नमस्कार. काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात कमी वेळेत प्रचंड मोठा पाऊस पडला. लोणावळ्यामध्ये तर पूर्ण पावसाळ्याइतका पाऊस दोन दिवसांमध्ये पडला. त्यामुळे लोणावळ्यात मोठा पूर आला आणि इंद्रायणी- पवना नद्यांनी लोणावळ्यापासून पिंपरी चिंचवड- आळंदीलाही तडाखा दिला. लोणावळ्यातले माझे मित्र श्रीरंगजींच्या परिसरात आठ फूट पाणी होतं. योगेश्वर सोसायटी, भांगरवाडीतलं त्यांचं तळमजल्यावरचं घर दोन दिवस अर्ध पाण्यात होतं. महापूरामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्याशिवाय लोणावळ्यातल्या हुडको भागातल्या वस्तीला महापूराचा मोठा फटका बसला. तिथे एनडीआरएफने बोटींमधून लोकांना वाचवलं.
नमस्कार मायबोलीकर..
येत्या 2 महिन्यात पुणे ते गोवा आणि परत असा प्लॅन आहे. 8 ते 10 दिवसांचा विचार आहे. आम्ही 2 जोड्या स्वतः च्या गाडीने प्रवास करणार आहोत. खालील ठिकाणी/ जवळपास होमस्ते, हॉटेल आणि रेस्तरांत सुचवा.
पहिला मुक्काम: हरिहरेश्वर/श्रीवरधन/ बागमंडला भाग
दुसरा: बागकर हाऊस MTDC मुरुड हर्णे जवळ ठरतंय, उपलब्ध नसल्यास इतर option असावेत.
तिसरा: गणेशगुळे
चौथा: धामापूर/ मालवण तारकर्ली
पाचवा: गोव्यात कुठेही चालेल (दोन दिवसासाठी)
सहावा: कोल्हापूर
सातवा: महाबळेश्वर
मायबोली सदस्य सस्मित यांच्या सख्ख्या भावाच्या डोक्याला मार बसल्या कारणाने ऑपरेशनसाठी पैश्यांची गरज आहे. काही पैसे त्यांनी जोडले आहेत. काही जोडायला मदत हवी आहे.
छोटीशी का होईना मदत करायची ईच्छा असल्यास संकोच बाळगू नका. कारण पैश्यापेक्षाही जास्त किंमत त्या वेळेला असते. Anonymously देखील मदत करायचा पर्याय आहे. आर्थिक मदत केल्यास ईथे नोंद करू शकता. किंवा त्यांना विपू वा संपर्कातून मेल करू शकता. अधिक माहितीसाठी त्यांना किंवा मला व्हॉटसप मेसेज करू शकता. हा माझा व्हॉटसप नंबर आहे - 8425888364. अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता.
मला HDFC ERGO विरुद्ध ग्राहक पंचायतीमध्ये अपील करण्यासाठी मदत हवी आहे.
माझ्या नणंदेच्या मिस्टरांची डायलिसिसची ट्रीटमेंट चालू आहे
डायलिसिसचा खर्च आवाक्याबाहेर चालला आहे
कालपासून प्रकृती जास्त खालावल्यामुळे ते व्हेंटीलेटरवर आहेत
घरातली कमावती व्यक्ती आजारी असल्यामुळे आर्थिक स्थिती खालावली आहे
मुंबई किंवा ठाणे परिसरात अशा काही समाजसेवी संस्था आहेत का ज्या डायलिसिस रुग्णांना आर्थिक मदत करू शकतात ?
आम्ही मदत करतच आहोत आमच्या परीने पण ती मदत पुरेशी पडत नाहीये
माझ्या नात्यात एक ग्रुहस्थ - वय वर्षे ८०+ आणि त्यांचा मुलगा - वय ५० - असे दोघेच रहातात. वडिल रिटायर्ड होमिओपथी डॉ...., मुलगा - हा थोडा डोक्याने कमी (iq कमी आणि फार पूर्वी डिप्रेशनचा त्रास झाल्याने १२ वी नंतर सोडून दिलेले शिक्षण). तो घरातली कामं, बाजारहाट वगैरे करतो पण बाकी काही बाहेर काम धंदा करत नाही, कधीच केला नाही. वडील आहेत तोपर्यंत ठीके. पण त्यांच्यामागे त्या मुलाला (पुरूषाला) एकटे रहाणे, सर्व व्यवहार करणे, घर manage करणे - कठीण जाणारे. एकंदरीत पाचपोच, जगात वावरायला लागणारा सेन्स याची त्याच्या कमी आहे.
एका मोठ्या पेचात सापडले आहे. मदत करा.
मी युट्युबवर 'संदीप भट' म्हणून एका मुलाचे चॅनल पहात असते. तो वेगवेगळ्या गावांना जाऊन फार कुटुंबातल्या आजारी व्यक्तीला मदत गोळा करुन देतो. त्याच्या एका व्हिडिओत 'इटा' गावातल्या एका मुलाला दाखवले. तर त्या मुलाची हकिकत खूपच वेदनादायक होती. तो १७ वर्षाचा असताना झाडावरुन पडला व मणक्याला जबर दुखापत झाली. तेव्हा त्याच्या पाठीत प्लेट घालण्यात आली. त्याला आता ५ वर्षे झाली व तो मुलगा गेल्या पाच वर्षापासुन बिछान्याला खिळून आहे. आज तो २२ वर्षाचा आहे. पाय अगदी बारीक झालेत. आता ती प्लेट काढायची आहे पण पैशा अभावी अडलंय.