चार वर्षाची मुलगी आणि वर्षाचं बाळ मागे सोडून ती भरल्या संसारातून निघून गेली. गेली म्हणजे खरंच गेली, देवाघरी. घरावर दु:खाचं सावट पसरलं. पसरलं म्हणजे काय? कुठे जावं, काय करावं, महेशला काही सुचत नव्हतं. घरात काय चाललं आहे, मुलांचं काय हे यापेक्षा तिच्याशिवाय आपण आयुष्यं कसं काढणार हाच एक विचार डोक्यात होता त्याच्या. अशी वेळ सांगून थोडीच येते आणि कुणावर आलीच तर त्याला काय होत असेल हे त्याचं त्यांनाच माहीत. कारण अशा दु:खाची कल्पना करणं शक्यही नाही. पण काय करणार? त्याच्यावर ती वेळ आली होती. घर लोकांनी भरलं होतं. जो तो जमेल तशी मदत करत होता. नातेवाईक जमले होते.
दिनांक : ३१/०३/२०१६
वेळ : रात्री ८. ००
स्थळ : बोरीवली स्टेशन (२९३ चा बस stop )
काल रस्ता तसा बऱ्यापैकी सामसूम होता. वाहनांची वर्दळ खूप कमी होती. चालत जायचा कंटाळा आला होता म्हणून बसच्या लाईन मध्ये जाऊन उभे राहिले. तिकडे काही काही लोक २०-२५ मि. पेक्षा जास्त वेळाहून उभे होते ऱिक्शा पण मिळत नव्हत्या आणि बसही येत नव्हती. ज्या काही taxis उभ्या होत्या त्यातही taxi drivers आपापल्या गाडीत कालच्या भारत - वेस्ट इंडीज क्रिकेटच्या सामन्याची कॉमेंट्री ऐकत आरामात बसले होते.
आज विचार करत होते, आपल्याकडे ही सगळी मुलं अशी का वागतात? गेल्या दोन वर्षात मी पुण्यात असताना अनेक वेळा टपरीवर चहा घेतला टीममधल्या अनेक लोकांसोबत.पण एकदाही प्रत्यक्षात टपरीवर जाउन '४ चहा' असे सांगायची वेळ आली नाही. प्रत्येकवेळी एखादा मुलगा जाउन ऑर्डर देई आणि चहा घेऊन येई. बरं ही काही पहिली वेळ नव्हती हे बघायची माझी. आज पर्यंत डोसा, पोहे, चहा, वडापाव कुठलीही टपरी असो, कॉलेजपासून नोकरीपर्यंत एकदाही मला जाऊन 'चार चहा' म्हणायची वेळ आली नाहीये. कुणी सर्व मुलांना कुठले तरी नियमांचे पुस्तक देते का की ज्यात असा नियम लिहिलेला आहे की तो अलिखित नियम आहे? असो पण आजची पोस्ट त्या टपरीबद्दल नाही.
अट्टाहास कशाला ना
नेहमीच चांगलं दिसण्याचा?
दहा छान फोटो काढून
एकच फेसबुकवर टाकण्याचा?
दिसायचं कधीतरी आहोत तसेच
आणि लोकांनाही बघू द्यायचं.
अट्टाहास कशाला ना
सर्वांच्या बरोबरीने प्रमोशनचा?
बाकीचे थांबले म्हणून
आपणही उशिरापर्यंत थांबण्याचा?
जायचं निघून वेळ झाल्यावर
आणि बोलू द्यायचं बोलणाऱ्याना.
अट्टाहास कशाला ना
घर टापटीप ठेवण्याचा?
कोणी येईल म्हणून
दर थोड्या वेळाने केर काढण्याचा?
बसू द्यायचं येणाऱ्याना पसाऱ्यात
आणि रमून जायचं फक्त गप्पात.
अट्टाहास कशाला ना
नेहमीच हसत राहण्याचा?
कितीही आतून तुटले
तरी ताठ उभे राहायचा?
माझ्या या पोस्टवरचे कमेन्ट वाचून सुचलेली ही कविता. http://www.maayboli.com/node/57353
कुणाला शेअर करायची असल्यास जरूर शेअर करा. फक्त माझे नाव आणि त्याच्या खाली दिलेली लिन्क टाकून करा. धन्यवाद.
