मोकळे मन

मोकळे मन

Submitted by राजेंद्र देवी on 15 June, 2018 - 23:22

मोकळे मन

झाकोळलेले आकाश
जणू अर्धोन्मीलित नयन
उघडमिट प्रकाशाची
वेदना व्याकूळलेल्या दिशांची

रिमझिम बरसात
अंधुकशी आठवण
हाक प्रफुल्लित निसर्गाची
टवटवी हिरव्या पानांची

लखलख विदयुलता
ठिणगी प्रकाशाची
उजळीत आसमंत
दिशा मोकळया मनाची

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 

कन्फेशन अर्थात मला काही कबूल करायचे आहे

Submitted by हर्पेन on 27 September, 2014 - 01:34

नमस्कार!

अनेकदा आपल्या हातून काही छोट्यामोठ्या चुका होतात, काही चुकुन घडतात, काही आपण मुद्दाम / जाणतेपणी करतो. कळतंय पण वळत नाही असेही त्याचे स्वरूप असू शकते. अशा चुका, भले मग त्या किरकोळ असल्या, तरी त्या घडून गेल्यावर आपले मन आपल्याला खात रहाते. काही वेळा अशा गोष्टी आपण चटकन विसरतो तर काही वेळा त्यांना आपल्या मनात दीर्घ काळ ठेवून घेतो. अशा अपराधी भावनेचा निचरा चटकन व्हावा म्हणून हा धागा...इथे सांगा आणि मोकळे व्हा!

Subscribe to RSS - मोकळे मन