यात कोणते विषय होते? तर कोणता डबा कुठे येतो. डब्यात चढताना पकडायचा मोठा दांडा कुठल्या डब्याचा कुठे असतो. कुठल्या स्टेशनचा प्लॅटफॉर्म फार वर आहे. कुठला फार खाली आहे. कोणता डबा पुलाच्या अगदी जवळ येतो.
इष्क मुबारक, दर्द मुबारक: भाग शेवटचा (आतापुरता तरी :) )
इष्क मुबारक, दर्द मुबारक: भाग ५
भाग ४: http://www.maayboli.com/node/61337
रितू हादरली होती, मुळापासून की काय म्हणतात ना तसं ! आयुष्यात जास्तीत जास्त एखाद्या प्रॉजेक्ट मध्ये त्रास झाला म्हणून रडली असेल किंवा चांगले मार्क मिळाले नाही म्हणून. काही वेळा आनंद सोबत नव्हता तेंव्हाही. पण हे असं काही जग उलथवून टाकणारं घडलं नव्हतं. कितीतरी वेळ ती त्या 'टेस्ट' कडे बघत होती आणि मधेच रडत होती.
आनंदही बराच घाबरला होता. मुळात हे असं काही होऊ शकतं याचा विचारच त्याने केला नव्हता. त्यामुळे त्याच्यापुढे काय करायला हवं हेही कळत नव्हतं त्याला. त्याने रितूला समजावण्याचा प्रयत्न केला.
