समदुःखी..........
"कोणती भाजी आणलीस ग आई?" मेघाने घरात पाऊल टाकताच अन्वी ने तिला प्रश्न विचारला.
"अनु... तिला बसू तर दे .. आत्ताच आलीय ना ऑफिसवरून. जा तू आधी तुझा अभ्यास पूर्ण कर. पळ. " शामराव तात्या म्हणजे अन्वी चे आजोबा त्यांनी अन्वीला तिच्या रूम मध्ये पळवलं अन स्वतः तिच्या मागे जात तिचा अभ्यास घेऊ लागले. रुक्मिणी माई म्हणजे अन्वीची आजी, तिने मेघाला पाणी आणून दिलं. मेघा फ्रेश झाली; चहा पिऊन थोडा वेळ बसली आणि स्वयंपाक खोलीत शिरली.
२०१२ साली दिल्लीत झालेल्या निर्भयाच्या अमानुष बलात्काराच्या घटनेनंतर देश ढवळुण निघाला.स्त्री सुरक्षे विषयक कायदे कडक केले गेले.देशात स्त्रीयांना भोगायल्या लागणार्या छेडछाड ,विनयभंग ,बलात्कार इत्यादी प्रश्नावर मंथन झाले ,चालू आहे.स्त्री सुरक्षा आपली सर्वांची प्रार्थमिकता असायला हवी या बाबतीत दुमत नाहीच.पण पुरुषांच्याही काही लैंगिकतेच्या अनुषंगाने सामाजिक समस्या असु शकतात याविषयी मात्र ब्र देखिल उच्चारला गेला नाही.प्रत्येकवेळी पुरुषच शोषणकर्ता असतो असा एकांगी विचार मांडायला गेलो तर योग्य होणार नाही.
सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. माझ्या याआधीच्या पोष्ट मधून मी माझ्या मनात दीर्घकाळ सलत राहिलेल्या छोट्या छोट्या अपमानास्पद गोष्टींना कसे हाताळायचे यावर आपल्या सर्वांना सल्ला विचारला होता. त्यावर आपण सर्वांनी जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. खरेच त्यामुळे त्या छोट्या छोट्या काटेरी गोष्टी माझ्या डोक्यातून निघून गेल्या. विशेषतः "मला यात अपमानास्पद काहीच वाटले नाही" अशा ज्या प्रतिक्रिया होत्या त्या वाचून मी गुदगुल्या केल्याप्रमाणे हसत होतो. एखादी अवघड समस्या अनपेक्षितपणे चुटकीसरशी सुटल्यावर खुश झाल्याने जे हसू येते तो प्रकार.
दोन दिवस झाले मनात एक रुखरुख लागुन राहिली आहे, कुठे बोला म्हणून सर्वांनाच सांगते.
परवा मी आणि माझा नवरा खाली पार्किंग लॉटमधे थांबलो होतो, आमच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या काकांच्या मुलाने स्विफ्ट डिझायर कार घेतली. त्याला गाडी चालवण्याचा सराव जास्त नसल्याने दोन तीन ठिकाणी कार घासली होती. तर ते त्या बद्दल सांगत होते आणि तक्रार करत होते. (वय 60 दोन्ही काकांचे)
आता मुलांना काही बोलायचे नाही, बिलकुल ऐकत नाहीत पार्क करताना काळजी घेत नाही वै. वै.
यातच त्यांचे एक शेजारी पण सुरु झाले.
आता आम्ही पण काही बोललो तर ऐकत नाहीत. मुले तर ऐकत नाहीतच पण सुना जास्तच..
