आधार

वृद्धापकालीन नैराश्यावर उपाय काय?

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 11 November, 2014 - 05:44

रोजच्या आयुष्यात टीव्ही, वर्तमानपत्रांतल्या धक्कादायक बातम्या पाहिल्या की आपण अस्वस्थ होतो. जग सुरक्षित नसल्याची पुन्हा एकवार जाणीव होत राहाते. दंगली, खून, मारामार्‍या, दरोडे, हल्ले, चकमकी, बलात्कार, आपत्ती, दुष्काळ वगैरे बातम्या वाचल्या की ते वर्तमानपत्र पुन्हा उघडावेसेही वाटत नाही. निकटवर्तीयांमध्ये कोणाकडे आकस्मिक निधन, वाईट अपघात, दीर्घ आजार, दु:खद घटना घडल्या की कितीही म्हटले तरी मनावर एक मळभ येतेच!

मुक्तांगणचा "वस्ताद"

Submitted by अतुल ठाकुर on 10 November, 2014 - 07:19

मुक्तांगणला गेल्यावर जर डेटा गोळा करताना मध्येच वेळ मिळाला तर मी वायंगणकरसरांसमोर जाऊन बसतो. काहीही न बोलता नुसतं पाहुनच बरंच काही दिसत असतं, उमगत असतं. मला वाटतं तेथेच मी वस्ताद हे नाव सर्वप्रथम ऐकलं. उत्सुकता वाटली कि सर्वजण "वस्ताद" म्हणुन उल्लेख करतात ती व्यक्ती आहे तरी कोण? नंतर राजेश रजपुत सरांची ओळख माधव सरांनी करुन दिली. तेव्हा लक्षात आलं अरे आपण तर यांना अनेकदा पाहिलं आहे. त्यांच्या या टोपण नावाची मात्र माहिती नव्हती. मध्यम उंची, सडपातळ अंगकाठी, गोरापान चेहरा, प्रसन्न हसु, चालण्याची विशिष्ट ढब, खणखणीत आवाज आणि अत्यंत नीटनेटकी राहणी ही रजपुत सरांची वैशिष्ट्ये.

विषय: 
शब्दखुणा: 

आनंदी आयुष्याची एखादी ओळ..

Submitted by दुसरबीडकर on 9 November, 2014 - 09:06

आनंदी आयुष्याची एखादी ओळ लिहावी..
जी दुःखाच्या मंचावरती आधारास पुरावी..!!

इतक्या वेळा तुटलो की उठताही आले नाही..
या तूट-फुटींची सांगा,कोणी भरपाई द्यावी..??

आयुष्याचे अवघे जगणे नितळ करावे म्हणतो..
फक्त जरा श्वासांची तुरटी देवा पुरुन उरावी..!!

आभाळाचा हेवा अन धरतीशी वैर नसावे..
जाणुन मोठेपण इतरांचे आपण लवती घ्यावी..!!

शेतामधल्या मातीला घामाचे देता अत्तर..
गात्रे अन गात्रे पीकांची गंधाळून निघावी..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..

स्त्रीभृणहत्या - जबाबदार कोण? (पुन्हा इथे टाइप केलेले. लिंक नव्हे.)

Submitted by स्वीटर टॉकर on 7 November, 2014 - 12:43

स्त्रीभृणहत्या - जबाबदार कोण?

अय्या, हा कसला बावळट प्रश्न? उत्तर सरळ आहे. पति, कधी कधी पत्नी, त्यांच्यावर दबाव आणणारे सासू सासरे आणि याचा फायदा उठवणारे डॉक्टर !

मात्र ‘उत्तर’ आणि ‘समाधान’ यात फरक असतो. राजकीय पुढार्‍यांकडे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. समाधान मात्र नसतं. कारण समाधान होण्यासाठी खोलात जावं लागतं. वरवरचा विचार पुरत नाही. या हत्येत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सामील होणार्‍यांवर घणाचे घाव घातले पाहिजेत यात शंकाच नाही. त्याचबरोबर अशी परिस्थिती येणारच नाही यासाठी पावलं उचलली पाहिजेत.

