बाब्या मी इंजिनियर आहे !
मुलांना आपली आई नेहमीच कमी हुशार वाटते बहुतेक, निदान बाबांपेक्षा. म्हणजे आई म्हणून तिच्या घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये तिच्या कुशलतेत कधीही संशय नसतो. पण तेच एखादे खेळणे फिक्स करायचे किंवा टीव्ही, लॅपटॉप, किचकट खेळणी अशा गोष्टींचा विषय येतो तेंव्हा मात्र बाबाच भारी असतो. आता अर्थात आमच्याकडे तसे होऊ देण्यात माझाही हात आहेच.
आज दुपारी एका जवळच्या मैत्रिणीसोबत बराच वेळ व्हाट्स अँप वर बोलले. मला नक्की आयुष्यात काय हवंय यावर बोलत होतो. तसं तर मला बरंच काही हवं असतं. पण त्या क्षणाला मला ठीक का वाटत नाहीये आणि मला पुढे काय केलं पाहिजे हे तिच्याशी बराच बोलून कळल्यासारखं वाटलं. असं म्हणतेय कारण त्या क्षणाला ते प्रश्न सुटत नसतात, पण तेव्हा ते बोलण्यासाठी कुणीतरी असतं, ती व्यक्ती आपल्यासाठी वेळ देते आणि ऐकून घेते हे काय कमी आहे? सर्व बोलून झाल्यावर प्रश्न सुटला नसला तरी मनावरचं मळभ दूर झालेलं असतं.
भाग ६: http://www.maayboli.com/node/61530
दोघेही एका हॉटेलमध्ये समोरासमोर बसलेले.
ती: मघाशी त्या दोघांना पाहिलंस?
तो(घास खाता खाता): कोण?
ती: तेच रे टेबलच्या एका बाजूला बसले होते?
तो: ओह.. मला नाही आवडत हे असलं.
ती: आता त्यात काय?
तो: समोरासमोर बसायचं, हे काय एका बाजूला बसायचं?
ती: मग प्रेमात असतं.
तो: आपण नव्हतो का कधी प्रेमात?
ती: असं काय अरे? किती क्यूट दिसत होते दोघं.
तो: क्यूट?
ती: मग काय? आपण पण होतो की असेच.
सकाळी जाग आली तसे निशाने पलीकडे घड्याळाकडे पाहिले. अलार्म चुकलाच होता. नवरा आणि बाळ दोघेही गाढ झोपलेले होते. ती हळूच उठून बाथरूममध्ये गेली आणि बाहेर आली तर झोपलेल्या विनयच्या बाजूला विहान इकडे तिकडे गंमत पहात लोळत पडला होता. तिला पाहिल्यावर तो आपलं बोळकं दाखवून हसला. त्याच्या मोठाल्या डोळ्यांत चमक आली. त्याच्या केवळ हसण्यानेही दिवस छान वाटतो हे तिला पुन्हा एकदा जाणवलं.
मागच्या वर्षी भारतात जाताना एक काळजी होती,'मावशी' झाल्याची. आता यात काळजी करण्यासारखं काय ते पुढे कळेलच. पण मावशी म्हटलं की मला आमची मावशी आठवते. आई आणि मावशी या पाच भावानंतरच्या दोन मुली, त्यामुळे त्यांच्यात बरीच जवळीक होती आणि आजही आहे. दोघीही बहिणी,'आपल्याला आईने जावई कसे अगदी सारखे शोधून दिले आहेत' म्हणत अजूनही नवऱ्यांच्या गोष्टी एकमेकींना सांगत बसतात. आई धाकटी, त्यामुळे मावशींमध्ये असलेला समंजसपणा तो आम्हालाही कायम दिसत राहिला , अजूनही दिसतो.
पुढचे अनेक दिवस असेच सरले. कुणीच कुणाचा रुसवा काढायला आलं नाही की गेलं नाही. मुक्ताने एक दोनदा मेसेज केले होते केदार आणि नितिनलाही पण त्याच्यावर कुणाचंच उत्तर आलं नव्हतं. ज्याला त्याला विचार करायला वेळ दिला पाहिजे आणि आपणही घेतला पाहिजे हे मुक्ताला कळत होतंच. ऑफिस तर चालूच होतं.
असेच एक दिवस जेवताना पूनमने तिला विचारलं,"काय गं किती दिवस अशी गप्प राहणार आहेस? काही सांगत पण नाहीस. "
ती बोलत असतानाच मुक्ताने आपल्या डब्यातली भाजी पूनमला वाढली. ते पाहून पूनम पुढे म्हणाली,"हे बघ मला नुसतं असं खायला घालून मी शांत होणार नाहीये. तुझं काय चाललंय ते सांगशील का?"
ती रात्र वगळता मुक्ता पुन्हा तिच्या विश्वात रमली होती. एके दिवशी सकाळ सकाळी फोन चेक करताना मुक्ताला एक मेसेज दिसला, नितीनचा. तिने उघडून पहिले तर त्यात फोटो होता वालाच्या शेंगाचा त्याच्या रोपट्यासहित. धुक्यातल्या त्या सकाळच्या फोटोमध्ये शेंगांवरचं दव खुलून दिसत होतं. त्या वाफ्यात भरभरून आलेल्या शेंगा पाहून तिला आनंद झाला. तिने हसून त्याच्या मेसेजला 'गुड मॉर्निंग' असं उत्तर पाठवलं. दिवस सरताना तिने अजून एक मेसेज त्याला केला, एक फोटो. ती आठवणीने वालाच्या शेंगा बाजारातून घेऊन आली होती. तिने त्याची वाफवून भाजी केली, कारळ्याची चटणी, बाजरीची तीळ पेरून भाकरी केली.
तुम्हाला अभिमान वाटेल, भारतातली पहिली आजीबाईंची शाळा भरतेय महाराष्ट्रातल्या एका खेड्यात...
या शाळेत नाव दाखल करायचं असेल तर तुमचं वय किमान ६० वर्षं असायला हवं बरं का... ही भारतातली पहिलीच आजीबाईंसाठीची शाळा आहे. ही शाळा पुण्यासारख्या मोठ्या शहरात नाही, तर आहे एका लहानशा खेडेगावात. या नावाचं गावही तुम्ही कधी ऐकलं नसेल. हे आहे आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातलं फांगणे नावाचं गाव. गेल्या वर्षी ८ मार्च २०१६ ला म्हणजेच जागतिक महिला दिनी या शाळेचं उद्घाटन झालंय आणि महिन्याभरात या शाळेला एक वर्ष पूर्णही होईल.