बागलाण ,नाशिक प्रांतात शालेय साहित्यांचे वाटप दि .१९-२० जुलै २०१४

Submitted by मी दुर्गवीर on 24 July, 2014 - 10:14

आपण एक स्वप्न पाहतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटत असतो . असेच एक सुराज्याचे स्वप्न आई जीजाऊने पहिले 'श्रीमंतयोगी "शिवरायांच्या रूपाने साकार केले ... या स्वप्न पूर्तीसाठी त्यांना साथ लाभली ती या निष्ठावंत आणि उभ्या सह्याद्रीची …

पण आज त्यांचे सुवर्ण स्वप्नाची अनास्था आपण उघड्या डोळ्याने पाहत आलो , ज्यांच्या अंगाखांदयावर आपल्या पूर्वजांनी पराक्रमाचे रक्त वाहिले त्यांची अवस्था काय आहे आज ? त्यांच्या चिरा चीर्यातून मदतीची आर्त आपणास का ऐकू येत नाही ??
हि आर्त ऐकली कि संतोष हासुरकरयांनी आणि उभी राहिली "दुर्गवीर "हि संस्था . दुर्गवीर हि संस्था नाही, हा आमचा परिवार आहे, गडकोटांच्या आजच्या अवस्थेला बघून ज्याचं काळीज पिळवटत अशा सर्व शिवभक्तांसाठी, माय मराठीच्या पूतांसाठी, महाराष्ट्राच्या वाघरांसाठी, गडकोट पुन्हा पूर्वीच्या वैभवात उभे करायचे स्वप्न घेऊन एकत्र येणाऱ्या प्रत्येकाचे हे कुटुंब आहे.

२००८ पासून सुरुकेलेया कार्याला कधी तडा गेला नाही कुठे ना कुठे सातत्याने दुर्गवीरांचे कार्य चालू आहे . आजही सातत्याने संवर्धन मोहिमा राबवत आहे . विवध गडकिल्ल्यांवर सण आपले सांस्कृतिक उत्सव साजरा करत आहोत. महाराष्ट्रातील विविध गड किल्ल्यांना भेटू देवून तेथील स्थानिकांना गडकिल्ल्या विषयी जागरूक करत आहे. गडा च्या "सेवा सहयोग यांच्या मदतीने घेर्यातील शालेयउपयोगी साहित्यांचे वाटप करून त्यांची शिक्षणाची लाचारी दुर करत आहे .

यावेळी १९ -२० जुलैची अशीच एक चमत्कारिक मोहीम शक्ती देवून गेली ..

kjcv.JPG
मांगी - तुंगी ...

बागलाण…. सह्याद्रीच्या या उत्तर दक्षिण रांगेची सुरवात नाशिक जिल्ह्याच्या वायव्या कोपर्यातील असणाऱ्या बाग्लानातून होतो . हि सह्याद्रीची रांग राजगडच्या दुहेरी तटबंदी प्रमाणे पसरत गेली आहे . त्यातील एक सैलबारी आणि दुसरी डोलबारी . सैलबारीच्या रांगेवर शस्त्र धारण करून एखद्या मावळल्या सारखे उभे असलेले 'मान्गीतुन्गीचे ' गगनात भिडणारे सुळके आणि न्हावीगडा सारखा पहारा देणारा हिलाच समांतर डोलबारी रांग आहे . साल्हेर , मुल्हेर , मोर , हरगड , सालोटा या रांगेतील साल्हेर हा यांच्या म्होरक्या या सर्वानन घेवून आपल्या स्वराज्यातील सीमा साव्र्क्षित करण्याची जबादारी पार पडत आहे.

सह्याद्रीतील भटक्यांना नाशिकच्या या रांगा नेहमीच खुणावत असतात पण, खडा पहारा देत उभ्या असलेल्या गडकिल्ल्यांच्या पायथ्यातील राहणाऱ्या गावत खेडेपाड्याकडे दुर्लक्ष का ? असंख्य वर्षा पूर्वीचा इतिहास लाभलेल्या या बागलाण मधील गडकिल्ल्यांच्या परिसरातील लोकांची इतकी लाचारी का ?
शिवाजी महाराजांनी स्वराज्याची लाचारी खर्या अर्थाने दूर केली म्हणूनच आपण आज ताठ मानाने व स्वाभिमानाने जगतोय . पण तोच स्वाभिमान , संस्कृती . लाचारीच्या रुपात समोर येतोय . हि लाचारी दूरकरण्यासाठी आपणची काही तरी करु शकतो शिक्षणाची लाचारी मुळे सर्व लाचारी ओढवल्या जातात , ती दूर कशी करावी याच विचारानि त्रस्त झालेले बागलाण मधील "रोहित माणिक जाधव यांना दुर्गविरांशी संपर्क केला . त्यांनी बागलाण मधील गडकिल्ल्यांच्या आवारातील लोकांची अवस्था व त्यांनि समोर मांडल्या , विचारांशी एकमत होवून एका चमत्कारिक मोहिमेचे नियोजन ठरलेफोनवर 'आपण काय करूशकतो " याच्या चर्चा झाल्या … रोहित जाधव यांनी "शिक्षणाची लाचारी कशी दूर होवू शकते याचे उत्तर त्यांना हळू हळू मिळत गेले … तीन महिन्यात रोहित यांनी बागलांचा संपूर्ण परिसर आपल्या विचारांना घेवून पालथा घातला . नवनवीन शोधमोहिमा मुळे बागलाण तालुक्यातील निसर्गाचा अदभूत चमत्कार असलेली , दैवी व रहस्यमय ठिकाणे त्यांना सापडत गेली.

