स्त्रीविरोधातील हिंसा नष्ट करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस : २५ नोव्हेंबर! (सार्वजनिक धागा)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 25 November, 2014 - 01:16

स्त्रियांबाबत केली जाणारी हिंसा ही काही नवीन गोष्ट नाही. परंतु दिवसेंदिवस या हिंसेचे वाढत चाललेले उग्र रूप ही एक अत्यंत चिंतेची व शरम आणणारी वस्तुस्थिती बनत चालली आहे. आजूबाजूच्या या परिस्थितीकडे काणाडोळा करून उपयोग नाही, कारण त्याची झळ कधी तुम्हांला लागेल ते सांगता येत नाही. अनेकदा स्त्रियांचे बाबतीत घडणारा हिंसाचार हा त्यांच्या जोडीदाराकडून होतो. इ.स. २०१२मध्ये हत्या झालेल्या स्त्रियांमधील जवळपास अर्ध्या स्त्रिया त्यांच्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबसदस्याकडून मारल्या गेल्या.

The truth is that domestic violence and violence against women touch many of us. This violence is not a private matter. Behind closed doors it is shielded and hidden and it only intensifies. It is protected by silence – everyone's silence. Violence against women is learned. Each of us must examine - and change - the ways in which our own behavior might contribute to, enable, ignore or excuse all such forms of violence. I promise to do so, and to invite other men and allies to do the same. - Sir Patrick Stewart.

दिनांक २५ नोव्हेंबर हा स्त्रियांच्या विरोधातील, स्त्रीसंदर्भातील हिंसा नष्ट करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day for the Elimination of Violence against Women) मानला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला विभागाच्या कार्यकारी संचालिका आवाहन करतात, "स्त्रियांना त्यांच्या घरी मारहाण होते, रस्त्यांवर छेडछाडीचा सामना करावा लागतो आणि आंतरजालावरही दमदाटी व दादागिरी सहन करावी लागते. जागतिक स्तरावर ३ बायकांपैकी १ बाई आपल्या आयुष्यात कधी ना कधी शारीरिक किंवा लैंगिक हिंसा अनुभवते. काही संघर्षांमध्ये सैनिकांपेक्षाही जास्त धोका स्त्रिया व मुलींना असू शकतो. स्त्रियांच्या विरोधातील हिंसा ही खरोखर साथीच्या रोगाप्रमाणे पसरत चालली आहे व तिचा अटकाव हा व्हायलाच पाहिजे!"

हिंसेचा सामना करायला लागलेल्या स्त्रिया कित्येकदा मनाने व शरीराने कोलमडून जातात. आपले मन:स्वास्थ्य हरवून बसतात. आत्मविश्वास गमावतात. त्यांना माणूस म्हणून जगता येण्यासाठी आवश्यक परिस्थिती नसेल तर त्या कुटुंबात, समाजात त्यांचे प्रमाणही जाणीवपूर्वक कमी केले जाते. हत्या केल्या जातात. वस्तूसमान त्यांची खरेदी-विक्री होते. त्यांना मूलभूत मानवी हक्कांपासून वंचित ठेवले जाते. घटनेने एक व्यक्ती व नागरिक म्हणून दिलेले स्वातंत्र्य त्यांच्याबाबतीत जाणूनबुजून नाकारले जाते. असा समाज इतर कितीही प्रयत्न केले तरी पुढे येऊच शकत नाही.

हे अत्याचार, हिंसा यांचे स्वरूप, कारणमीमांसा, मनोवृत्ती, कायदेविषयक तरतुदी, प्रतिबंधक उपाय व जागृती यांच्या अनुषंगाने आपण आजवर
मायबोलीवर वेगवेगळ्या धाग्यांच्या माध्यमांतून चर्चा व माहिती गोळा केली आहे. कौटुंबिक हिंसा, रस्त्यांवर होणारी छेडछाड, कामाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण अन् छेडछाड, नात्यांत होणारी छेडछाड यांबद्दल तसेच त्यांच्यावरील प्रतिबंधक उपायांबद्दल आपण वाचले, लिहिले, समजावून घेतले.

नवीन पिढीने अधिकाधिक जागरूक व्हावे, स्त्रियांनी एकजुटीने ही लढाई लढावी आणि स्त्रियांसंबंधीची हिंसा समाप्त करण्याचा हा लढा स्त्री-पुरुषांनी मिळून लढावा यासाठी अनेक संघटना व सेवाभावी संस्था प्रयत्न करत आहेत. शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पण आपण त्यांबद्दल पुरेसे जागरूक आहोत का? आपली जागरूकता, दक्षता व समयोचित कार्यवाही ही स्त्रियांविरोधीची हिंसा रोखण्यासाठी फार महत्त्वाची आहे.

