मागच्या आठवड्यात भारतात पोचले. ४-५ दिवसांत बरीच सेट्ल झाले. मला तिकडून निघायला अजून एक आठवडा होता तेव्हा एका टीम-मेटने सोमवारी सकाळी एकदम आनंदाने विचारलं,"अरे तू आहेस होय अजून? मला वाटलं तू निघून गेलीस आणि मला बाय पण करता आलं नाही." तिच्या या वाक्याने मला थोडा का होईना आनंद झाला. आम्ही निघायच्या आधी अजून एक मैत्रिणी घरी येऊन गेली. मी हक्काने तिला नाश्ता करून आणायला सांगितलं आणि तिनेही मस्त उपमा, मेदू वडा बनवून आणले. निघायच्या दिवशी शेजारच्या काकूंनी आठवणीने विचारून डब्यात पराठे बांधून दिले. एक दोन मित्रांनी विचारलेही की एअरपोर्टला सोडायला येऊ का? एकाने सोडलेही.
http://www.maayboli.com/node/58714
http://www.maayboli.com/node/59360
अलार्म वाजला आणि ती धडपडत उठली. आज ओळीने चौथा दिवस तिने केलेला निश्चय पाळायचा.
तो: उठलीस?
ती: हं . (अजून झोपतच)
तो: कशाला नसते उद्योग लागतात तुला काय माहीत.
ती: हं . (अजून झोपतच)
तो: जा बरं झोप जा जरा वेळ.
ती: अं हं .
बंद डोळयांनीच तिने फ्रिजमधली भाजी काढली. एका भांड्यात पीठ घेऊन कणिक मळून घेतली.
तो: अगं काय हे? किती वेळा सांगितलंय मला रोज डबा नसला तरी चालतो.
ती: हो पण मला चालत नाही ना. (आता ती जरा जागी झाली होती. )
तो: नुसती फिल्मी आहेस बघ.
गेल्या वर्षी नोकरी शोधत असताना एक वेगळाच अनुभव आला. इंटरव्ह्यूला गेले तर तिथे ज्यांनी इंटरव्ह्यू घेतला ते मॅनेजर पाकिस्तानी होते. इंटरव्ह्यू छान झाला. अर्थात सर्व बोलणं इंग्लिश मधेच होत होतं आणि तेही अमेरिकेत त्यामुळे तसा विचार करायचं काही कारण नव्हतंच. सर्व बोलणी झाल्यावर मला त्यांनी एक प्रश्न विचारला,"तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना की आमचं ऑफशोअर चं ऑफिस पाकिस्तान मध्ये आहे?" खरंतर भारतीयांनी जगात आय टी मध्ये इतकं नाव मिळवलं आहे (चांगलं आणि वाईट दोन्हीही) की पाकिस्तान वगैरे मध्ये ऑफशोअर म्हणल्यावर मला जरा हसूच आलं. कधी असा विचारच केला नव्हता. अर्थात मला काय इथे बसूनच काम करायचं होतं.
त्याचे झाले काय, पुढच्या विकांताला आमचा शाळासमुह समुद्र बघायला जातोय. बहुतांश जणांचा समुद्र एव्हाना बघून झालाय तरीही पुन्हा बघणार आहोत. कारण फुल्ल टू धिंगाणा घालायचा प्लान आहे. या आधी आम्ही असे फार वर्षापूर्वी डोंगराच्या वेळी आणि नुकतेच हिलस्टेशनवर केले होते. यण्दा हा मान चक्क समुद्राने पटकावला आहे. पण एक गोची आहे. धिंगाणा डान्स करायला पोषक अशी जागा समुद्राजवळ नाही. म्हणून मग समुद्राला भरती आली की दंगा करायचा प्लॅन आहे. पण धिंगाणा करायला ब्रांडेड हॉटेल भाड्याने घेणे आले. किती वेळा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मायबोलीकरांना त्रास देणार. म्हणून यंदा सरळ आमच्या नंदीबैलाला विचारले.