अलियाबाद येथी शिवमंदिर व शिल्प सौदर्य .....
DSC04307_0.JPGDSC04310.JPGDSC04314.JPGDSC_1395.JPG

रोहित यांनी सर्व परिसरातील १४ गरजू पाड्यांचा निवड केली . मुंबईहून सात दुर्गवीर या मोहिमेसाठी बागलाण प्रांतात आले .
शनिवार दिनांक १९ जुलै ला गडकिल्ल्यांच्या पायथ्यातील लोकांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले .…
दिनांक १९ जुलै ठिकाण : आजन्दे गाव वाटप करण्यात आलेल्या गाव व पाड्यांची नावे .
१) जिल्हापरिषद प्राथमिक शाळा , आजन्देगाव
२)जिल्हापरिषद प्राथमिक शाळा , खरडगाव
३) मालेआंबा पाडा
४) जानसेपाडा
५) कांद्याचामळा वाडी
६) बोर दैवत वाडी
७)हनुमत पाडा
या परिसरात शालेयसाहित्य सोबतच "संगणकची नित्तांत आवशक्यता आहे .
DSC_1283.JPG
आजन्दे गावात प्रवेश होताच पावसाचे आगमन झाले , आमची चांगलीच झुंबड उडाली ..
DSC_0016_1.JPG
स्वरस्वती देवीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात झाली …
10574410_744847912227555_1745068118054378328_n_0.jpg
सर्वांचा सत्कार समारंभ पार पडला … रोहित जाधव यांनी "दुर्गवीर "च्या कार्याची माहिती गावकरी व शिक्षकांना दिली .
1891195_744847288894284_565606944944519284_n.jpg
६० दप्तर वाटपाचा कार्यक्रम होता .
10487997_744847425560937_7694647808407961723_n_0.jpg10494674_744848055560874_6313015355832260827_n_0.jpg10370350_744848352227511_3940063193898794621_n_0.jpg10470811_744847402227606_2529231805569823360_n_0.jpg10458903_744848268894186_5204820219527058797_n (1).jpgDSC04284_0.JPG
शाळेतील शिक्षक , गावकरी , पालक आणि दुर्गवीरांच्या हस्ते शालेय साहित्यांचा वाटपाचा कार्यक्रम पडला …
DSC04292.JPG
दुर्गवीर प्रमुख संतोष हासुरकर माहिती देतांना .
10551006_745228548856158_1831490423151264148_n.jpg10533101_744849008894112_3076338675854148315_n.jpg10430507_744848855560794_5327406458432333438_n.jpg
हा आनंद आणि समाधान कुठे विकत मिळतो का ओ Happy
10492122_744847702227576_6313598847454401987_n.jpg
मोहीम फत्ते ..:

दिनांक २० जुलै ठिकाण देव मामलेदार यशवंतराव महाराज मंदिर सभागृह : वाटप करण्यात आलेलेया गाव व पाड्यांची नावे :
१) कर्मवीर भाऊसाहेब हिरे माध्यमिक कृषीविद्य्लाय बागलाण
२) खालाप गाव
३) जिल्हा परिषद गाव
४) केरसाने गाव
५) रयत शिक्षण संथेचे माध्यमिक शाळा . चिऊगाव
६) ब्राह्मण गाव
७) नूतन इंग्लिश शाळा
10557469_744858188893194_4057584682986659813_n.jpg
देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करतांना .
10553444_744858042226542_7681230857464456363_n.jpg
श्री गणेशाचे स्मरण करून कार्यक्रमाला सुरवात …मोरे मामा आणि त्यांच्या सौ ..

10376991_744858658893147_5016991161721336711_n.jpg10410779_744856932226653_6519628137840057790_n.jpg10511203_744858282226518_7671118881779380839_n.jpg10520103_744858368893176_5991561078405056674_n.jpg10526190_744858412226505_7935391218802897904_n.jpg10552437_744858592226487_6270134238326199001_n.jpg

या मोहिमेला यशवंतराव महाराज संस्थेचे अध्यक्ष श्री आप्पा बागड समेत समस्त विश्वस्थ मंडळी उपस्थित होते . तसेच बागलाण चे नगरअध्यक्षा सुलोचना चव्हाण बागलाण जिल्ह्याचे PSI जायभावे साहेब ,बागलाण तहसीलदार अश्विनकुमार पोददार , समाजसेवक जगदीश कुलकर्णी असे अनेक मान्य वरांनी या मोहिमेला उपस्थिती दर्शवली.