अशा हिंसेमुळे पीडित व्यक्तींनी त्याबद्दल लज्जा, शरम, संकोच न बाळगता, भयग्रस्त न होता तक्रार करणे व अन्याय रोखण्यास हातभार लावणे फार गरजेचे आहे. शारीरिक हिसा - मग ती एक थप्पड असो किंवा लाथेचा प्रहार असो अथवा शस्त्रांचे वार असोत - त्याविरोधात न्याय मागायचा व हिंसा रोखायचा अधिकार प्रत्येक स्त्रीस आहे.

स्त्रीविरोधातील हिंसेचा प्रतिरोध करतानाच हिंसाचाराला बळी पडलेल्या स्त्रियांना समयोचित मदत मिळावी, मार्गदर्शन व समुपदेशन मिळावे, वैद्यकीय - कायदेविषयक - सुरक्षाविषयक मदत प्राप्त व्हावी यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात योजना निर्माण होणे व त्यांची योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. हेल्पलाईन्स, न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत संस्था, सुरक्षित निवारा, कायदेविषयक सल्ला, पोलिस स्टेशनमध्ये मदत, समुपदेशन यांसारख्या गोष्टी स्त्रियांना विनाप्रयास उपलब्ध होणे आवश्यक आहे. तसेच त्यात कोणताही कलंक, संकोच किंवा बदनामीची भीती नको. भेदभावाची आशंका नको. शहरांपासून ते ग्रामीण विभागांपर्यंत सर्व ठिकाणी स्त्रियांसाठी या सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या सुविधांच्या कैक पटीत हे काम होणे गरजेचे आहे. तसेच स्त्रियांनी व त्यांच्या कुटुंबियांनीही न घाबरता पुढे येऊन न्याय मागणे व न्याय मिळवणे या प्रक्रियेत सहकार्य करणे अनिवार्य आहे.

हे आपणांस माहीत आहे का?

महाराष्ट्रातील व भारतातील स्त्रियांसाठी हेल्पलाईन -

१०९१ या फोनक्रमांकावर पोलिस हेल्पलाईन फॉर वुमेन कार्यरत आहे. संकटात असणाऱ्या / जीवाला धोका असणाऱ्या मुलीबायकांसाठीची ही २४ तासांची हेल्पलाईन आहे. संकटकाळी स्त्रिया येथे मदत मागू शकतात. हा क्रमांक टोल फ्री असून पूर्ण भारतासाठी लागू आहे.

वेळप्रसंगी १०० क्रमांकावरही फोन करून मदत मागितली जाऊ शकते.

मुंबईत स्त्रियासाठी पोलिस हेल्पलाईन क्रमांक - १०३.

MAJLIS - ०२२ २६६६१२५२ / २६६६२३९४
Women Right Initiative - ०२२ ४३४११६०३ / ६०४
Human Rights Law Network - ०२२ २३४३९७५४ / २३४३६६९२
Helpline for Women - ०२२ २६११११०३, १२९८

मायबोलीवरील खालील धाग्यांवर आपल्याला संयुक्ताच्या माध्यमातून या विषयांवर झालेल्या चर्चा व माहिती वाचायला मिळू शकेल.

‘अर्थार्जन करणार्‍या महिलांचे व्यावसायिक कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण' : माहिती, प्रतिबंध व उपाय

नात्यातील भुतांचा बंदोबस्त

जोडप्यांसाठी : परस्पर-नातेसंबंधातील लाल बावटे

अनिवासी भारतीय (एन. आर. आय.) विवाह : संबंधित धोके, शक्यता, खबरदारी व मदत

याखेरीज काही माहितीपूर्ण दुवे -

http://www.raksha.org/emergency-numbers/ -  अमेरिकेतील एशियन स्त्रियांसाठी इमर्जन्सी मदतीकरिता फोन क्रमांक व पत्ते

http://www.standupagainstviolence.org/states/maharashtra.html - महाराष्ट्र राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, बीड, चिपळूण, जालना, लातूर, पनवेल इत्यादी भागांमधील स्त्रियांना मदत करणाऱ्या संस्था, पत्ते, फोन क्रमांक.