हेमलकसा

Submitted by राजेंद्र देवी on 21 October, 2014 - 05:30

हेमलकसा

रंजले गांजले आदिवासी
जमात त्यांची माडीया
लुटुनी त्यांचे अनुदान
अधिकाऱ्यांनी बांधल्या माड्या

नक्षलवादाचा घेऊन संशय
मांडला त्यांचा छळ
जन्मताच ज्यांची
ठेचली गेली नाळ

जगण्यासाठी करती
कसबसे मेळ
वर्दीतील जनावरे
करिती शरीराशी खेळ

निबिड अरण्यात शिरला
प्रकाशाचा एक कवडसा
घेऊन मानवतेचा वसा
गाव वसवले हेमलकसा

अनाथ प्राण्यांसाठी
काढले त्यांनी निवास
बनले प्राणिमित्र
गौरविले त्यांस भारतरत्न

शब्दखुणा: 

तू येण्याच्या आधी काही तू गेल्याच्या नंतर..

Submitted by दुसरबीडकर on 17 October, 2014 - 10:05

तू येण्याच्या आधी काही तू गेल्याच्या नंतर..
सखये मी मग मोजत बसतो दोघांमधले अंतर..!!

सोपे नसते.कळले..!आयुष्याचे चंदन होणे..
वेढा घालुन बसलेला प्रश्नांचा नाग निरंतर..!!

येता-जाता 'तो' डोकावत असतो विहिरीपाशी..
'भरल्या' विहिरीतुन नक्की जगण्याचा मिळतो मंतर..!!

सारवलेली मायेने स्वप्ने शेणा-मातीची..
फरशीवर त्यांना 'पुसण्या'वाचुन नाही गत्यंतर..!!

कृष्णाला पाहुन त्या पुतनेलाही फुटला पान्हा..
मग का आजमितीच्या कैक यशोदांचे स्थित्यंतर..??

-गणेश शिंदे..
दुसरबिड,बुलडाणा...

कन्फेशन अर्थात मला काही कबूल करायचे आहे

Submitted by हर्पेन on 27 September, 2014 - 01:34

नमस्कार!

अनेकदा आपल्या हातून काही छोट्यामोठ्या चुका होतात, काही चुकुन घडतात, काही आपण मुद्दाम / जाणतेपणी करतो. कळतंय पण वळत नाही असेही त्याचे स्वरूप असू शकते. अशा चुका, भले मग त्या किरकोळ असल्या, तरी त्या घडून गेल्यावर आपले मन आपल्याला खात रहाते. काही वेळा अशा गोष्टी आपण चटकन विसरतो तर काही वेळा त्यांना आपल्या मनात दीर्घ काळ ठेवून घेतो. अशा अपराधी भावनेचा निचरा चटकन व्हावा म्हणून हा धागा...इथे सांगा आणि मोकळे व्हा!

वाघापासून त्या मुलाला वाचवता आले असते का?

Submitted by हर्ट on 26 September, 2014 - 11:06

दिल्लीमधील एका प्राणीसग्रहातील ही कालची घटना आहे. एक मुलगा वाघाला बघता बघता खाली पडला आणि वाघाची शिकार ठरला. सुमारे १५ मिनिटे तो जीव वाचावा म्हणून धडपडत होता. तूनळीवर ही घटना बघताना शहारे येतात. तो २० वर्षाचा मुलगा मदतीसाठी प्रयत्न करतो आहे आणि आजूबाजूला विखुरलेली जनता फक्त बघते आहे. प्राणी संग्रहालय निर्माण करताना तिथल्या अधिकाराला जराही सुरक्षितेची खबरदारी करता आली नाही ह्याचे फार नवल वाटते. १५ मिनिटाच्या काळात काहीतरी मदत करता आली असती.

विषय: 

"इट्स ओके ! हो जाता है यार" .... पण इथे सो कॉलड स्त्री-पुरुष समानता गंडली !

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 August, 2014 - 06:04

"इट्स ओके ! हो जाता है यार" .... पण इथे सो कॉलड स्त्री-पुरुष समानता गंडली !

डिसक्लेमर - घटनेतील सर्व नावे बदलली आहेत.

नायक = रुपेश. आमच्या ऑफिसमधील एक अविवाहीत पण कमिटेड कर्मचारी. गर्लफ्रेंड आहे आणि प्रेमप्रकरण सिरीअस आहे.
नायिका = हेमांगी. आमच्याच ऑफिसमधील महिला कर्मचारी. विवाहीत आहे. विवाहाला ४-५ वर्षे झालीत. एक लहान मुलगी आहे.
नायक-नायिका संबंध = निखळ मैत्री !

मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Pages

Subscribe to RSS - आधार