वाटप करण्यात आलेले साहित्य (१२४ नग ):शालेय दफ्तर , ९ मोठी वही , ६ दुरेगी वही , कंपोस पेटी,रंगपेटी , चित्रकला वही
10347776_744857895559890_413627671805015808_n.jpg
(छायाचित्र पुष्कळ आहेत पण इथे मर्यादा असल्या मुले नाही टाकू शकत त्यामुळे "थोबाडपुस्तकेची " LINK देत आहे . https://www.facebook.com/media/set/?set=a.744846908894322.1073741889.453...)

सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करतांना " दुर्गवीर " या परिवारास मनभरून आशीर्वाद देवून दुर्गवीरच्या या कार्याला बागलाण प्रांतात प्रसार व्हावा व येथील गडकिल्ल्या सोबतच येथील प्राचीन मंदिरांचे जतनीकरण व्हावे यासाठी आपल्या यथाशक्ती ने मदत करण्याचे वचन दिले …
PSI साहेब आपल्या भाष्यात असे म्हणून गेले कि "दुर्गवीर "हि अशी पहिली संस्था आहे कि जी इतक्या लांब येवून या बागलाण क्षेत्रात असे उपक्रम राबविण्यात प्रयत्न करीत आहे ."…
या उपरी आम्हा दुर्गवीरांना कसलीच अपेक्षा नाही . शाळेतील मुलांन कडून मिळालेले "मधुर हास्य '' थोरमोठांचे आयुष्यभर पुरतील असे आशीर्वाद आणी '' दुर्गवीर '' रोहित जाधव व यांच्या सारखे मिळालेले हे निष्ठावान मावळे .…

मित्रानो , आपण काय करू शकतो ? या प्रश्नांचे उत्तर शोधण्य पेक्षा आपण करू शकतो हे आपण जाणले पाहिजे …
लवकरच बागलाण प्रांतात दुर्गवीर अंतर्गत विविध सामाजिक बांधिलकीला एकरूप असे अनेक मोहिमा राबवण्यात येणार आहे . एक नम्र विंनती आहे . नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिवप्रेमींनी या कार्यात आपले योगदान द्यावे . ह्या महान कार्याचाआवक बरच मोठा आहे त्यासाठी प्रचंड मनुष्य बळाची गरज आहे कारण हे काम केवळ एकट्या दुकट्याने पार पडणारे नसून संपूर्ण समूहाच्या सहकार्याच्या मदतीनेच ते शक्य आहे ….
या मोहिमेत सहभागी झालेले दुर्गवीर शिलेदार : सचिन रेडेकर , उमेश परब , अजित राणे , प्रशांत वाघरे , संतोष हासुरकर, नितीन पाटोळे आणि देवेश सावंत

जिल्हा नाशिक , तालुका बागलाण दुर्गवीर संपर्क ; रोहित माणिक जाधव 09923541501

धन्यवाद ___/\___
''दुर्गवीर''नितीन देविदार पाटोळे : 08655823748
www.durgveer.com

durgveerpatole@gmail.com
durgveer.com@gmail.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्यासारख्याच लोकांच्या मदतीची आज अनेकांना अपेक्षा असतांना आपण हे काम सुफल संपूर्ण केलेले आहेत.

आपल्या कामास हार्दिक शुभेच्छा!

आपण सर्वांचे खूप कौतुक! रविवारच्या भिवगड मोहिमेपासून आपल्या कार्यात मी सुद्धा सामील होतोय . आपणा सर्वांना भेटण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
--सतीश कुडतरकर-डोंबिवली

खुप छान उपक्रम! दुर्गवीर सन्घटना चान्गले कार्य करत आहे.
तुमच्या पुढच्या उपक्रमान्ना भरपुर शुभेच्छा! Happy

खूप चांगला उपक्रम.. सर्वांचे मनापासून अभिनंदन..

पुढच्या वेळी शक्य झाल्यास हा उपक्रम जून मधे करावा. म्हणजे शाळेच्या सुरूवातीपासून मुलांना वह्या पुस्तके, दप्तरे वगैरे मिळतील....

दुर्गवीरांचे अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल मनापासुन अभिनंदन!

पुढिल प्रत्येक उपक्रमासाठी खुप खुप शुभेच्छा!!!

स्तुत्य उपक्रम... मना पासुन अभिनंदन आणि शुभेच्छा...
देवमामलेदार यशवंत महाराजांची महती काय सांगावी...

"थोर महात्मे होऊनी गेले, चरित्र त्यांचे पहा जरा
आपण त्यांच्या समान व्हावे, हाची सापडे बोध खरा"....

महाराजांची प्रतिमा पाहुन अगदी भरुन पावले बघा....