प्रत्येकाच्या मनात एक झाड असतं,
कणाकणात रुजलेलं, लहानपणी खेळलेलं,
आपल्यासोबत वाढलेलं
तर कधी स्वत:च्या हाताने वाढवलेलं.
कधी असतं बोरं चिंचानी लगडलेलं,
मित्रांसोबत चोरून तोडताना माळ्यानं पकडलेलं.
कैरीच्या रुपात कुणाची चाहूल देणारं,
कधी पानांनी नवीन घराचं तोरण बांधलेलं.
कधी असतं शाळेतलं पिंपळाचं,
मानगुटीवर भुतासारखं भीती बनून राहिलेलं.
तर कधी वडाचं, पारंब्याना लटकलेलं,
अकोल्यात आमच्या शेजारी एक आजी आजोबा रहायचे. आजोबा चार वर्षापुर्वी गेलेत. ते ९५ वर्षाचे होते. आता आजी ९३ वर्षाची झाली आहे. दोन वर्षांपासून त्या पुण्यात वृद्धाश्रमात राहतात. त्यांना मुलबाळ नाही आहे. आजी आणि आजोबा दोघेही संस्कृत भाषेचे प्राध्यापक होते. असे शेजारी आणि तेही आजीआजोबा आपल्याला मिळालेत ह्याचे मला फार अप्रुप वाटते. आजीला कुठल्याच नातेवाईकांकडे राहयचे नाही. सासरच्या लोकांना आजी नको आहे. आजी मला नेहमी विनंती करतात की चांगले वृद्धाश्रम बघ. मला पुण्यात इतके दिवस शोध घ्यायला मिळत नाही. महिना १० हजार इतपत त्या देऊ शकतात.
गेल्या आठवड्यात माझ्या नातवाचं बोर - न्हाण केलं. जरा वेगळ्या पद्धतीनी.
आपल्या बाळांचे आपण निरनिराळे कार्यक्रम करतो त्यांबद्दल थोडंसं. त्यांना उत्सवमूर्ती म्हणायचं खरं, पण त्यांना त्यात अजिबात रस नसतो. कौतुक आपल्यालाच असतं आणि असावं देखील. आपण आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या उपस्थितीत ते साजरे करतो कारण आपल्याला आपला आनंद त्यांच्याबरोबर वाटण्याची इच्छा असते आणि ती सफलही होते. मात्र पाहुण्यांच्या दृष्टीनी हा अनुभव काही एकमेवाद्वितीय (unique) नसतो.
शुभेच्छा नव-वर्षाच्या
करा निर्धार नव-वर्षाचा
यशप्राप्तीसाठी झटण्याचा
सुख-शांती-यश देखील
खुशी-खुशीने वाटण्याचा
मिळत राहील यश सदैव
तुमच्या सार्या प्रयत्नांना
जीवनी तुमच्या तत्परतेने
डिस्चार्ज मिळो यातनांना
झाला प्रफूल्लित मन:पुर्वक
हा घ्या शब्दफूलांचा गुच्छा
देतो आपणास स्नेहबंधाच्या
नव वर्षाच्या नव शुभेच्छा
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
डिजीटल युगात
त्रासते आहे आज देखील
खेड्यांत दारिद्र्याची दाटी
मात्र सरकारच्या कृपेमुळे
शहरांची होईल स्मार्ट सिटी
शहरांची स्मार्ट सिटी करताना
खेड्यांना लक्षात घेतील का,.?
बदलत्या डिजीटल युगामध्ये
खेड्यांना स्थान देतील का,..?
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
व्हॉट्सअॅपवर सायकल समुह करण्याचे योजले आहे.
या समुहामुळे,
- सायकलप्रेमी एकत्र आणणे,
- सायकल संदर्भात एकमेकांना मदत करणे
- दुरुस्तीबद्दल मदत करणे
- आणि प्रोत्साहन देणे
असे सर्वसाधारण प्राथमिक उद्देश आहे.
तसेच सायकल विषयक स्पर्धा किंवा भेटी वगैरेही यात अंतर्भूत असू शकेल.
तुमच्या सुचवण्यांचे स्वागत आहे.
समुहात सामील होण्यासाठी आपले मोबाईल क्रमांक कृपया विपुमध्ये पाठवावेत.
हे क्रमांक नोंदवल्यानंतर डिलिट केले जातील.
हा समुह फक्त सायकल या विषयासाठीच मर्यादित असेल याची नोंद घ्यावी.