मृगगड स्वच्छता मोहीम : ०२ -१० -२०१६
गडकिल्ले स्वच्छता अभियान अंतर्गत दुर्गवीर प्रतिष्ठान ची हि दुसरी मोहीम...
गेल्या दोन वर्षापासुन आमची पोर मोठ्या हिम्मतीने "नव्या मित्राची " सेवा करत आहे ...
२ ऑक्टोंबर ला सरकारी गडकिल्ले स्वच्छता अंतर्गत मृगगडावर मोहीम झाली ....
या गड दोस्तांची निगा राखणारे दुर्गवीर रामदास , प्रज्वल आणि अमित हजर होते , या अमित चे लै कौतुक हो पोरगा थेट ऑफिस वरून गडावर फॉर्मल वर आला .. (इथे मुख्य हेतू "पापडाचा होता " अशी धुक्यातील अफवा पसरली होती )