परवा हॅलोवीनला मुले ट्रिक ऑर ट्रीट ला जाऊन आली. पहिल्या १० चॉकलेटनंतर त्याचा विश्वास बसत नव्हता की त्याला इतके चॉकलेट्स मिळाले आहे. त्याचे हावभाव बघून खरंच मजा वाटत होती. अजून दोनेक तासात त्याची आक्खी बकेट भरली आणि सर्व चॉकलेट्स घरी आले. दरवर्षी ते सर्व ठेवून टाकणे आणि त्याची विल्हेवाट लावणे मोठं कष्टाचं काम असतं. थोडे एका पिशवीत घालून बाहेर काढून ठेवले होते. त्यातलेच मग कधी हट्ट केला तर द्यायचे असे चालू आहे. आणि कधी कधी खूप छान वाटते जेव्हा ती पिशवी समोर असूनही काढून आणून स्वनिक आम्हाला विचारतो की 'मी हे खाऊ का?' .
गेले तेवीसएक वर्षे आमचं त्रिकोणी कुटुंब आहे. मी, सौ.आणि एकुलती एक मुलगी. घरात आमच्यापेक्षा वयस्कर असं कोणी नाही. आजपर्यंत रोजच्या जगण्यामध्ये विविध प्रकारच्या अडीअडचणींना सामोरे जावे लागूनही ईश्वरकृपेने तावून सुलाखून मी त्यातून सहीसलामत बाहेर आलोय.
थोड्या दिवसांपूर्वी एका कॉन्फरन्स साठी गेले होते. तिथे एक मॅनेजर आली होती जिने पांढरास्वेटर घातला होता काळे पोकळ गोल असलेला आणि डार्क पिंक पॅन्ट(फुशिया म्हणतात तो). एकदम भारी दिसत होतं कॉम्बिनेशन. तिकडे मोठ्या लोकांची भाषणं सुरु झाल्यावर रिकामटेकडं डोकं त्या ड्रेसवर खिळलं. हातांना काही चाळा म्हणून मी पेपरवर ते काळे गोल गोल काढत बसले आणि मनात विचार आला असा एखादं चित्र कॅनवासवर काढलं तर? पांढऱ्या शुभ्र कॅनवासवर काळे गोळे( एकदम पेनाने रेघोट्या काढल्यासारखे) आणि १/४ हिस्सा फुशिया रंगाचा. एकदा डोक्यात आल्यावर ते ट्राय करायचा विचार पक्का झालाच. दिवाळीमुळे वेळही मिळत नव्हता.
थोड्या दिवसांपूर्वी एक पोस्ट टाकली होती, पणत्या रंगवून विकण्याचा प्रयोग करणार होते म्हणून. http://www.maayboli.com/node/60405 पणत्या विकण्याचा प्रयोग करण्यामागे दिलेल्या अनेक कारणांमध्ये अजून एक कारण होतं. ते पूर्ण झाल्यावरच बोलायचं म्हणून थांबले होते. पणत्या रंगवण्यात आनंद मिळत होताच तरी त्या विकून त्याच्यातून मिळणाऱ्या पैशांची तुलना नकळत माझ्या नोकरींशीही होत होती. खरंच त्यात इतका वेळ घालवावा का हे कळत नव्हतं. त्यांची क्वालिटी चांगली असली तरीही लोक त्यासाठी जास्त पैसे द्यायला तयार होतील का हाही विचार येत होता मनात.
आजकाल 'दिवस गेले' म्हटलं की इंटरनेटवर ढिगाने माहिती मिळते. भरपूर पुस्तकेही आहेत. शिवाय मी तर शिकागो मध्ये असताना एक-दोन टीव्ही सिरीयलही बघायचे. त्यामुळे मला वाटते की आपल्या आईपेक्षा आपल्याला डिलिव्हरीच्या आधी बरीच माहिती मिळालेली असते. पण 'आई' झाल्यावर पुढे काय? यावर कुणीच कधीच मला सांगितलं नव्हतं जे मला वाटतं बोलणं गरजेचं होतं. यातील बरीचशी माहिती कुठेतरी मिळेलही पण मला मात्र त्या अनुभवातूनच जावे लागले होते. काही अनेक मैत्रिणींना पाहून लक्षात आले आहेत. कदाचित हे सर्व मुद्दे वाचून कुणी काही माझ्याबद्दल मत बनवलं तर मी काही करू शकत नाही.