आधार
'आई' झाल्यावर......पुढे काय?
आजकाल 'दिवस गेले' म्हटलं की इंटरनेटवर ढिगाने माहिती मिळते. भरपूर पुस्तकेही आहेत. शिवाय मी तर शिकागो मध्ये असताना एक-दोन टीव्ही सिरीयलही बघायचे. त्यामुळे मला वाटते की आपल्या आईपेक्षा आपल्याला डिलिव्हरीच्या आधी बरीच माहिती मिळालेली असते. पण 'आई' झाल्यावर पुढे काय? यावर कुणीच कधीच मला सांगितलं नव्हतं जे मला वाटतं बोलणं गरजेचं होतं. यातील बरीचशी माहिती कुठेतरी मिळेलही पण मला मात्र त्या अनुभवातूनच जावे लागले होते. काही अनेक मैत्रिणींना पाहून लक्षात आले आहेत. कदाचित हे सर्व मुद्दे वाचून कुणी काही माझ्याबद्दल मत बनवलं तर मी काही करू शकत नाही.
Being Parents of अमुक तमुक
शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना प्रत्येकवर्षी ठरवायचे, यावर्षी एकदम सुरुवातीपासून मन लावून अभ्यास करायचा. कितीही केले तरी परीक्षेच्या वेळी होणारी धावपण व्हायचीच, विशेषतः कॉलेजमध्ये. त्याप्रमाणेच सानूची शाळा, म्हणजे ती बालवाडीत होती तेंव्हापासून दार वर्षी ठरवतो, तिच्या अभ्यासाकडे, बाकी ऍक्टिव्हिटी कडे अजून जास्त लक्ष द्यायचे, वेळ द्यायचा, तरीही एखादी पेरेंट-टीचर मिटिंग चुकलीच आहे, अनेक नोटिसा अगदी शेवटच्या दिवशी सह्या करून दिल्यात किंवा एखाद्या प्रोजेक्ट्च्या वेळी द्यायचे सामान राहून गेले आहे.
परगावी राहणाऱ्या प्रियजनांची काळजी
मायबोलीच्या जुन्या धाग्यांचे उत्खनन करताना मधुरिमा यांचा हा धागा सापडला
आई वडिलांची काळजी http://www.maayboli.com/node/2577?page=1
योगयोगाने मी सुद्धा नोकरी साठी आई वडिलांपासून दूर राहतो आहे, माझ्या एकदोन कलीग्स न आलेले अनुभव, अडचणी यांनी एकटे असणारे सिनिअर सिटीझन्स हे समस्या प्रकर्षाने समोर आली.
एकटे आणणाऱ्या सिनिअर सिटीझन्स (सध्या तरी फक्त पुणे शहर) साठी एक service चालू करण्याचा विचार मनात मूळ धरतो आहे.
१) व.ना चा एक वर्ग आहे जो उठून अथश्री सारख्या सोसायटी मध्ये जाऊ शकतो,
बोलायला पैसे पडत नाहीत !
सायकॉलॉजिकल काउंसेलर्स
दादर माटुंगा बांद्रा माहिम या परिसरातील समुपदेशकांबद्दल माहिती हवी आहे. जवळच्या नात्यातील एका व्यक्तीला डिप्रेशन सिंड्रोम्स दिसत आहेत. कृपया कोणाला एखाद्या चांगल्या समुपदेशकाबद्दल माहिती असल्यास सांगा. धन्यवाद.
पितृपक्ष आणि पितृतर्पण
बलात्कार असाही आणि तसाही
गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात अतिशय दुर्दैवी आणि भयानक घटना घडली. एका १२ वर्षाच्या मुलीवर ३ जणांनी बलात्कार केला. मला त्यातील पूर्ण बातमी बघायला मिळाली नाही बाकी कुठेही. पण मिळालेल्या माहितीप्रमाणे, ती मुलगी रात्री लहान बहिणीला घेऊन बाहेर शु करायला गेली असताना हे सर्व झालं. बहीण बिचारी घाबरून पळून गेली. आणि हे तिघे मुलीला घेऊन फरार झाले. पुढे सोसायटी मध्ये हेही कळले की, मुलीला आमच्या सोसायटीतील एकजण भेटायला जाऊन आल्या आणि त्यांनाही ती अतिशय घाबरललेली दिसली. त्या मुलीला, तिच्या घरच्यांना आपण कुठल्या प्रकारची मदत करू शकतो यावर बोलणेही झाले.
'स्वप्न' आणि 'सत्य' - भाग ४
जुने भागः http://www.maayboli.com/node/59488
ती (लाडाने) : तुला लक्षात आहे ना माझा वाढदिवस?
तो: म्हणजे काय? मला जगायचंय अजून.
ती: ह्या ह्या ! फालतू जोक मारू नकोस.
तो: मग काय करू? तुझा बड्डे म्हणजे महिन्यभराचा प्रोग्रॅम असतो. कसं विसरेन?
ती(हिरमुसून): हे बघ असं असतं. काहीही बोलायची सोय नाही.
तो: बरं सांग, त्याचं काय?
ती: हां ! मला या बड्डे ला सरप्राईज हवंय.
तो: सरप्राईज? आणि ते असं सांगून?
ती: मग काय? इतक्या वर्षात न सांगून तुला कळत नाही, म्हणून आता सांगून, मागून घेतेय.
तो: आता हे असं सांगितल्यावर ते सरप्राईज होत का?
कामाठीपुऱ्यातली आर्त प्रतिक्षा - जयवंती ...
कामाठीपुरयाच्या ज्या 'आशियाना' मध्ये #हिराबाई राहायची तिथलीच ही एक छोटीशी नोंद जी त्या पोस्टमध्ये करायची राहूनच गेली. त्यावर हे चार शब्द.... १९७७ ला युपीच्या मुरादाबादमधून हिरा कामाठीपुऱ्यात आली. तिला दोन वेळा विकले गेले, तिचे कर्ज फेडण्यासाठी तिच्या मुलीला,ताजेश्वरीला 'लाईन'मध्ये आणण्याचे प्रयत्न झाले. मात्र तिची रवानगी कोलकत्याच्या कामाठीपुऱ्यात - सोनागाछीत झाली. पण तिला आपल्या देहाचा कापूर करायची वेळ आली नाही. आपल्या मुलीसाठी पैसे जमवताना हिराबाईने १९९८ मध्ये जेंव्हा पहिल्यांदा आपल्या अंगावरचे कपडे उतरवले तेंव्हाची ही गोष्ट...