जर्मनीमधील हेल्पलाईन - +४९ (०) ३० - ६११०३००

(संकलित माहिती - वेगवेगळी वृत्तपत्रीय व अन्य संकेतस्थळे, यूएनवूमेन संकेतस्थळ)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम लेख. या विषयावर सातत्यानं चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे. शिकल्या सवरलेल्या स्त्री पुरुषांच्या मनातही स्त्रीविषयक अत्यंत चुकीच्या प्रतिमा आणि अपेक्षा असतात आणि त्या इतक्या खोलवर रुजलेल्या असतात की सतत हॅमरिंग करूनच थोडं फार यश मिळण्याची आशा आहे.

नाहीतर रोजची वर्तमानपत्रं आहेतच विदारक सत्यपरिस्थितीची क्लेषकारक जाणीव करून द्यायला!

एकीकडे स्त्री संदर्भातली हिंसा वाढत असली (नोंद व्हायचे प्रमाण) तरी स्त्री शक्तीचा जागर ही वाढतो आहे ही त्यातल्यात्यात समाधानाची बाब आहे.

वा फार छान आणि नाजूक विषय. माहिती आवडली. सयुक्ता टीम आगे बढो!!!!

१०९१ या फोनक्रमांकावर पोलिस हेल्पलाईन फॉर वुमेन कार्यरत आहे. संकटात असणाऱ्या / जीवाला धोका असणाऱ्या मुलीबायकांसाठीची ही २४ तासांची हेल्पलाईन आहे. संकटकाळी स्त्रिया येथे मदत मागू शकतात. हा क्रमांक टोल फ्री असून पूर्ण भारतासाठी लागू आहे.>>

धन्यवाद.

अकु, फार छान लिहिलेस.

पुणे व पश्चिम महाराष्ट्रातील स्त्रियांना जर अश्या संकटांचा सामना करावा लागला, स्वतःचे नांव पुढे येऊ द्यायचे नसले, एखाद्या परिस्थितीतून सुटका करून घ्यायची असली, त्वरीत मदत हवी असली किंवा विवाहबंधनातून कायदेशीररीत्या स्वतंत्र व्हायचे असले तर खालील क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन!

(२४ तास सेवा)

९८२२४ ३३६६५ - भगिनी हेल्पलाईन

८७९३० ८८८१४ - अक्स फाऊंडेशन

९९७५० ९०३३७ - स्नेहाधार

ह्या क्रमांकांवर कोणी संपर्क करावा?

कौटुंबिक हिंसा / छळ, मानसिक छळ, लैंगीक शोषण, कोंडून ठेवलेले असणे, व्यसनी वा बाहेरख्याली पतीने पत्नीचा छळ केल्यामुळे अश्या पतीपासून सुटका हवी असणे, एकुणच छळापासून सुटका हवी असणे, पोलिसखात्याने तक्रारींची दखल घेतलेली नसल्यास, छेडछाड / बलात्कार झालेला असल्यास, बदनामीचे भय असल्यास!

नावाची गुप्तता राखली जाईल. स्वातंत्र्यानंतरच्या सुरक्षेसाठी व्यवस्था करणे शक्य आहे. समूपदेशनाची सोय मिळेल. त्वरीत वैद्यकीय सहाय्यही मिळू शकेल.

महत्वाचे - कौटुंबिक हिंसा हा घरातील अंतर्गत प्रश्न नाही. शेजारपाजारच्यांनी लक्ष घालायलाच हवे असा विषय आहे.

लेख समयोचीत व माहितीपूर्ण! धन्यवाद!

बी, १०९१ क्रमांकावर पुण्यातही मदत मागता येते. १०० क्रमांकाबद्दलही तेच.
याखेरीज पुण्यात स्त्रियांना मदत करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांची यादी येथे आहे -

http://www.standupagainstviolence.org/states/maharashtra.html#pune

भावनिक हिंसा पण स्त्रियांनी सहन करू नये. व्हर्बल व फिजिकल अब्युज साठी झीरो टॉलरन्स पॉलीसीच असावी. समयोचित लेख. परंतु असा दिवस पाळावा लागावा हे दुर्दैवी आहे.

छान धागा आणि माहिती.

स्त्रियान्ना हिन्साचाराचा सामना करावा लागतो आणि बहुतान्श घटनात जवळच्याच किव्वा विश्वासाच्या व्यक्ती कडुन अत्याचार होतो. फोन नम्बर, तक्रार निवारण हे हिन्सेची घटना झाल्यावर घेण्याचे सोपस्कार आहेत. मुळात अशा घटना टाळता कशा येतिल, काय सतर्कता, जागरुकता ठेवायला हवी ?