आपण दोघे एकत्र जाऊ या का रेसला? एकत्र पळू, मजा येईल ना? करतो तसंच हेही. काय म्हणतोस?
तो मान डोलावतो.
.....
ती, "आपण दोघेही यावेळी रेसमध्ये भाग घेऊ बघ. तू यावेळी जरा जास्त प्रॅक्टिस कर. आपण आपापल्या परीने जोरात जाऊ. जो आधी पोहोचेल तो वाट पाहील दुसऱ्याची. चालेल ना?"
तो, "होय, उगाच जोरात पळणाऱ्याची कुचंबणा आणि हळू पळणाऱ्याची ओढाताण. त्यापेक्षा आपल्याला जमेल तसं पळू, शिवाय मी जवळपास राहीनच. "
ती,"हो चालेल."
........
तो मोडलेल्या पायाने, "यावेळच्या रेसमध्ये मला भाग नाही घेता येणार. काय करू चालत चालत पूर्ण करू का?"
ही गाथा नुसत्या चहाची नाही तर गावाकडच्या साध्याभोळ्या माणसांची आहे...
चहा 'ताजमहाल'मधला असो की 'टेटली टी' असो त्याची चव आमच्या गणूच्या 'अमृततुल्य'पुढे फिकीच !
नावाप्रमाणेच अमृततुल्य चवीचा हा चहा म्हणजे अनंत प्रश्नावरचा 'रामबाण' उपाय !
हा चहा पिण्यासाठी लोकांची पावले आपसूक त्याच्या टपरीकडे वळत..
त्याच्या टपरीत फराफरा आवाज करणारया गॅस स्टोव्हच्या निळ्या पिवळ्या ज्योती म्हणजे जणू तल्लीन होऊन एकसमान तालात कथ्थक करणाऱ्या निळ्या पिवळ्या वेशातील नर्तिकाच !
त्या अद्भुत स्टोव्हवरती त्याचे लख्ख पितळी भांडे मुकाटपणे दिवसभर तापत असते.
आजपण सकाळी लवकर जाग आलीच नाही. रोजची रडारड आहेच मग. त्यात स्वप्नीलची काहीही मदत नसते सकाळी. स्वत:चं आवरून जातो फक्त. बिघडवून ठेवलाय आईने, दुसरं काय? असली वळणं लहानपणीच लावायला पाहिजे होती. आमचं नशीब कुठे इतकं? त्यात हा यश, अजिबात काही आवारात नाही. सगळी ढकलगाडी आहे. आणि जरा रागावलं की ओठ काढून बसतो. कित्ती क्यूट दिसतो. अगदी सशाचं पिल्लूच. मम्मिशिवाय याचं पान हलत नाही.
अगदी लेसही मीच बांधून द्यायची याच्या शूजची. याला शाळेत सोडायचं म्हणजे जीवावर येतं. काय करणार ?
डांबऱ्या जन्मला तेव्हा केवळ मुलगा होता म्हणून जिवंत राहिला. इतका काळा होता की मुलगी असता तर केंव्हाच त्याच्या बापानं तिचा गळा दाबून कचऱ्यात फेकून आला असता. त्याचा त्वचेचा रंग, डोक्यावरच्या केसांचा रंग , तळहाताचा गुलाबी शिरा दिसणारा रंग आणि ओठांचा निम्मा लाल रंग मिश्रित काळा रंग हे सगळे म्हणजे एकाच रंगाच्या किती शेड्स असतात याचं जिवंत उदाहरण होते. शाळेत पोरांनी ठेवलेलं हे त्याचं नाव, 'डांबऱ्या'. अगदी गावात डांबरी रस्ते नसेनात का? लहान असताना लई राग यायचा त्याला. हळूहळू त्यानं ते चिडवणं स्वीकारलं, आपलं नाव आणि रूपही.
" दि. १२ जुलै १९७०
प्राणप्रिय तुम्हाला,
स.न. वि. वि.