रिक्षा तुळशीबागेजवळ थांबली आणि प्रज्ञाचा चेहरा लहान मुलांसारखा खुलला. दोघीही मग तिच्या खरेदीत गुंतल्या. सकाळची वेळ असल्याने गर्दी जास्त नव्हतीच. तिच्या क्लिप, साडीपीन, मुलीला केसांचे बेल्ट, रंगीत बेल्ट, आवडतील त्या सर्व प्रकारच्या चप्पल-सॅन्डल घेऊन झाल्या. गार्गी तिला एकेक गोष्ट आठवण करुन देत होती.
"ए तुला आठवतंय तू अशीच मला सोडून अजयबरोबर आली होतीस एकदा? हे असले झुमके घेतले होते दोघींसाठी?", प्रज्ञाने विचारलं.
"हो तुला किती राग आला होता. घेतलेच नाहीस ते. चल, घे आता एक. मी पैसे देते. ", गार्गी हसून म्हणाली.
.

.
मी ईथे कोण आहे ?
कुठे आलोय मी ...
ह्या अनोळखी जगात !
अज्ञात मी अजुन स्वत:लाच
.... का आलो तरीही !
प्रश्न ..
निव्वळ प्रश्न ..
निरुत्तरित प्रश्न !
ह्या प्रश्नांना उत्तर मिळणे
खरंच गरजेचे आहे का ? ...
माझ्या विशिष्ट शरीराची
मलाच भीती वाटू लागली आहे;
इतक्या वर्षानंतर प्रथमच जाणीव होतेय
माझ्या अस्तित्वाची अन्
काहीच नसल्याचीही !
मागच्या भागात ( https://www.maayboli.com/node/65119 ) मी पाठदुखीबद्दल थोडी माहिती दिली होती. पुढे जाऊन मला गेल्या तीन महिन्यांत जाणवलेल्या काही गोष्टी, काही अनुभव लिहायचे होते. ते असे.
मी आणि माझी पत्नी आम्ही एकत्र राहील्यास भाण्डणे होतात म्हणून वेगळे राहातो. आमच्या मुलाचे सन्गोपन चान्गले व्हावे यासाठी आम्ही काय करावे? या परीस्थीतीतून गेलेल्या लोकान्चे किन्वा समपदेशकान्चे अनुभव काय आहेत ?
२०१० मध्ये ही पोस्ट लिहिली होती महिला दिनाच्या आसपास. एक स्त्री म्हणून अनेक ठिकाणी झगडावं लागलं होतं, त्यातली ही एक. आज पुन्हा एकदा आठवण झाली मोहनाची कथा वाचून म्हणून पोस्ट करत आहे.
हा वीकेंड मध्ये अमेरिकेतील खरेदीचा मोठा इव्हेन्ट म्हणजे 'ब्लॅक फ्रायडे' होता. तो खरंतर इथल्या 'थँक्स गिव्हिंग' या सणाच्या (गुरुवारच्या) दुसऱ्या दिवशी असतो(अर्थातच फ्रायडे कम्स आफ्टर थर्सडे !). पण झालंय काय, इथल्या मोठं मोठ्या रीटेल दुकानांच्या सेलच्या जाहिरातींमुळे मुळात खास घरातील जवळच्या माणसांबद्दल असलेला हा सण गर्दी, पैसे आणि खरेदीसाठी असलेल्या लांबलचक रांगांमध्ये हरवून गेलाय. गुरुवारी खरंतर अनेक लोक आपल्या घरी/गावी परत जातात, मोठाली पंगत होते, जे कोणी आदरातिथ्य करत आहे ती व्यक्ती सर्व जेवण बनवते, वगैरे.
गुलाबी थंडीची ती रात्र. तो गाडी चालवत होता. ती बराच वेळ शेजारी बाहेर बघत बसली होती. मध्येच तिने सीडींचा बॉक्स काढला. शोधत शोधत ती 'किशोर कुमार' लिहिलेल्या सीडीवर थांबली. तिने सीडी टाकली आणि पहिलंच गाणं ..... 'मेरे मेहबूब इनायत होगी...... ' लागलं.
'वाह ....!' ती उद्गारली. तिच्या 'वाह' वरच त्याला कळलं ती आता नॉर्मल होत आहे.
एकेक गाणं येऊ लागलं तशी ती त्या गाण्यांसोबत आपल्या भसाड्या आवाजात गाऊ लागली. तो हळूच हसलाही. तिने ते पाहिलं होतं. पण समोरच्या गाण्याचे बोल सोडून त्याच्याशी बोलायला ब्रेक घ्यायची तिची इच्छा नव्हती.
संध्याकाळची वेळ, गर्दी, ट्रॅफिक, वाहनांचा आवाज आणि प्रदूषण यांनी कंटाळलेला तो, एक सिग्नल ग्रीन होईपर्यंत थांबला होता. आख्खा एक मिनिट थांबावं लागणार म्हणून तो चांगलाच वैतागला होता. इकडे-तिकडे पाहत वेळ घालवत असतानाच त्याला डाव्या बाजूला एका रिक्षात बसलेली व्यक्ती दिसली. ती त्याच्याकडेच पाहत होती. ती हसली आणि तो आश्चर्याने उडालाच. सायलीच होती तर ती.
जरा गाल वर आलेले पण तेच तोंडभरून हसू आणि ओसंडून वाहणारा उत्साह. आणि हो तिच्याबरोबर एक बाळ पण होतं छोटासा.