लहान मुलान्ना वाढवतानाच स्त्रियानप्रती समान आदर बाळगण्याचे सामाजिक शिक्षण देणे गरजेचे आहे... नव्हे तो सन्स्काराचा भाग बनायला हवा. मुलगी दुसर्‍याच्या घरात जाणार आहे म्हणुन केवळ तिनेच घरातली कामे करायला हवीत जेणे करुन पुढे सासरी तिला त्रास होणार नाही त्याच वेळी मुलाने घरातले कामे नको करायला (तेव्हढेच अभ्यासाकाडे लक्ष द्यायला वेळ), असे `विचार` मी अनेकदा बघितले आहे. मग बाब्याला आपण थोडे वेगळे वाटणे सहाजिकच आहे.

बेफ़िकिर, प्रतिसादांत दिलेल्या फोन क्रमांक व माहितीबद्दल धन्यवाद! कृपया हे फोन नंबर्स कोणत्या संस्थेचे / सेवेचे आहेत तेही लिहाल का?

आपापल्या भागांतील स्त्रियांना हिंसाचाराचे विरोधात न्याय मागण्यास व मिळवून देण्यास मदत करणाऱ्या संस्था, पत्ते, फोन क्रमांक, ईमेल वगैरे लिहिण्याचे सर्वच मायबोलीकरांना आवाहन. अशा मदत क्रमांक, हेल्पलाईन्स व मदतसंस्थांबद्दलचा आपला काही अनुभव असेल तर तो अनुभवही शेअर करू शकता.

>>>बेफ़िकिर, प्रतिसादांत दिलेल्या फोन क्रमांक व माहितीबद्दल धन्यवाद! कृपया हे फोन नंबर्स कोणत्या संस्थेचे / सेवेचे आहेत तेही लिहाल का? <<<

अरुंधती, आता मी ती नांवे दिलेली आहेत. धन्यवाद!

थँक्स! Happy

चांगला लेख अकू!
बेफि, अधिक माहितीसाठी धन्यवाद.
या हिंसाचाराचा विरुद्ध लढा कौटुंबिक आणि सामाजिक दोन्ही पातळीवर आवश्यक.
अमेरिकेतील परीस्थिती - ५ पैकी १ मुलगी कॉलेज कॅम्पसवर लैंगिक हिंसाचाराला बळी पडते. मात्र न्याय मिळवणे फार कठीण जाते. बरेचदा पिडीत व्यक्ती पोलीसात जाणे टाळते. त्याची कारणे
१.मला हे कुणाला कळू द्यायचे नाही.
२. माझे फ्रेंड्स मला ग्रुपमधून एकटे पाडतील, माझ्यावर विश्वास ठेवणार नाही कारण गुन्हेगर माझ्या/आमच्या फ्रेंड सर्कल मधलाच आहे.
३. सगळे मलाच दोष देतील
४. पोलीस माझ्यावर विश्वास ठेवतील का? ते केस कशाप्रकार हाताळतील त्या बद्दल मनात गोंधळ आणि अविश्वास असणे.
बहुतेक पिडित व्यक्ती गप्प रहातात. काही व्यक्ती युनिवर्सिटीकडे तक्रार करणे आणि त्याच्याकडून न्याय मिळवणे हे मार्ग स्विकारतात. या प्रोसेसमधे न्याय मिळणे अतिशय दुरापास्त होऊन बसते.
खालील दुव्यावरुन एकंदरीत परीस्थितीची कल्पना यावी.
http://cloudfront-files-1.publicintegrity.org/documents/pdfs/Sexual%20As...

सेक्शुअल अ‍ॅसॉल्ट केसेस योग्य प्रकारे हाताळल्या गेल्या नसण्याची शक्यता आहे म्हणून फेडरल इन्वेस्टिगेशन सुरु आहे अशा युनिवर्सिटीजची लिस्ट-
http://www.scribd.com/doc/243123273/OCR-Sexual-Violence-Open-Investigati...

टेड युथ talk आहे. एमिली सेक्शुअली बुलीड होती. तिने 'अनस्लट' प्रोजेक्ट चालू केलाय.
https://www.youtube.com/watch?v=36l-UwlO9D4
२ वर्षांपूर्वी इथे एक मुलीने आत्महत्या केलेली. तिचे रेप करतानाचे फोटो शाळेत/ कम्युनिटी मध्ये व्हायरल झाले. पोलीस केस झाली, पण पोलिसांनी पुरेसा पुरावा नाही म्हणून action घेतली नाही. तिचेच मित्र/ मैत्रिणी तिला त्रास देऊ लागले, त्यांनी घर बदलले पण नवीन ठिकाणी परत त्रास सुरु झाला, आणि शेवट आत्महत्येत झाला. मिडियामध्ये आणि नंतर पार्लमेंटमध्ये बरीच चर्चा झाली आणि गेल्यावर्षी online बुलिंगवर नवीन कायदा पास झाला. वरचा व्हिडीओ नक्की पहा, एमिली बुली झाल्यावर त्यातून काय करून उभं राहता येईल यावर बोलते. ही तिची साईट आहे. http://www.unslutproject.com/

“Nobody should ever have their sexuality held against them. Period.”

अकु, चांगला धागा. या विषयावर वारंवार बोलून, चर्चा करूनच अवेअरनेस येईल.

माहितीपूर्ण धागा आणि हेल्पलाईन बद्दल धन्यवाद. यातुन नक्कीच जागरुकता वाढेल.

<<हिंसेमुळे पीडित व्यक्तींनी त्याबद्दल लज्जा, शरम, संकोच न बाळगता, भयग्रस्त न होता तक्रार करणे व अन्याय रोखण्यास हातभार लावणे फार गरजेचे आहे. शारीरिक हिसा - मग ती एक थप्पड असो किंवा लाथेचा प्रहार असो अथवा शस्त्रांचे वार असोत - त्याविरोधात न्याय मागायचा व हिंसा रोखायचा अधिकार प्रत्येक स्त्रीस आहे.>> +१००

हेल्पलाईन ,मित्रमैत्रीणीं ची ,योग्य व्यक्तीची मदत या नंतरच्या गोष्टी आहेत. त्या वेळ पडली तर घ्याव्यातच पण त्याआधी स्वतः कोणत्याही प्रकारच्या स्त्रियांबाबत केली जाणारया हिंसेच्या बाबतीत विरोध करण्यास समर्थ राहीले पाहीजे. कमीतकमी आपल्यावर हिंसा होते आहे याची जाणीव हवी.आणि त्यासाठी विरोध करण्याचा प्रयत्न करावा. कारण जितक्या स्त्रीया या केली जाणारया हिंसेचा विरोध करतील तीतकी या गोष्टींना जबर बसेल. कारण आपली सर्वांत जास्त मदत आपणच करु शकतो. तीतकी शक्ती प्रत्येक स्त्रीत असतेच.

चांगला धागा आहे.

मध्यंतरी कुठले तरी आर्टिकल वाचत होते त्यात सगळ्यात जास्त डोमेस्टिक वायोलन्स युरोपात आणि त्या खालोखाल अमेरिकेत होतो असं वाचलं होतं. अर्थात त्यांची आकडेवारी कशावर आधारित होती किंवा त्यात एशियातल्या डिस्क्लोज्ड/अनडिस्क्लोज्ड केसेस धरल्या होत्या की नाही आठवत नाही.

स्त्रियांनी दाद मागायला हवी हे खरे. पण समाजातील इतर घटकांनी आणि विशेषतः शेजारी व स्त्रीच्या आप्तांनी 'आपण कशाला मध्ये पडा', 'नाण्याला दोन्ही बाजू असतात, ती पण तशीच असेल', 'आपल्यामागे झंझट लागेल पोलीसांच' असली भूमिका घेतली तर सगळच अवघड होते. पूर्वी एक 'बेल बजाव' आंदोलनची जाहिरात असायची. हल्ली ते आंदोलन कसे चालू आहे माहित नाही.

आत्ता व्हॉट्स अ‍ॅप वर हा एक नंबर समजला. हा नंबर मी डायल करून पाहिलेला नसला तरी येथे उपयुक्त ठरेल असे वाटल्यामुळे देत आहे.

९९७०० ९५७०० (मानव सेवा संघ - महाराष्ट्र राज्य)

सीमंतिनी >>>+१११११
आपल्या आजूबाजूला अश्या घटना घडत असतील तर आपणही मदत करायला हवी .निदान आपण पोलिस , helpline ला फोन करून कळवू शकतो . आपल्या नावाची गुप्तता बाळगा म्हणून सांगितलं कि बाळगतात ते लोकं सोसायटी , बिल्डींग मधले लोक एकत्र येवून काहीतरी action घेवू शकतो .